maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सेरेलॅकची भारतातील ५० वर्षे

नेस्लेचे सीरील आधारित पूरक अन्न सेरेलॅकने भारतातील आपल्या ५०व्या वर्षामध्ये प्रवेश केला आहे. नेस्ले इंडियाच्या पंजाबमधील मोगा इथल्या प्रमुख फॅक्टरीमध्ये १५ सप्टेंबर १९७५ रोजी सेरेलॅकच्या पहिल्या बॅचची निर्मिती करण्यात आली. आज, पंजाबमधील मोगा व हरयाणातील सामलखा फॅक्टरीमध्ये शेकडो समर्पित कर्मचारी त्याच सर्वोत्तम देखभालीने आणि ध्यासाने या दर्जेदार पोषक आहाराची निर्मिती करत आहेत.

गेल्या पाच दशकांमध्ये सेरेलॅकने स्थानिक स्त्रोतांपासून मिळविलेल्या उच्च दर्जाचे धान्य, दूधासह अन्य घटकांचा वापर करण्याप्रती आपली बांधिलकी जपली आहे. सेरेलॅकची प्रत्येक बॅच दर्जा तपासणीच्या कठोर फेऱ्यांतून (४० हून अधिक क्वालिटी टेस्ट्स) जाते, जेणेकरून प्रत्येक पॅक सेवनासाठी सुरक्षित असल्याची खातरजमा केली जावी.

जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरातील सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरता कमी करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावतात. या सूक्ष्म पोषक घटकांचे योग्य मात्रेमध्ये सेवन केल्याने शरीराचे स्वास्थ्य जपले जाण्यास मदत होते. भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून सेरेलॅक ६ महिने व त्यापुढील वयाच्या बाळांसाठी पूरक आहार उपलब्ध करून देत आहे. सेरेलॅकमध्ये १५ पोषक घटक* आहेत, ज्यांत जीवनसत्वे आणि खनिजांचा समावेश आहे व जे आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घरगुती आहाराला जोड म्हणून देता येते.

सेरेलॅकच्या न्यूट्रिशन प्रोडक्ट रेसिपीज या नेस्लेच्या जागतिक आरअँडडी नेटवर्कच्या सहयोगाने तसेच स्थानिक तज्ज्ञांच्या व आंतराष्ट्रीय पातळीवरील नवसंकल्पनांच्या मदतीने विकसित करण्यात आल्या आहेत.

या उत्पादनामध्ये नव्या संकल्पना अंतर्भूत करण्याच्या वाटचालीचा भाग म्हणून गेल्या ५ वर्षांत सेरेलॅकमधील वरकड साखरेचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणले गेले आहे. सेरेलॅकचा प्रक्रिया केलेली रिफाइन्ड साखरविरहित पर्याय बाजारात आणण्याची महत्त्वाकांक्षा नेस्लेने पूर्ण केली आहे. या प्रयत्नाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली आणि सेरेलॅकच्या रिफाइन्ड साखरविरहित नव्या पर्यायाच्या रूपाने हा प्रयत्न फळाला आला आहे. सेरेलॅकच्या भारतातील विस्तारित उत्पादनश्रेणीमध्ये आता २१ पर्यायांचा समावेश असेल, ज्यापैकी १४ पर्याय रिफाइन्ड साखरविरहहित असतील. यातील ७ पर्याय नोव्हेंबर २०२४ च्या अखेरीस उपलब्ध होतील आणि उर्वरित पर्याय त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये बाजारात येतील.

सेरेलॅकचा प्रवास हा फक्त सुरक्षित पोषण पुरविण्यापुरताच मर्यादित नाही; नेस्ले हे नाव सामुदायिकतेच्या व जबाबदारीच्या भावनेची जपणूक करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. नेस्ले इंडिया स्थानिक शेतकऱ्यांच्या निकट संपर्कात राहून काम करते, उत्पादनासाठी लागणारे घटक शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने प्राप्त व्हावे, कार्बन उत्सर्गाचे प्रमाण कमी व्हावे व आपल्या पृथ्वीचे भावी पिढ्यांसाठी जतन व्हावे याची खातरजमा करण्यासाठी कंपनी या शेतकऱ्यांच्या कौशल्यांत भर घालते व त्यांना प्रशिक्षण पुरवते.

त्यांच्या कौशल्यांत भर घालते आणि प्रशिक्षण देते. भूजलाचा वापर कमी करण्यासाठी मोगा आणि सामलखा कारखान्यामध्ये Zer’ Eau तंत्रज्ञानाच्या यशस्वी अंमलबजावणीद्वारे दूधापासून अलग केलेले पाणी रिसायकल केले जाते. नेस्लेने भारतभरातील शेतकरी, पुरवठादार आणि वितरकांबरोबर तयार केलेल्या विश्वासाच्या, आधाराच्या आणि भागीदारीच्या नात्यामुळे सेरेलॅकचा भारतातील प्रवास शक्य झाला आहे. नेस्ले इंडिया यापुढेही आपल्या उत्पादनांमध्ये नवे बदल करण्यासाठी व आपल्या ग्राहकांना कालसुसंगत, पोषक आणि स्थानिक चवी व आवडीनिवडींना साजेसे अधिक पर्याय देण्यासाठी नेस्लेच्या जागतिक आरअँडडी नेटवर्कचा लाभ घेत राहील.

Related posts

मॅक्सहबने नवीन इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले आणि कॅमेरा सोल्युशन्स लॉन्च केली

Shivani Shetty

येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसह लक्‍झरी राहणीमानाला भारतीयांची पसंती: हाऊसिंग डॉटकॉम

Shivani Shetty

ABB ने यंत्रीकरण के लिए डिजिटल संपत्ति प्रदर्शन प्रबंधन प्लेटफॉर्म लॉन्च किया

Shivani Shetty

Leave a Comment