मुंबई, ७ डिसेंबर २०२३: पुरुषांसाठी ग्रूमिंगची असंख्य उत्पादने बाजारात दाटीवाटीने हजर असताना आणि ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी धडपडत असताना ब्रवाडो या नव्या धाडसी आर्टिसान लक्झरी ब्रॅण्डने ‘इम्प्रेसिंग युअरसेल्फ’ या संकल्पनेवर भर देत या क्षेत्रासाठी एक नवी कहाणी रचली आहे. मुंबईतील कॉस्मोप्रोफ इंडिया २०२३ मध्ये ब्रवाडोने आपल्या अत्यंत विचारपूर्वक निवडलेल्या वेचक उत्पादनांचे अनावरण केले. सर्वोत्तम प्रतीची फॉर्म्युलेशन्स, पर्यावरणपूरकता, क्रूरता-मुक्त घटकांचा वापर यांवर भर देत तसेच इतरांकडून पसंतीची मोहोर उमटण्याची वाट न पाहता आपल्या वैयक्तिक स्वास्थ्याला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या स्वत:च्या देखभालीला प्रोत्साहन देत मेन्स ग्रूमिंग क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
या वेळी ब्रॅण्डने नैसर्गिक घटकांपासून बनविलेली, हेअर केअर, फेस केअर, दाढी व मिशीची देखभाल तसेच बॉडी केअर अशा चार वेगवेगळ्या श्रेणींतील उत्पादनांचे अनावरण झाले.
वैज्ञानिक संशोधनाचे पाठबळ लाभलेल्या ब्रवाडोच्या २३ उत्पादनांमध्ये जपानी स्प्रिंग वॉटर अॅलेगीचा अर्क असलेल्या R3 नाइट क्रीमपासून ते बल्बाइन फ्रुटेसन्स या दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या वनस्पतीचा प्रमुख घटक म्हणून वापर असलेले ऑक्युलक्स अंडर आय जेलपर्यंत विविध उत्पादनांचा समावेश आहे. इतर उत्पादनांमध्ये आगळावेगळा सान्स-क्वा वॉटरलेस फेसवॉश, इल्युमिनेट फेस क्रीम, आर्टिस्ट हेअर पोमेड, आर्टिस्ट क्रिस्टल हेअर वॅक्स आणि फेस स्कल्प्ट अँटी-एजिंग क्रीम यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने हानीकारक रसायनांपासून आणि मिनरल ऑइल्सपासून मुक्त आहेत आणि केवळ जगभरातील वनस्पतींच्या अर्कांच्या खास वापरातून त्यांची निर्मिती झाली आहे.
विख्यात उद्योजक सुमित गुप्ता यांच्याद्वारे या उत्पादनांच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या दैनंदिन देखभालीसाठी सर्वोत्तम उत्पादने निवडणाऱ्या पुरुषांसाठी एक शाश्वत उंची पर्याय पुरविण्याचा ब्रॅण्डचा हेतू आहे.
“ब्रवाडो हे केवळ एक सौंदर्यप्रसाधन नाही, तर त्याहीपलीकडे खूप काही आहे. नैतिक मार्गाने स्वत:साठी सर्वोत्तम गोष्टींची निवड करण्याबद्दल आग्रही असणारा हा दृष्टीकोन आहे. उत्पादनश्रेणी नाविन्यपूर्ण आणि कल्पकही आहे व त्यातून मिळणारे परिणाम स्पष्ट दिसून येतात. मेन्स ग्रूमिंग क्षेत्राच्या आजवर पूर्ण न झालेल्या गरजांचा सखोल अभ्यास करून ही उत्पादने विकसित करण्यात आली आहेत आणि आपला हा दावा ती अत्यंत आत्मविश्वासाने सिद्ध करून दाखवितात.” गुप्ता म्हणाले.
या ब्रॅण्डच्या निर्मितीमागे असलेला विचार स्पष्ट करून सांगताना समाज कल्याणाचा ध्यास असणारे आणि धरतीमातेविषयीही तितकीच तळमळ असणारे गुप्ता म्हणाले की बहुतांश ब्रॅण्ड्स हे पर्यावरणाविषयी केवळ बोलतात आणि प्रत्यक्षात आपल्या कार्बन फूटप्रिंट्सविषयी निष्काळजीच असतात. शिवाय त्यांचा भर हा इतरांना प्रभावित करण्यावर अधिक असतो. “आम्हाला मात्र हे सारे चित्र बदलायचे आहे. एक लक्झरी ब्रॅण्ड म्हणून ब्रवाडोची पर्यावरणस्नेही ओळख निर्विवाद आहे. पर्यावरणाप्रती आमची बांधिलकी ही आमच्या उत्पादनांसाठी नैतिक पद्धतीने प्राप्त केलेल्या ऑर्गनिक घटकांतून आणि विघटनशील, पुनर्वापरक्षम तसेच रिफील करण्याजोग्या पॅकेजिंगसह त्यांचा प्रत्येक पैलू घडविताना आम्ही घेतलेल्या काळजी आणि देखभालीमध्ये दिसून येते.”
एक लक्षणीय बाब म्हणजे आपल्या निर्मिती प्रक्रियेमधून पर्यावरणावर आणखी भार येऊ नये याची काळजी टाकाऊ गोष्टींचे रिसायकलिंग आणि प्लास्टिकचा कमीत-कमी वापर यांच्या माध्यमातून घेण्यासाठी ब्रवाडो ब्रॅण्ड अधिकचे प्रयत्न करतो. आपल्या बहुतांश प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये २५-३० टक्के रिसायकल्ड साहित्याचा वापर करणारा हा ब्रॅण्ड शाश्वत कार्यपद्धतींशी बांधिलकी जपतो. तसेच, आपल्या कामकाजाच्या शाश्वततेच्या दृष्टीने होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन करण्याविषयी आग्रही असलेल्या व्हेंडर्स आणि पार्टनर्सबरोबर सहयोग साधण्याचा पर्याय ब्रॅण्डकडून निवडला जातो.
Pankhkh Inc या आपल्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक सुप्रसिद्ध ब्रॅण्ड्सचे मालक असणारे सुमित हे जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण पॅकेजिंग उपाययोजना पुरविणाऱ्या महिका पॅकेजिंग इंडिया लि. या अग्रगण्य कंपनीचे प्रवर्तकही आहेत.
ब्रवाडो हा ब्रॅण्ड आपल्या उत्पादनांच्या आणि संकल्पनेच्या माध्यमातून प्रचलित उत्पादनांपासून वेगळा दृष्टीकोन पुरविण्याची हमी देतो व त्यातून २०१८ सालच्या $६४३ मिलियन्सच्या उलाढालीपर्यंत २०३० सालापर्यंत $३.५ बिलियन्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा असलेल्या भारतीय पुरुषांसाठीच्या ग्रूमिंग उत्पादनांचे क्षेत्र काबीज करू पाहतो.
७ ते १० डिसेंबरदरम्यान कॉस्मोप्रोफ कार्यक्रमामध्ये ब्रवाडो सर्व श्रेणींमधली आपली नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पाहुण्यांसमोर ही उत्पादने मांडण्यासाठी तसेच या उत्पादनांच्या वापरांचे थेट प्रात्यक्षिक देण्यासाठी तज्ज्ञ स्टायलिस्ट तिथे हजर असणार आहेत.
ही उत्पादने कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच फ्लिपकार्ट, जिओ आणि अॅमेझॉकनसारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध असणार आहेत.