मुंबई, भारत—22 फेब्रुवारी 2024— जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या सर्वांत व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार 12थ फेल कलाकार मेधा शंकरला मिळत असल्याची घोषणा केली आहे. ह्या पुरस्कारामध्ये IMDB app वर सर्वाधिक परफॉर्म करणा-या प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजमधील कलाकारांना नावाजले जाते. त्यामध्ये जगभरातून दर महिन्याला IMDb वर येणा-या 20 कोटीपेक्षा विजिटर्सचे वास्तविक पेज व्ह्यूज लक्षात घेतले जातात व हा निषक करीअरमध्ये कोणता कलाकार ब्रेकथ्रू मूमेंटच्या जवळ आहे, ह्याचे अतिशय अचूक प्रेडीक्शन करणारा ठरला आहे.
शंकरला सध्या विधू विनोद चोप्राचा चरित्रात्मक नाट्य चित्रपट 12थ फेलमध्ये बघता येईल व तो आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मांच्या (त्यांची भुमिका विक्रान्त मासीने) आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी ह्यांच्या (शंकरने केलेली भुमिका) ख-या जीवनावर आधारित आहे. चित्रपट स्ट्रीमिंगद्वारे रीलीज झाल्यानंतर शंकरला जानेवारीमध्ये प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या टॉप 10 यादीत तीन वेळेस स्थान मिळाले व दोन आठवडे ती पहिल्या स्थानावर होती.12थ फेल सध्या सर्वोच्च 250 भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे व त्याचे IMDb युजर रेटींग 9.1 आहे. शंकरने आधी काम केलेल्या भुमिकांमध्ये दिल बेकरार, मॅक्स, मिन, आणि मेओवझाकी आणि शादीस्थानचा समावेश आहे.
“IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, ही अतिशय विशेष बाब आहे व IMDb ह्या मूव्हीजवरील सर्वांत विश्वसनीय स्रोताकडून हे मिळाल्याचा वेगळा आनंद आहे,” मेधा शंकरने म्हंटले. “श्रोत्यांचे प्रेम माझ्यासाठी सर्वांत मोठे आहे आणि मला ह्या भुमिकेला इतके प्रेम दिल्याबद्दल मला माझ्या चाहत्यांना धन्यवाद द्यायचे आहेत.”
“जगभरातील श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणा-या व त्यांना आनंद देणा-या तिच्या 12थ फेलमधील सशक्त भुमिकेसाठी IMDb मेधाचे अभिनंदन करत आहे.” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडीया ह्यांनी म्हंटले.“ जगभरातील चाहते व मनोरंजन व्यावसायिकांनी IMDb वर तिचे जीवन व करीअरबद्दल अधिक जाणून घेण्याचा आनंद घेतला आहे आणि तिचा इतक्या लवकर सन्मान करताना व तिला ह्या पुरस्कारासह पुढे सफल होताना बघताना आम्हांला आनंद होत आहे.”
शंकरच्या पुरस्काराचे प्रस्तुतीकरण इथे पाहता येईल. IMDb युजर्स शंकरच्या चित्रपटातील व अन्य भुमिकांची टायटल्ससुद्धा imdb.com/watchlist इथे त्यांच्या IMDb वॉचलिस्टमध्ये जोडू शकतात.
आधीच्या IMDb ‘ब्रेकआउट’ स्टारमीटर पुरस्काराच्या विजेत्यांमध्ये भुवन अरोरा, अंगिरा धर, आदर्श गौरव, एश्ले पार्क, नताशा भारद्वाज, अयो एडिबिरी आणि रेगे- जीआँ पेज. IMDb स्टारमीटर पुरस्कारांबद्दल अधिक माहिती इथे वाचा imdb.com/starmeterawards.