maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा आदरातिथ्‍य क्षेत्रात प्रवेश

मुंबई, १ फेब्रुवारी २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपला नवीन संयुक्‍त उद्यम: लक्‍झरीअस पंचतारांकित हॉटेलचा प्रस्‍ताव मांडत बोर्डाकडून तत्त्वत: मान्‍यतेची घोषणा केली आहे. हे पंचतारांकित हॉटेल अयोध्‍येमधील प्रतिष्ठित श्रीराम मंदिराजवळ धोरणात्‍मकरित्‍या स्थित आहे. हा उपक्रम यात्रेकरू आणि पर्यटकांचा आध्‍यात्मिक प्रवास अधिक संपन्‍न करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे. हॉटेलचे प्राइम लोकेशन प्रतिष्ठित मंदिरापासून १ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे, ज्‍यामुळे अतिथींना आध्‍यात्मिकता आणि लक्‍झरीच्‍या अद्वितीय संयोजनाची खात्री मिळते.

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्‍थापक श्री. निशांत पिट्टी म्‍हणाले, ”आम्‍हाला नवीन संयुक्‍त उद्यमाप्रती आमच्‍या उद्देशाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा उत्‍साहवर्धक उपक्रम लक्‍झरीमध्‍ये वाढ करण्‍यासह अयोध्‍येच्‍या धार्मिक वातावरणामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतो. श्रीराम मंदिराच्‍या प्राणप्रतिष्‍ठेनंतर अयोध्‍येला २.४ दशलक्षांहून अधिक अभ्‍यागतांच्‍या भेटीसह शहर व्‍यवसायासाठी प्रमुख गुंतवणूक गंतव्‍य म्‍हणून उदयास आले आहे, तसेच पर्यटक व आमंत्रित अतिथींसाठी डिझाइन करण्‍यात आलेले आदरातिथ्‍य पर्याय त्‍यांना आध्‍यात्मिकतेच्‍या समाधानकारक प्रवासाचा आणि उच्‍चस्‍तरीय आदरातिथ्‍येचा अनुभव देतात.”

संयुक्‍त उद्यम सहयोगींपैकी इझमायट्रिप एक निगमन अंतर्गत प्रकल्‍पाचे नेतृत्‍व करत असलेली कंपनी जीवानी हॉस्पिटॅलिटी प्रायव्‍हेट लिमिटेडमध्‍ये जवळपास १०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. अंतिम मान्‍यतेनंतर ही गुंतवणूक इक्विटी स्‍वॅपच्‍या माध्‍यमातून जेव्‍ही कंपनीच्‍या एकूण पेड-अप शेअर भांडवलामध्‍ये ५० टक्‍क्‍यांचे योगदान देईल. याबाबत सविस्‍तर माहिती सहभागी पक्षांनी मान्‍य केलेल्‍या प्रस्‍तावित जेव्‍ही व्‍यवहारामध्‍ये देण्‍यात आली आहे.

इझमायट्रिपचे प्रवास कौशल्‍य आणि जीवानी हॉस्पिटॅलिटीच्‍या सर्वोत्तमतेप्रती कटिबद्धतेचा फायदा घेत संयुक्‍त उद्यमाचा अयोध्‍यामध्‍ये नवीन लक्‍झरी मानक स्‍थापित करण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमामधून इझमायट्रिपचे धोरणात्‍मक विस्‍तारीकरण आणि भारतीय पर्यटन विकासाप्रती समर्पितता दिसून येते. अनावरण करण्‍यात आलेल्‍या उच्‍चस्‍तरीय मालमत्तेमधून इझमायट्रिपची विश्रांतीसाठी व व्‍यवसायासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपवादात्‍मक अनुभव देण्‍याप्रती कटिबद्धता निदर्शनास येते.    

Related posts

इझमायट्रिपचा लीप इअर ट्रॅव्‍हल सेल लाँच

Shivani Shetty

विजय सेल्सच्या ख्रिसमस आणि एंड ऑफ न्यू इअर सेलला सुरुवात

Shivani Shetty

बोईंगने P-8I साठी आखला आत्‍मनिर्भर भारत भविष्‍याचा आराखडा

Shivani Shetty

Leave a Comment