मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने मुंबईमध्ये एक्स्प्रेस मोटर्स शोरूमच्या उद्घाटनासह शाश्वत गतीशीलतेप्रती आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे. शॉप क्र. ५ व ६ नीलयोग विराट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ, मालाड पूर्व, मुंबई ४०००९७ येथे स्थित हे अत्याधुनिक केंद्र कंपनीच्या रिटेल विस्तारीकरण धोरणामधील मोठा टप्पा आहे.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्हणाले, ”मुंबईमध्ये एक्स्प्रेस मोटर्स डिलरशिपच्या उद्घाटनासह आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. पर्यावरणास अनुकूल मोबिलिटी उपलब्ध करून देण्यासह नागरिकांना सक्षम करण्याचा आमचे ध्येय श्री. अशोक एस. कांबळे यांच्यासोबतच्या आमच्या धोरणात्मक सहयोगासह मोठ्या टप्प्यावर पोहोचले आहे. व्यस्त वेस्टर्न एक्स्प्रेसवे हायवेवरील प्रख्यात ठिकाणी स्थित या शोरूममधून ग्राहकांना आमची सर्वात नवीन उत्पादने सुलभपणे उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. भव्य उद्घाटनीय इव्हेण्टची अपेक्षा करत आम्हाला खात्री आहे की एक्स्प्रेस मोटर्स सर्वोत्तमतेप्रती आमचे मानक कायम राखेल, तसेच आमच्या बहुमूल्य ग्राहकांना अद्वितीय विक्री व सेवा अनुभव देखील देईल.”
श्री. अशोक एस. कांबळे यांच्या मालकीहक्कांतर्गत एक्स्प्रेस मोटर्स व्यस्त वेस्टर्न एक्स्प्रेसवे हायवेपासून सुलभ अंतरावर प्राइम लोकेशनवर आहे. ६०० चौरस फूट जागेवर पसरलेले असण्यासह प्रवेशद्वाराजवळ अतिरिक्त २०० चौरस फूट जागा असलेले हे शोरूम इलेक्ट्रिक वेईकल्समधील गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्या आधुनिक नाविन्यतेला दाखवण्यासाठी व्यापक जागा देते. या शोरूममध्ये गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची नवीन उत्पादने आहेत, जसे इब्लू फिओ, इब्लू रोझी, इब्लू स्पिन, इब्लू थ्रिल, इब्लू रायनो, इब्लू रायनो डीव्ही, तसेच उत्पादने २२,००० रूपये ते ३,६५,००० रूपयांपर्यंतच्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत.
एक्स्प्रेस मोटर्सचे मालक श्री. अशोक एस. कांबळे म्हणाले, ”आम्हाला गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्ससोबत सहयोगाने मुंबईमध्ये एक्स्प्रेस मोटर्स शोरूमच्या उद्घाटनाची घोषणा करता अत्यंत अभिमान वाटण्यासह आनंद होत आहे. या सहयोगामधून शाश्वत गतीशीलतेला चालना देण्याचा आणि समुदायांना पर्यावरणास अनुकूल परिवहन सोल्यूशन्ससह सक्षम करण्याचा आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो. नीलयोग विराट येथे धोरणात्मकरित्या स्थित आमचे शोरूम ग्राहकांना गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्या सर्वोत्तम वारसाचे पाठबळ असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकींची वैविध्यपूर्ण श्रेणी देते. आम्ही उच्चस्तरीय सेवा देण्याप्रती आणि सकारात्मक ग्राहक अनुभवाला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहोत. तसेच आम्ही समुदायाला सेवा देण्यास आणि गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्ससोबत सहयोगाने हरित भविष्याप्रती योगदान देण्यास उत्सुक आहोत.”