maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर्सचे ५ शीर्ष पर्याय

इलेक्ट्रिक स्कूटर्सनी त्यांच्या इको-फ्रेंडली डिझाइन आणि प्रभावी कामगिरीने शहरी गतिशीलतेमध्ये क्रांती घडवली आहे. शाश्वत वाहतूक पद्धतींची मागणी वाढत असताना, श्रेणी, वेग आणि तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर वितरीत करण्यासाठी ऑटोमेकर्स नाविन्यतेवर भर देत आहेत. पुढे भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सर्वोत्तम ५ पर्यायांची माहिती दिली आहे.

लेक्ट्रिक्स एलएक्सएस २.०: टू-व्हीलर स्कूटर श्रेणीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक लेक्ट्रिक्स ईव्हीची एलएक्सएस २.० ही ९८ किमीची रेंज, २.३ केडब्ल्यूएच बॅटरी आणि अद्वितीय गुणवत्तेसह येते. ही स्कूटर केवळ ७९,९९९ रुपयांच्या अविश्वसनीय किंमतीत उपलब्ध असून या श्रेणीतील ही सर्वात कमी किंमत आहे.

लेक्ट्रिक्स एलएक्सएस २.० श्रेणीतील एकमेव ईव्ही आहे जी ग्राहकांच्या तीन प्रमुख समस्यांचे निराकरण करते. ही स्कूटर परिपूर्ण श्रेणी, योग्य गुणवत्ता आणि परवडण्याजोगे मूल्य यांचे उत्कृष्ट संयोजन आहे, ज्यामुळे प्रथमच ईव्ही खरेदी करू पाहत असलेल्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरेल. नवोन्मेष किंवा गुणवत्तेशी तडजोड न करता ‘मूल्य’ आणि ‘परवडणारी क्षमता’ यांचा परिपूर्ण समतोल ही स्कूटर साधते. २.3 किलोवॅट बॅटरीवर ९८ किमीच्या रेंजसह भारतात उपलब्ध असलेली ही एकमेव २ डब्ल्यू ईव्ही आहे.

बजाज चेतक: बजाज चेतक हा उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह एक आकर्षक पर्याय आहे. डिस्क फ्रंट ब्रेक आणि ड्रम रियर ब्रेकसह सुसज्ज, चेतक २.९ केडब्ल्यूएच बॅटरीसह ११३ किमी/चार्ज आणि ३.२ केडब्ल्यूएच बॅटरीसह १२६ किमी/चार्जची श्रेणी देते. या स्कूटरच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये ७३ किमी प्रति तासचा टॉप स्पीड, ७६० एमएम सीटची उंची आणि १६० एमएम ग्राउंड क्लीयरन्स यांचा समावेश आहे. या स्कूटरची किंमत १.१५ लाख रुपये आहे. विश्वासार्ह नाव आणि रेट्रो-प्रेरित डिझाइनसह, बजाज चेतक आश्चर्यकारक स्कूटर शैली आणि कार्य दोन्ही ऑफर करते.

एथर ४५०एक्स: १.३८ लाख ते १.६८ लाख रुपये किंमतीची एथर 450एक्स ही भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात प्रमुख स्पर्धक मनाली जाते. ही स्कूटर ग्राहकांना दोन बॅटरी पर्याय २.९ केडब्ल्यूएच आणि ३.७ केडब्ल्यूएच व्हेरियंटमधून निवडण्याची परवानगी देते. कामगिरीच्या बाबतीत ही स्कूटर ९० किमी प्रतितास वेगवानतेचा दावा करते. या स्कूटरच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये डिस्क फ्रंट ब्रेक आणि डिस्क रिअर ब्रेक या दोन्हींचा समावेश आहे, ज्यामुळे कार्यक्षम ब्रेकिंग क्षमता सुनिश्चित होते. या स्कूटरच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सिंगल चार्जवर तिची प्रभावी श्रेणी जी २.९केडब्ल्यूएच बॅटरीसह १११ किमी आणि ३.७ केडब्ल्यूएच बॅटरीसह १५० किमी पर्यंत जाते.

टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक: या स्कूटरची किंमत १.५६ लाख ते १.६२ लाख रुपये आहे. यात ३.०४ केडब्ल्यूएच बॅटरी आहे आणि ती दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मुख्य वैशिष्ट्यांमध्ये ७८ किमी प्रतितासचा टॉप स्पीड समाविष्ट आहे. स्कूटर डिस्क फ्रंट ब्रेक आणि ड्रम रिअर ब्रेकने सुसज्ज आहे. डिझाइनच्या बाबतीत ती अतिशय सुंदर आणि मजबूत आहे.

ओला एस१ प्रो: ओला एस१ प्रो जेन १ ही ४ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे ६.५ तासांचा कालावधी घेते. एस१ प्रो जेन २ मध्ये बदल करून ओलाने फ्रेमवर एक मोटर बसवली आहे, ज्यामुळे कमाल पॉवर ११ केडब्ल्यूपर्यंत वाढते. तिची किंमत १.३६ लाख रुपयांपासून सुरू होते. स्कूटरचा दावा केलेला टॉप स्पीड १२० किमी प्रतितास आहे आणि ती फक्त २.६ सेकंदात शून्य ते ४० किमी प्रति तासावर जाते.

जसजसे प्रगत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा सुधारत जाईल तसतसे इलेक्ट्रिक स्कूटर शहरी लँडस्केपला आकार देण्यासाठी, लोकांना अधिक स्वच्छ, हिरवेगार आणि प्रवास करण्याचा अधिक कार्यक्षम मार्ग प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे तुम्ही शहरातील रहिवासी असाल ज्यांना गर्दीच्या रहदारीला सामोरे जाण्याची इच्छा नाही किंवा पारंपारिक वाहतुकीचा पर्याय शोधणारे पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहक असलात तर या इलेक्ट्रिक स्कूटर्स नक्कीच तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील आणि उज्ज्वल, अधिक टिकाऊ भविष्यासाठी मार्ग मोकळा करतील.

Related posts

देशात पर्यटनाला चालना देण्‍यासाठी इझमायट्रिपचा झेक टुरिझमसह सहयोग

Shivani Shetty

अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी १४ महिन्यांची मुलगी केनियातून नवी मुंबईत

Shivani Shetty

वारी एनर्जी लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केला

Shivani Shetty

Leave a Comment