मुंबई, २८ ऑक्टोबर २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज इंटरमीजीएट, लाइट अँड मेडियम कमर्शियल वेईकल्स (आयएलएमसीव्ही) श्रेणीमधील १५ लाख ट्रक्सच्या विक्रीच्या ऐतिहासिक टप्प्याची घोषणा केली. टाटा मोटर्स हा टप्पा गाठणारी देशातील एकमेव ट्रक उत्पादक कंपनी ठरली आहे. या यशस्वी टप्प्याला साजरे करण्यासाठी टाटा मोटर्सने टाटा एसएफसी ४०७ गोल्ड, टाटा एलपीटी, टाटा एसएफसी ७०९जी, टाटा एलपीटी ११०९जी, टाटा एलपीके १११२ आणि टाटा एलपीके १४१६ ट्रक्स व टिपर्सच्या श्रेणीचे नवीन व्हेरिएण्ट्स लाँच केले आहेत. तसेच, कंपनीने पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक आर्थिक योजना, तसेच सर्व आयएलएमसीव्ही ट्रक्सवर ६-वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील लाँच केली आहे, ज्यामधून ग्राहकांना परिपूर्ण समाधानाची खात्री मिळेल.
आयएलएमसीव्ही श्रेणीमध्ये एकूण वेईकल वजन ४ ते १९ टनपर्यंत असलेल्या ट्रक्सचा समावेश आहे, ज्यामुळे कृषी, ई-कॉमर्स, बांधकाम व लॉजिस्टिक्स अशा क्षेत्रांमधील ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता होते. श्रेणीमध्ये उच्च दर्जाचे, इंधन-कार्यक्षम सोल्यूशन्सच्या व्यापक रेंज देत टाटा मोटर्स कमी मालकीहक्क खर्च आणि उच्च वेईकल अपटाइमची खात्री देते, ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायद्याची खात्री मिळते.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्सचे ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, “१५ लाख विक्रीचा टप्पा गाठणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. यामधून आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि निष्ठा दिसून येते, तसेच त्यांच्या कार्यसंचालनांमध्ये वाढ करणारे नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स देण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होते. आमचे नवीन व्हेरिएण्ट्स आणि विस्तारित वॉरंटी उत्पन्न क्षमता वाढण्यासाठी, तसेच दीर्घकाळापर्यंत मन:शांतीची खात्री देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामुळे आम्ही त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत राहण्याची खात्री मिळेल. आम्ही पुढे जात असताना ग्राहक-केंद्रित सुविधांवर लक्ष केंद्रित करत राहू, तसेच दीर्घकालीन विकास व यशाला चालना देण्यामध्ये बहुमूल्य सहयोगी म्हणून आमची भूमिका अधिक दृढ करू.”
सर्वांगीण गतीशीलता सोल्यूशन्स प्रदाता म्हणून टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांमध्ये प्रगत वैशिष्ट्ये, कार्यक्षम पॉवरट्रेन्स आणि सर्वोत्तम मूल्यवर्धित वैशिष्ट्ये आहेत. आयएलएमसीव्ही पोर्टफोलिओमध्ये विविध केबिन पर्याय जसे एलपीटी, एसएफसी, सिग्ना व अल्ट्रा श्रेणी, तसेच विविध डेक लांबी व बॉडी स्टाइल्सचा समावेश आहे. उत्पादनांच्या व्यापक श्रेणीला टाटा मोटर्सच्या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाचे पाठबळ आहे, ज्यामधून सर्वसमावेशक वाहन जीवनचक्र व्यवस्थापनासह ब्रेकडाऊन असिस्टण्स, गॅरण्टीड टर्नअराऊंड टाइम्स, वार्षिक देखभाल करार (एएमसी) आणि जेन्यूएन स्पेअर पार्ट्सची सहज उपलब्धता यांचा समावेश आहे. तसेच, टाटा मोटर्स ताफा व्यवस्थापन सानुकूल करण्यासाठी आणि एकूण मालकीहक्क खर्च कमी करत वेईकल अपटाइम वाढवण्यासाठी स्वत:चे कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजचा फायदा घेते. देशभरात टाटा मोटर्सचे २५०० हून अधिक सेल्स व सर्विस टचपॉइण्ट्स आहेत, जे त्यांच्या वेईकल्ससाठी सर्वोच्च अपटाइम देतात.