फेब्रुवारी २०२५ – कोका-कोला गेम-चेंजिंग नवीन मोहिम ‘हाफटाइम’ सुरू करत आहे, जी चाहत्यांना थांबून पुन्हा जीवनातील उत्साहाचा आनंद घेण्यास प्रेरित करते. स्पोर्ट्समधील हाफटाइमच्या वैश्विक पैलूमध्ये सामावलेली ही मोहिम सामान्य पॉजला अर्थपूर्ण अनुभवामध्ये बदलते.
जागतिक स्तरावर लाँच करण्यात आलेली मोहिम ‘हाफटाइम’ कथानक, ब्रँड जाहिराती आणि डिजिटल अनुभवांच्या एकत्रिकरणाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. ही मोहिम दाखवून देते की, जीवनातील साधा ब्रेक देखील उत्साहित करू शकतो. यामध्ये अग्रस्थानी आहे भारत देश, जेथे पहिल्या जाहिरातीमधून कोका-कोलाचा आस्वाद कंटाळवाण्या क्षणांना खास क्षणांमध्ये कशाप्रकारे बदलतो हे पाहायला मिळते. खेळाडू सामन्याच्या मध्यादरम्यान ब्रेक घेऊन त्वरित रिचार्ज होतात, अगदी त्याप्रमाणे ही मोहिम आपल्याला आठवण करून देते की जीवनात पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हाफटाइम घेणे.
या अनुभवामध्ये व्हीएमएल दिल्लीने निर्मिती केलेल्या उत्साही गाण्याने अधिक उत्साहाची भर केली आहे. या गाण्याचे दिग्दर्शन पुरस्कार-प्राप्त दिबाकर बॅनर्जी यांनी केले असून स्नेहा खानवलकर यांनी संगीतबद्ध केले आहे आणि गीत खुल्लर जी. यांचे आहे. हे गाणे अद्वितीय पद्धतीने दैनंदिन क्षणांना कॅप्चर करते, ज्यामुळे अत्यंत वास्तविक व संबंधित वाटते आणि हाफटाइमला जीवनाचा नैसर्गिक भाग बनवते.
व्हीएमएल इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बबिता बरूआ म्हणाल्या, “कोका-कोलाने नेहमी आपल्या मोहिमांसह संस्कृतीला नव्या उंचीवर नेले आहे. आमचा विश्वास आहे की, आम्ही हाफटाइम मोहिमेसह हीच गोष्ट साध्य केली आहे. या मोहिमेमधून दिली जाणारी माहिती वैश्विक आहे आणि खरेतर ही मोहिम भारतामधून सुरू होत असल्याने आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.”
दिबाकर बॅनर्जी म्हणाले, “हाफटाइम संकल्पनेसंदर्भात काम करताना ती आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये सामावून जाण्याला प्राधान्य देण्यात आले, जेथे आपण एक नाही तर अनेक गोष्टी करत आहेत. उदाहरणार्थ, आपल्या देशातील स्ट्रीट फेस्टिवलमध्ये आयोजक उपस्थित जमावाची काळजी घेतात आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्याची खात्री घेतात. म्हणून, हाफटाइम महत्त्वाचा आहे.”
कोका-कोका कंपनीचे भारतातील व नेऋत्य आशियामधील ऑपरेटिंग युनिटमधील कोका-कोला श्रेणीसाठी विपणनाचे वरिष्ठ संचालक कौशिक प्रसाद म्हणाले, “आजच्या धावपळीच्या जगामध्ये विरंगुळा घेऊन उत्साहित होण्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. दशकांपासून कोका-कोला व्यक्तींच्या प्रत्येक क्षणाचा भाग राहिले आहे, तसेच साध्या , पण उत्साहवर्धक ब्रेकचा आनंद देत आहे. ‘हाफटाइम’सह आम्ही या विरंगुळ्याला साजरे करण्यासोबत सहवास व उत्साहवर्धक क्षणांचा अनुभव देत आहोत, जे व्यक्तींना थंडगार कोका-कोलाचा आस्वाद घेत आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आणते.”
कोका-कोलाचा बिग गेम मोमेंट: हाफटाइम व क्रिकेटचा समन्वय
क्रिकेटचा हंगाम सुरू झाला असताना कोका-कोला २३ फेब्रुवारी रोजी खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याला अद्वितीय, परस्परसंवादी हाफटाइम अनुभवामध्ये बदलत आहे. प्रेक्षक सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान अॅसटन बँडवर असलेले क्यूआर कोड स्कॅन करू शकतात आणि विशेष लिमिटेड-टाइम ऑफरचा आनंद घेऊ शकतात. ही ऑफर आहे अर्ध्या किमतीमध्ये कोका-कोला. ही उत्साहवर्धक संकल्पना सामन्यामधील ब्रेकला संस्मरणीय, उत्साहवर्धक क्षणामध्ये बदलते आणि दाखवून देते की हाफटाइम फक्त विरंगुळा घेण्यासाठी नाही तर सेलिब्रेशन देखील आहे.
हाफटाइम मूव्हमेंटमध्ये सामील व्हा
आनंद साजरा करण्यापासून कॅमेऱ्यामध्ये क्षणांना कॅप्चर करण्यापर्यंत, माघार घेण्यापासून पुढे जाण्यापर्यंत कोका-कोलाची हाफटाइम मोहिम दैनंदिन विरंगुळ्याना उत्साहवर्धक क्षणांमध्ये बदलते. दिवसातील सर्वोत्तम भाग म्हणजे फक्त धावपळ करणे नाही तर कधी-कधी थोडेसे थांबून उत्साहवर्धक क्षणांचा आनंद देखील घेतला पाहिजे.