maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेराचा नवीन बॅचलर ऑफ सायन्स अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देणार विविध स्पेशलायझएशन्समधील प्रोग्राम्स स्वत: निवडण्याची संधी

मुंबई, १२ जानेवारी २०२३: युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेरा (University of Canberra) (UC) ऑस्ट्रेलियाने एक नवा बॅचलर ऑफ सायन्स (Bachelor of Science) अभ्यासक्रम आणला असून या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे विषयसमूह स्वत:हून निवडण्याची अधिक मोकळीक असणार आहे, व हे करताना त्यांना स्पेशलायझेशनसाठीच्या विविध क्षेत्रांचे विपुल पर्याय धुंडाळता येणार आहेत.

हा अभ्यासक्रम सेमिस्टर वन, २०२३ साठी उपलब्ध असणार आहे.

“पदवीधरांना करिअरच्या अधिक विस्तृत संधी खुल्या झाल्याचे आढळून येईल, ज्यात बायोमेडिकल सायन्टिस्ट, नॅचरल रिसोर्स मॅनेजर्स आणि पॉलिसी ऑफिसर्स यांसारख्या मोठी मागणी असलेल्या क्षेत्रातील नोकऱ्यांचा समावेश असणार आहे.” विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या एक्झेक्युटिव्ह डीन जेनिन डीकीन म्हणाल्या.

“बॅचलर ऑफ सायन्स हा अभ्यासक्रम अनेक क्षेत्रांतील कारकिर्दीसाठी एक भक्कम आणि विविधतेवर आधारित पाया बनवून देतो, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून विशिष्ट कप्प्यांमध्ये बंदिस्त करण्याऐवजी त्यांना अनेक संधी व पर्याय धुंडाळ्याचीही मुभा देतो.”

विद्यार्थ्यांना बायोमेडिकल सायन्स; एन्व्हायर्नमेंटल सायन्स, ह्युमन मूव्हमेंट, न्यूट्रिशन स्टडीज, केमिकल सायन्स आणि बायोलॉजिकल सायन्स अशा सहा स्पेश्यालिस्ट मेजर विषयांतून निवड करता येईल
त्यानंतर त्यांना आरोग्य, कम्युनिकेशन, तंत्रज्ञान किंवा कायदा यांसारख्या आठ क्षेत्रांतून निवड करता येईल, ज्यामुळे त्यांच्याजवळील कौशल्यसाठ्यामध्ये अधिक विविधता येऊ शकेल तसेच त्यांच्या ज्ञानाची कक्षाही रुंदावू शकते. या विषयांतून त्यांना ज्ञान तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर त्यातून प्राप्त होणारे कौशल्यही मोठ्या प्रमाणात हस्तांतरणीय आहे – यात टीकात्मक विचारपद्धती, वैज्ञानिक तार्किकता, डेटा विश्लेषण आणि आपल्या संशोधनाविषयीची माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी या गोष्टींचा समावेश असेल.”

“सर्वात यशस्वी सीईओंपैकी बरेच जण विज्ञानाचे पदवीधर असतात हा फक्त योगायोग नक्कीच नाही!”

बॅचरल ऑफ सायन्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व्यवहार्य, प्रत्यक्ष कामाचा सहभाग असलेल्या संधींचा लाभ घेता येईल, परिस्थितीवर आधारित अभ्यासक्रम निवडता येईल आणि औद्योगिक क्षेत्राच्या दर्जाचे प्रयोगशाळा साहित्य वापरता येईल.”

युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेरामधून बॅचलर ऑफ सायन्सचा अभ्यास करण्याची संधी शोधणाऱ्या भारतीय आणि ७० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण ट्यूशन फीजच्या जवळ-जवळ २५ टक्‍के मूल्याइतकी भरघोस शिष्यवृती (scholarships) मिळू शकते.

अलीकडेच UC मधील सायन्स अँड टेक्नोलॉजी फॅकल्टीने एका प्रगत इंजिनीअरिंग लॅबचे उद्घाटन केले. ही प्रयोगशाळा विविध वर्ग, उपक्रम आणि प्रकल्पांसाठीच्या विशिष्ट गरजांनुसार वापरता येणार आहे. रोबोटिक्स आणि iOT प्रकल्पांच्या साथीने नवे काहीतरी उभारता येईल, प्रयोग करता येतील. हलवता येण्याजोगी वर्कस्टेशन्स, लाइव्ह स्ट्रीम्ड सेशन्ससाठी प्रोजेक्शनची सोय आणि जमिनीवरील तसेच हवेतील ड्रोन्ससाठी आऊटडोअर डेक यांनी सुसज्ज असलेल्या या लॅबमध्ये वरच्या वर्गांतील रिसर्च स्टुडंट्ससाठी वेगळी स्वतंत्र जागाही आहे.

Related posts

२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

cradmin

पेमेटला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी आरबीआयकडून तत्वतः मंजूरी

Shivani Shetty

कच्छची गानकोकिळा, गुजरातची सर्वोत्तम आणि अव्वल लोकगायिका ‘गीता रबारी’ नवरात्रोत्सवामध्ये पहिल्यांदाच मुंबईत…

Shivani Shetty

Leave a Comment