maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एसीटी फायबरनेटचे मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४: ब्रॉडबॅण्ड आणि डिजिटल सेवा उद्योगक्षेत्रातीलएक अग्रगण्य कंपनी एसीटी (एसीटी) फायबरनेटने उद्योगक्षेत्रातीलग्राहकअनुभवाची व्याख्या नव्याने घडवू पाहणाऱ्या काही अभिनववैशिष्ट्यांसह आपले मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल केल्याचीघोषणा केली आहे. आपल्या ग्राहकांच्या वेळेचे मोल राखण्याशी आणिइंटरनेटशी संबंधित समस्यांवरील उपाययोजना अखंडितपणे पुरविण्याशीआपली बांधिलकी जपणाऱ्या एसीटी फायबरनेटने झटपट, सुलभ आणिसहजप्राप्य उपाययोजना ग्राहकांच्या हातांच्या बोटांशी आणून ठेवण्याच्यादृष्टीने तयार केलेले एसीटी सुपर अॅप बाजारात आणले आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या तसेच यूजर्सच्या विस्तारत्या वर्गाच्या पावलांशी पावलेजुळवित या ब्रॉडबॅण्ड ब्रॅण्डने आपल्या मोबाईल अॅपला संपूर्णपणे नवे रूपदिले आहे. विस्तृत संशोधन हाती घेत तसेच यूजर्सच्या प्रतिक्रियांचा अभ्यासकरून सुधारणेला कुठे वाव आहे हे समजून घेतल्यानंतर या नव्या अॅपचीरचना करण्यात आली आहे ते बाजारात आणण्यात आले आहे. एसीटीसुपर अॅपचा चेहरामोहरा संपूर्णपणे वेगळा आहे, ज्यामुळे यूजर्सना बिलेभरणे, समस्येची नोंद करणे, अकाऊंट्सचा मागोवा घेणे, रिमाइंडर्स सेटकरणे, ग्राहकसेवा विभागाशी संवाद साधणे, प्लान अपग्रेड करणे इत्यादीकामे करणे अधिक सोपे जाणार आहे.

एसीटी फायबरनेटचे चीफ मार्केटिंग आणि कस्टमर एक्स्पीरियन्सऑफिसर श्री. रवी कार्तिक म्हणाले, “एसीटी फायबरनेटमध्ये आम्हीआमच्या सर्व संवादबिंदूंपाशी उत्कृष्ट दर्जाचा ग्राहकअनुभव पुरविण्याचेलक्ष्य समोर ठेवले आहे. आमचे नविनीकृत अॅप आमच्या याच ध्येयधोरणाशीमेळ साधत ग्राहकांचे आयुष्य अधिक सुलभ आणि अधिक सोयीचेबनविण्याच्या हेतूने सुलभ स्वरूपातील युआय तसेच अकाउंट हाताळणी सेल्फकेअरशी संबंधित लक्षणीयरित्या सुधारित वैशिष्ट्ये पुरविते. याच्यासाथीने आमच्या ग्राहकांना एसीटी अॅडव्हान्टेजचा अनुभव येईल आणि तेनव्या अॅपचा लगेचच स्वीकार करतील, याची मला खात्री आहे.”

या उद्योगक्षेत्रात प्रथमच वापरात आणल्या जात असलेल्या वैशिष्ट्यांच्यासाथीने एसीटी सुपर अॅप ग्राहकसेवेच्या क्षेत्रात सुविधा, कार्यक्षमता आणिअभिनवतेचे नवे मापदंड सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. अॅपमधील काहीमहत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये समस्येच्या झटपट निरसनाचा समावेश आहे, जिथेयूजर्सना अॅपवरील व्हीडिओ आणि एफएक्यू विभागातीलसेल्फहेल्पसाठीच्या मजकूराद्वारे आपल्या इंटरनेटशी निगडित प्रश्नांवरताबडतोब समाधान मिळू शकेल त्यातून समस्यासमाधानाचा एक वेगवानआणि विनासायास अनुभव मिळविता येईल. अॅनालायझरच्या माध्यमातूनत्यांना आपला डेटा, त्याचा वेग आणि वायफायशी जोडलेल्याउपक्रमांची संख्या या गोष्टींवर सहज नजर ठेवता येईल. त्यांना बिलभरण्याची आठवण करून देणारी रिमाइंडर्स सेट करणे, मूल्यवर्धित सेवासबस्क्राइब किंवा अनसबस्काइब करणे इत्यादी कामे करू शकतील. याअॅपला वापरसुलभ बनविणाऱ्या इतर आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये डार्क/लाईट मोड आणि फॉन्ट अॅडजस्टमेंट सुविधांचा समावेश आहे.

या पुन:पदार्पणाचा एक भाग म्हणून ही ब्रॉडबॅण्ड कंपनी नव्या सुपरअॅपविषयी जागरुकता वाढविण्यासाठी एका देशव्यापी मोहिमेचाही शुभारंभकरत आहे. तिच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांमध्ये ईमेल, एसएमएस आणिव्हॉट्सअॅपपच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांचा समावेशआहे. याखेरीज एसीटी फायबरनेटकडून आपल्या सोशल मीडियावरअॅपमधील ताज्या अपडेट्सविषयी सांगणारे व्हीडिओ आणि जाहिरातीसुद्धाप्रसारित केल्या जाणार आहेत. अॅप स्टोअरमध्ये दर्शनीयता जास्तीतजास्तप्रमाणात वाढवण्यासाठी आणि ऑर्गेनिक डाऊनलोडचे कमाल प्रमाणकाढण्याच्या दृष्टीने नव्या अॅपच्या स्वीकाराचा दर वाढविण्यासाठी हीपुन:पदार्पण मोहीम अॅप स्टोअरमध्ये या सुधारणांविषयीचा ताजा मजकूरहीदाखल करणार आहे.

Related posts

एचसीसीबी महाराष्‍ट्रातील ५,५०० व्‍यक्‍तींना अपस्किल करण्‍यासह १४ गावांमध्‍ये सामुदायिक प्रकल्‍प राबवणार

Shivani Shetty

टाटा मोटर्स आणि महेश कार्गो मूव्‍हर्स प्रत्‍येक मैलामध्‍ये देत आहेत सर्वोत्तम सेवा

Shivani Shetty

#SheTheDifference: प्रतिष्ठित लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्डस् २०२४ मधील अविश्‍वसनीय महिला रेकॉर्डधारकांचा सन्‍मान

Shivani Shetty

Leave a Comment