maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फॅशन ब्रँड ‘न्यूमी’चे मुंबईत पदार्पण

मुंबई, ६ डिसेंबर २०२३: जेनझीसाठी तयार करण्यात आलेले, नवे, आधुनिक स्टार्टअप न्यूमीने मुंबईच्या उत्साहाने सळसळणाऱ्या बाजारपेठेत पदार्पण केल्याची घोषणा केली आहे. मालाडमधील इन्फिनिटी मॉलमध्ये न्यूमीने आपले पहिले स्टोर सुरु केले आहे. मुंबईच्या उपनगरांमधील एक प्रीमियम मॉल मानल्या जाणाऱ्या इन्फिनिटी मॉल, मालाडमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेले हे स्टोर ३६०० चौरस फुटांचे आहे. जेनझीला ज्याप्रकारे खरेदी करायला आवडते, खरेदीसाठी वेगवेगळ्या वस्तू ज्याप्रकारे शोधायला आवडतात ते ध्यानात घेऊन हे स्टोर डिझाईन करण्यात आले आहे.

न्यूमीचे नवे स्टोर फक्त एक शॉपिंग डेस्टिनेशन नाही तर ‘सेल्फी सॅव्ही जनरेशन’साठी ‘इन्स्टाग्रामेबल’ इंटेरियर याठिकाणी बनवण्यात आले आहे, त्यासाठी विशिष्ट कॉर्नर्स सजवण्यात आले आहेत, डिजिटल नेटिव्ह ग्राहकांना आकर्षक कन्टेन्ट तयार करता यावा यादृष्टीने हे स्टोर एक अनोखे आणि सर्वांच्या पसंतीचे ठिकाण ठरेल.

न्यूमीचे सह-संस्थापक आणि सीईओ श्री. सुमित जसोरिया यांनी सांगितले, “भारताची फॅशन राजधानी मुंबईमध्ये आमचे पहिले स्टोर सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. भारतातील मनोरंजन विश्वाचा केंद्रबिंदू मुंबई आहे आणि फॅशनच्या बाबतीत हे शहर ट्रेन्डसेटर आहे, त्यामुळेच आम्ही आमच्या ऑफलाईन उपस्थितीसाठी दुसरे शहर म्हणून मुंबईची निवड केली. मालाड व आजूबाजूच्या परिसरामध्ये आमचे अनेक मुंबईकर ग्राहक राहतात त्यामुळे आम्ही इन्फिनिटी मॉलची निवड केली. या वृद्धी प्रवासाच्या पुढील टप्प्यांसाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत आणि पुढील वर्षभरात भारतभरात १२ पेक्षा जास्त स्टोर्स सुरु करून देशातील जास्तीत जास्त फॅशन फॉरवर्ड ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आमची योजना आहे. आम्हाला खात्री आहे की या गतीने पुढे जात आम्ही लवकरच भारतामध्ये जेनझीचा सर्वात लाडका ब्रँड म्हणून प्रसिद्धी मिळवू.”

भारतातील फास्ट-फॅशन उद्योगक्षेत्रात नवीन आणि ट्रेंडी फॅशन-फॉरवर्ड डिझाइन्स सहज परवडण्याजोग्या किमतींना उपलब्ध करवून देऊन या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणण्याचा न्यूमीचा प्रयत्न आहे. हा ब्रँड दर आठवड्याला ५०० पेक्षा जास्त डिझाइन्स लॉन्च करतो आणि पुरवठा शृंखला जास्तीत जास्त कार्यक्षम व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. आधुनिक फॅशन कंपन्यांच्या नेहमीच्या ऑनलाईन उपस्थितीऐवजी न्यूमीने ओम्नीचॅनेल दृष्टिकोन स्वीकारण्याचे ठरवले आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि मार्केटिंग धोरणे यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी न्यूमीने लक्षणीय वृद्धी नोंदवली आहे.

भारतामध्ये जेनझी मुली व महिलांमध्ये आपला प्रभाव निर्माण करणारा सहजसाध्य फॅशन ब्रँड म्हणून न्यूमी आपली ओळख मजबूत करत आहे. जेनझीच्या आवडीनिवडीची सखोल माहिती आणि तंत्रज्ञानाची शक्ती यांना एकत्र करून या ब्रँडने फॅशन उद्योगक्षेत्रात स्वतःचे अनोखे स्थान निर्माण केले आहे. आता न्यूमीने ब्रँडचा रिटेल विस्तार करत, देशभरातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून जेनझी फॅशन उत्साहींना प्रभावित करण्याचे धोरण पुढे देखील सुरु ठेवण्याचे ठरवले आहे.

Related posts

मिनोषा इंडिया लिमिटेडने लेझर प्रिंटर्सची स्‍मार्ट श्रेणी लाँच केली

Shivani Shetty

पेटीएमचा महसूल वार्षिक २५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ९,९७८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला

Shivani Shetty

एिझकॉम टेल-सिटस लमटेडची 27 फे वु ार 2024 रोजी सु होणार ाथमक स ा व ज न क ऑ फ र

Shivani Shetty

Leave a Comment