मुंबई, ७ डिसेंबर २०२३: स्कँडलस फूड्स या रेस्टॉरंट आणि कॅटरिंग उद्योगासाठी जेवणानंतरची खाण्याची सवय म्हणून भारतीय मिठाईची श्रेणी निर्माण करण्याचा हेतू असलेल्या वन स्टॉप शॉपने अंथिल अँजेल फंड, इव्हॉल्वएक्स, व्हॅल्यू३६० आणि सॅफायरइंक व्हेंचर्स यांच्या पाठिंब्याने सध्याच्या प्री सीड फंडिंग फेरीत १.६ कोटी रूपये उभारले आहेत. या फंडिंग फेरीतील अँजेल गुंतवणूकदारांमध्ये वॉव! मोमोचे संस्थापक सागर दर्यानी, वी फाऊंडर सर्कल आणि एक्स-इंडियामार्टचे सहसंस्थापक विकास अग्रवाल आणि सेलिब्रेटी शेफ हरपाल सिंग सोखी यांचा समावेश आहे.
ही कंपनी आपले उत्पादन युनिट नाशिकमध्ये उभारण्यासाठी आणि उत्पादन ऑटोमॅटिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करणार आहे. त्याचबरोबर ती या निधीचा वापर एका वर्षात २५० टचपॉइंट्सवरून २००० टचपॉइंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी करेल. या योजनेत पाच शहरांच्या पुढे आपल्या संस्थात्मक विक्रीचा विस्तार करणे आणि मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये कार्यान्वयन दुप्पट करणे या गोष्टींचाही समावेश आहे. ही कंपनी जास्त शेल्फ लाइफ असलेल्या आणि अत्यंत स्वादिष्ट जास्तीत-जास्त भारतीय मिठाया आणण्यासाठी उत्पादन विकासावर खर्च करण्याच्या योजना आखत आहे. एक बी२बी कंपनी म्हणून स्कँडलस फूड्स होरेकॅ उद्योगात प्रसार करण्याच्या योजना आखत आहे.
स्कँडलस फूड्सचे सीईओ आणि सीपीओ संकेत एस म्हणाले की, “आम्ही खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी अत्यंत धमाल प्रवास सुरू केला आहे. नवीन निधी उपलब्ध झाल्यामुळे आम्ही आमची उत्पादन सुविधा विस्तारित करू आणि कार्यक्षमतेसाठी ऑटोमेशनचा पर्याय निवडू. आमची नावीन्यपूर्णतेप्रति वचनबद्धता विविध लोकांच्या आवडी पूर्ण करणाऱ्या नवीन उत्पादनांच्या विकासात दिसून आली आहे. आम्ही लग्न आणि कॉर्पोरेट कॅटरिंग संधींमध्ये प्रवेश करून तसेच लहान क्यूएसआरपर्यंत व्याप्ती वाढवून नवीन पाया रचण्यासाठी सज्ज आहोत. बी२बी२सी महत्त्वाकांक्षांनी सज्ज आम्ही आमच्या ब्रँडअंतर्गत होलसेल मिठाई दुकान सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या निधीमुळे आम्हाला लोकांचे क्षण गोड करणे आणि एका वेळी एक चविष्ट उद्योग सुरू करणे हे शक्य होईल.”
आपल्या पारंपरिक भारतीय मिठायांसोबत स्कँडलस फूड्सने मिठायांसाठी जेवणानंतरच्या खाण्यासाठीच्या खरेदी क्षेत्रात २० अब्ज डॉलर्सची संधी शोधली आहे. हीच गोष्ट पुढे नेत असताना या ब्रँडने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये सिंगल सर्व्ह स्वरूपात मिठाया आणल्या आहेत. त्यांना पुढे जाऊन एथनिक बार्स, कुकीज, कपकेक्स आणि अंतिमतः मिठाई सॅशे आणायचे आहेत.