मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३: आयथिंक लॉजिस्टिक्स या प्रगत लॉजिस्टिक्स तंत्रज्ञानामधील अग्रणी आणि आघाडीच्या शिपिंग प्लॅटफॉर्मने देशातील प्रमुख पोस्टल नेटवर्क इंडिया पोस्टसोबत सहयोग केला आहे. या सहयोगामधून उल्लेखनीय तंत्रज्ञान एकीकरण सादर करण्यात येईल, जे लास्ट-माइल डिलिव्हरीच्या क्षेत्राला नवीन आकार देण्याची खात्री आहे. हा धोरणात्मक सहयोग भारतभरातील डायरेक्ट-टू-कंझ्युमर (डी२सी) स्टार्टअप्स आणि स्मॉल अॅण्ड मेडियम बिझनेसेस (एसएमबी) यांना अनेक फायदे देईल.
या सहयोगाची खासियत म्हणजे डी२सी व्यवसायांना सक्षम करण्याचे आणि शहरी भागांमधील त्यांची पोहोच वाढवण्याचे संयोजित मिशन आहे. २०२२ मध्ये द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील ई-कॉमर्स प्रवेश दर अनुक्रमे २१.४ टक्के व ४१.५ टक्के होता. मार्केटप्लेस मधिल प्रमुख कंपन्या जसे फ्लिपकार्ट, मिंत्रा व मीशो यांनी या प्रदेशांमध्ये प्रबळ उपस्थिती दर्शवली असताना देखील स्वावलंबी ई-कॉमर्स ब्रॅण्ड्सना अनेकदा मर्यादित सेवाक्षमतेच्या आव्हानाचा सामना करावा लागतो.
आयथिंक लॉजिस्टिक्सच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह इंडिया पोस्टच्या व्यापक पोहोच चे संयोजन या आव्हानाचे प्रत्यक्षरित्या निराकरण करते. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत इंडिया पोस्टच्या अद्वितीय पोहोचसह आयथिंक लॉजिस्टिक्सचे प्रगत तंत्रज्ञान व जलद सेवांचे संयोजन करत लॉजिस्टिक्स ऑपरेशन्समध्ये क्रांतिकारी परिवर्तन होणार आहे. हे दोन महत्त्वपूर्ण घटक आजच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या व्यवसाय वातावारणामध्ये प्रगती करण्याकरिता डी२सी कंपन्यांसाठी महत्त्वाचे आहेत.
आयथिंक लॉजिस्टिक्सच्या सह संस्थापिका कुमारी झैबा सारंगम्हणाल्या, ”आम्ही इंडिया पोस्टसोबतच्या या उल्लेखनीय सहयोगाबाबत खूप आनंदित आहोत. आमच्या सहयोगामधून दृष्टीकोन व नाविन्यतेचे संयोजन दिसून येते, जेथे आम्ही डायरेक्ट-टू-कंझ्युमर स्टार्टअप्स आणि स्मॉल अॅण्ड मीडियम बिझनेसेसना लॉजिस्टिकल सर्वोत्तमतेच्या नवीन युगाकडे घेऊन जाण्यासाठी इंडिया पोस्टची तंत्रज्ञान क्षमता व व्यापक पोहोचचा फायदा घेण्यास सज्ज आहोत. या सहयोगासह आम्ही भौगोलिक तफावत दूर करण्यासह सर्व प्रकारच्या व्यवसायांना ई-कॉमर्सची संपूर्ण क्षमता अंगिकारण्यामध्ये सक्षम करत आहोत, तसेच ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणत ग्राहक अनुभवामध्ये वाढ करत आहोत.
इंडिया पोस्टमधील मेल्सचे पीएमजी व महाराष्ट्र पोस्टल सर्कलचे बीडी श्री. अमिताभ सिंग म्हणाले, ”इंडिया पोस्टला या परिवर्तनात्मक प्रयत्नामध्ये आयथिंक लॉजिस्टिक्ससोबत सहयोग करण्याचा अत्यंत अभिमान वाटतो. दशकांपासून निर्माण करण्यात आलेल्या आमच्या सेवेच्या वारसासह संयोजित आयथिंक लॉजिस्टिक्सची भविष्यकालीन तंत्रज्ञान क्षमता लॉजिस्टिक्स क्षेत्रातील नवीन युगाला सुरूवात करते. या सहयोगामध्ये परंपरा व नाविन्यतेचे संयोजन आहे आणि यामधून भारतातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या नवीन संधी मिळतात. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले आमचे देशव्यापी नेटवर्क आयथिंक लॉजिस्टिक्सच्या अत्याधुनिक सोल्यूशन्सप्रती योग्यरित्या पूरक आहे.”
या व्यवस्थेचे उल्लेखनीय पैलू म्हणजे कमी विकसित लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या ग्रामीण भागांमध्ये किफायतशीर डिलिव्हरी सुविधा निर्माण करण्याची क्षमता करून देणे आहे . इंडिया पोस्टचा अनुभव व व्यापक नेटवर्क आयथिंक लॉजिस्टिक्सच्या तंत्रज्ञान क्षमतांशी पूरक आहेत, ज्यामधून कार्यक्षमता, विश्वासार्हता व सुधारित ग्राहक समाधानाची खात्री मिळते.
शिपमेंट्सचे आकारमान वाढत असताना लॉजिस्टिकल-संबंधित चौकशी देखील वाढत आहेत जसे ‘डब्ल्यूआयएसएमओ’ (व्हेअर इज माय ऑर्डर?), जे ग्राहकांसाठी खरेदीनंतर त्रास वाढवू शकते. यांसदर्भात आयथिंक लॉजिस्टिक्सचे प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे, ज्याचा कस्टमर सपोर्टप्रती सक्रिय दृष्टीकोन आहे आणि एकूण खरेदी अनुभव वाढवतो.
इंडिया पोस्ट आणि आयथिंक लॉजिस्टिक्स यांच्यामधील हा उल्लेखनीय सहयोग अविस्मरणीय पाऊल आहे, जो देशभरातील लास्ट-माइल डिलिव्हरी ऑपरेशन्स सुरळीत करण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या क्षमतांचा लाभ घेतो. सुधारित उपलब्धता, ऑपरेशनल एफिशिएन्सी व अद्वितीय ग्राहक अनुभवावर लक्ष केंद्रित करत हा सहयोग सर्वसमावेशक ईकॉमर्स क्षेत्रातील डी२सी स्टार्टअप्स व एसएमबींच्या विकासाला चालना देण्यास सज्ज आहे.