maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इंटरनेट सेफ बँकिंग टेस्टमध्ये क्विक हीलला अव्वल स्थान

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४: जागतिक स्तरावर सायबरसिक्युरिटी सेवा पुरविणारी अग्रगण्य कंपनी क्विक हील अभिमानाने जाहीर करत आहे की, कंपनीच्या सेफ ब्राऊझर अँड सेफ बँकिंग सेवा हे ब्राऊझिंग आणि ऑनलाइन बँकिंगसाठीच्या जगातील काही सर्वात सुरक्षित साधनांपैकी एक असल्याचे प्रमाणन एव्हीलॅब सायबरसिक्युरिटी फाउंडेशन, पोलंडने देऊ केले असून त्यामुळे सायबरसिक्युरिटीच्या क्षेत्रातील ग्लोबल लीडर म्हणून क्विक हीलचे स्थान अधिकच भक्कम झाले आहे. हे प्रमाणन मिळविणारी एकमेव भारतीय सायबरसिक्युरिटी कंपनी बनलेले क्विक हील यापुढेही या उद्योगक्षेत्रामध्ये आघाडीच्या स्थानी राहील आणि सायबरसिक्युरिटीमधील नवसंकल्पनांचे नवे मापदंड निर्माण करत राहील.

दोन महिने चाललेल्या खडतर मूल्यमापनामध्ये एव्हीलॅबने क्विक हीलच्या सेफ ब्राऊझर अँड सेफ बँकिंग मॉड्युलच्या कार्यक्षमतेची सखोल चिकित्सा केली व हे करताना बँकिंग घोटाळ्यांच्या सतत बदलत्या स्वरूपाच्या विरोधात लवचिकपणे टिकून राहण्याच्या या यंत्रणेच्या क्षमतेवर विशेष भर दिला. जगभरातील ७ प्रतिष्ठित सायबरसुरक्षा उपाययोजना पुरवठादारांच्या तुलनेत केल्या गेलेल्या या चाचणीमध्ये क्विक हील टोटल सिक्युरीटीच्या सेफ ब्राउझर अँड सेफ बँकिंग मॉड्युल सर्व सुरक्षा निकषांमध्ये पूर्ण गुण मिळवून यशस्वी झाले. या निकषांमध्ये यंत्रणेचा क्लिपबॉर्ड हायजॅक करणे, यंत्रणेचा क्लिपबोर्ड बदलणे, कीस्ट्रोक्सचे लॉगिंग, स्क्रिनशॉट्स घेणे, कम्प्युटरवर दूरस्थ नियंत्रण आणि ड्राइव्ह तसेच फाईलच्या चोरीचा शोध यांचा समावेश होता.

क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडचे चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर विशाल साळवी म्हणाले, “चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळविण्यासाठी एव्हीलॅबद्वारे प्रमाणन आणि अधिस्वीकृती मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. यामुळे क्विक हीलने सायबसुरक्षा उपाययोजनांच्या क्षेत्रात पायाभूत काम करण्याप्रती जपलेल्या अचल बांधिलकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. क्विक हील टोटल सिक्युरिटीच्या सेफ ब्राऊझर अँड सेफ बँकिंग मॉड्लने या खडतर चाचणीमध्ये मिळविलेल्या यशामध्ये सर्वोत्कृष्टता, अभिनवता आणि यूजर संरक्षणाची अखंड कास धरण्याचे आमचे प्रयत्न प्रतिबिंबित झाले आहेत. सायबरसुरक्षेच्या परिमाणांची व्याख्या नव्याने घडविण्याचे आमचे काम सातत्याने सुरू असताना मिळालेल्या या सन्मानामुळे, जिथे यूजर्सना आत्मविश्वासाने वावरता येईल असा डिजिटल पट निर्माण करण्याच्या आमच्या दृढनिश्चयाला अधिकच पाठबळ मिळाले आहे. या उद्योगक्षेत्रात नवे मापदंड निर्माण करत असल्याचा आणि डिजिटल भविष्य सुरक्षित ठेवण्याप्रती कटिबद्ध असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

अँटी-मालवेअर टेस्टिंग स्टॅँडर्ड ऑर्गनायझेशनशी मेळ साधणाऱ्या एव्हीलॅबच्या कार्यपद्धतीमध्ये खऱ्याखुऱ्या मालवेअरचा वापर करून प्रत्यक्ष जगातील सायबर धमक्यांच्या सिम्युलेटेड आवृत्तींचा वापर करण्यात आला होता. क्विक हीलच्या सेफ ब्राऊझिंग अँड सेफ बँकिंग मॉड्युलने यूजर्सना ऑनलाइन बँकिंगवरील हल्ल्यांविरोधात सुरक्षा पुरविण्याच्या बाबतीत अतुलनीय परिणामकारकतेचे प्रदर्शन केले. हे प्रमाणन म्हणजे क्विक हीलने सर्वोत्कृष्टतेप्रती, नवसंकल्पनांच्या प्रती आणि जगभरातील यूजर्ससाठी डिजिटल जग ही अधिक सुरक्षित जागा बनविण्याप्रती जपलेल्या बांधिलकीचे द्योतक आहे.

 

Related posts

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, 24 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या चित्रपटाचा सिक्वेल ‘झिम्मा2!’

Shivani Shetty

टाटा मोटर्स आणि महेश कार्गो मूव्‍हर्स प्रत्‍येक मैलामध्‍ये देत आहेत सर्वोत्तम सेवा

Shivani Shetty

टाटा मोटर्सने मॅजिकच्‍या ४ लाख आनंदी ग्राहकांचा टप्‍पा साजरा केला; अद्वितीय मॅजिक बाय-फ्यूएल लाँच

Shivani Shetty

Leave a Comment