मुंबई, १८ नोव्हेंबर २०२२: आशियातील एक अग्रगण्य एकात्मिक आरोग्य सेवा प्रदाता, अपोलोने आज राष्ट्रीय स्तरावर ‘अपोलो प्रतिजैविक देखरेख उपक्रम (अपोलो एएसपी)’ चालू करण्याची घोषणा केली. हा उपक्रम प्रतिजैविक प्रतिरोधक (एन्टीमायक्रोबायल रेझिस्टन्स् एएमआर) या समस्येबद्दल, जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करेल. हा विषय सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण करणारा असून आज मानवतेच्या पहिल्या १० जागतिक आरोग्य धोक्यांपैकी तो एक आहे. डॉ.अनुपम सिब्बल, संचालक, ग्रुप मेडिकल, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले की, “राष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि त्यांच्या आरोग्य प्रणालीसाठी प्रतिजैविक प्रतिरोधक (एएमआर) फार महत्वपूर्ण आहेत कारण या प्रतिरोधकांमुळे दीर्घकाळ रुग्णालयात राहणे आणि आयसीयूची गरज वाढते. प्रतिजैविकांच्या प्रतिकार शक्ती मध्ये ५-१०% सतत वार्षिक वाढ होत असल्याने प्रतिजैविक प्रतिरोधक (एएम आर) या प्रचंड मोठ्या समस्येचा सामना करताना भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. या समस्येच्या निवारणासाठी राष्ट्रीय सल्लागार समितीच्या स्थापनेतून भारताने या समस्येशी लढण्याचे पहिले पाऊल आधीच टाकले आहे.”
औषध प्रतिरोधक जीवांमुळे होणाऱ्या संसर्गाने रुग्णालयात राहण्याचा कालावधी वाढतो, मृत्यू दर वाढतो आणि त्यामुळे रुग्ण त्याचे नातेवाईक आणि आरोग्य सेवा प्रणाली या सर्वांवर मोठा आर्थिक भार पडतो आणि यामुळे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये अडथळा निर्माण होतो. प्रतिजैविकांच्या प्रतिकारामुळे बहू-औषध प्रतिरोधक (एमडीआर) आणि मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिसचे औषध प्रतिरोधक स्ट्रेन (एक्सडीआर) म्हणजे क्षयरोगास जबाबदार असे जिवाणू उदयास आले आहेत. स्टॅफिलोकोकस ऑरिअस, एन्टरोकोकस, स्यूडोमोनास एरुगिनोसा, एसिनेटोबॅक्टर, एस्चेरीचीया कोली, क्लेब्सिएला न्यूमोनिया आणि गोयॉनोनिया यांसारख्या सामान्यतः दिसणाऱ्या संक्रमणास कारणीभूत असलेल्या ग्राम-पॉजिटिव आणि ग्राम-नेगेटिव दोन्ही जिवाणूं मध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक स्ट्रेन्स उदयास आले आहेत.
डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले की, “प्रतिजैविक देखरेख उपक्रम (अपोलो एएसपी) हा देशातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक आहे. जो समाजातील वाढत्या प्रतिजैविक प्रतिरोधकांचा (एएमआर) ज्याला औषध प्रतिरोध म्हणून देखील ओळखले जाते. रोगप्रतिकार शक्तीचा सामना करण्यासाठी प्रतिजैविकांच्या विचारपूर्वक वापरास प्रोत्साहन देणार आहे. या उपक्रमांतर्गत केअर प्रोवायडर्स डॉक्टर, फार्मसीस्ट आणि इतर आरोग्य सेवा कर्मचारी आहेत त्यांना या विषयाबाबत जो आज मानवतेच्या पहिल्या १० जागतिक आरोग्य धोक्यांपैकी एक आहे त्याबाबत जागरूक करण्यात येईल. प्रतिजैविक देखरेख उपक्रमाचे (अपोलो एएसपी) प्रतिजैविकांचा वापर केवळ गरजेपुरताच करणे ‘एएमआर’ वरच उलटा प्रभाव होईल असे उपाय करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी त्याच्या संसर्गावर प्रभावी उपचार चालू ठेवणे हे ध्येय आहे.”