नवी मुंबई, २८ ऑक्टोबर २०२४- नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयाच्या वतीने नुकतीच स्तन कर्करोगाविषयी जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली होती. जगभरात स्तन कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी, म्हणून नामांकित रुग्णालये, डॉक्टर्स आणि विविध संस्थांच्यावतीने ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जनजागृती केली जाते. स्तन कर्करोगावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी लवकर निदान होणे गरजेचे असते, हा संदेश लोकांपर्यत पोहोचावा म्हणून नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयाने नुकतेच #TalkPink मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेच्या माध्यमातून रुग्णालयाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. विविध सामूहिक आणि कार्यालयातील महिलांची वैद्यकाय तपासणी शिबीरे, चर्चासत्रे आयोजित केली गेली. विविध कार्यक्रम राबवले गेले. या मोहिमेत ६ हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.
मोहिम सर्वदूर पोहोचावी म्हणून अपोलो रुग्णालयात स्थानिक पातळीवर स्तन कर्करोगाचे निदान करणारी मॅमोग्राफी चाचणी महिलांना मोफत उपलब्ध करुन दिली. शिवाय विविध भागांत चर्चासत्रांचे आयोजन केले. या उपक्रमांत ५०० महिलांनी सहभाग नोंदवला. विविध कार्यालयांमध्ये रुग्णालयाकडून उपक्रमांचे आयोजन केले. महिलांचे आरोग्य, स्तन कर्करोग या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात साडेचार हजारांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. २६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात ७० नागरिकांनी सहभाग घेत मोहिमेला पाठिंबा दर्शवला. स्तन कर्करोगाशी यशस्वी लढा देणा-या ४० महिलांना रुग्णालयाने कॅण्डल मॅडिटेशन, फिजीओथेअरपी, मसाज आदी मोफत सेवा पुरवल्या गेल्या.
डॉ. निता नायर, मुख्य सल्लागार-स्तन कर्करोग सर्जरी, अपोलो रुग्णालय, नवी मुंबई यांनी कर्करोग जनजागृती मोहिमेचे महत्त्व विशद केले,”स्तन कर्करोगाचे वेळेवर निदान झाले की यशस्वीरित्या मात करणे शक्य आहे, असे त्या म्हणाल्या. देशात वाढत्या स्तन कर्करोगाच्या केसेसविषयीही त्यांनी माहिती दिली. ‘’ देशात प्रत्येक २२ महिलांमधील एका महिलेला स्तन कर्करोगाचे निदान होत आहे. स्तन कर्करोगाचे त्वरित निदान झाले की रुग्णाला कर्करोगाच्या विळख्यातून वाचवता येणे शक्य आहे. दुर्दैवाने ४० टक्के महिला गंभीर स्वरुपातील स्तन कर्करोगाची पातळी गाठल्यावर आमच्याकडे उपचारांसाठी येतात. दिरंगाईने उपचारांसाठी येणा-या महिलांचा जीव वाचवणे हे आव्हानात्मक ठरते. स्तन कर्करोगाविषयी जनजागृती प्रभावीपणे राबवली पाहिजे. अपोलो रुग्णालयात स्तन कर्करोग निदान कार्यक्रम राबवत तपासणीचा अहवाल २४ तासांच्या आत उपलब्ध होतो. केवळ अपोलो रुग्णालयात कमी कालावधीत स्तन कर्करोगाच्या तपासणीचा वैद्यकीय अहवाल उपलब्ध होतो. रुग्णांच्या तपासणीत स्तन कर्करोगाविषयी लक्षणे आढळून आल्यास निदान चाचणी सुचवली जाते. या चाचणीतून तत्काळ आणि अचूक अहवाल उपलब्ध होतो.’’
अरुणेश पुरेथा, मुख्य कार्ककारी अधिकारी, प्रादेशिक-पश्चिम विभागाचे, अपोलो रुग्णालय म्हणाले,‘’ स्तन कर्करोगाचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालय प्रशासनाकडून जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात आहेत. महिला रुग्णालयात तपासणीसाठी दाखल होताच त्यांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. रुग्णांना तपासण्या तसेच इतर आवश्यक चाचण्यांचा वैद्यकीय अहवाल तातडीने पुरवणे तसेच तत्काळ उपचार उपलब्ध करुन देणे, याकडे आमचा कटाक्ष असतो. स्तन कर्करोगावर प्रतिबंध यावा म्हणून आम्ही अपोलो हेल्थ चेक ऑन व्हील्स ही योजना सुरु करत आता स्थानिक पातळीवरही उपक्रम सुरु केले आहेत. आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गल्लीबोळ्यात राहणा-या महिलांची, विविध समूहांतील तसेच कार्यालयातील महिलांचीही तपासणी करत आहोत. महिला कर्करोग क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांना कोणीही अडसर भासू नये म्हणून सर्व महिला कर्मचा-यांचा समावेश करण्यात आला आहे.‘’