maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

आता फिजिक्स वाला विद्यार्थ्यांना देणार एमपीएससीचे प्रशिक्षण

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२३: पीडबल्यू (फिजिक्स वाला) या भारतातील आघाडीच्या व सर्वात किफायतशीर एडटेक व्यासपीठाने एमपीएससी वालाच्या लॉन्चसह एमपीएससी (महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन) प्रशिक्षणात प्रवेश केला आहे . ‘स्टुडंट हे जहॉं, पीडब्ल्यू हे वहॉं’ या आपल्या ब्रीदवाक्याला अधिक पुढे घेऊन जात पीडबल्यू (फिजिक्स वाला) विद्यार्थ्यांना परिपूर्ण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे.

यूपीएससी वाला मध्ये लक्षणीय यश प्राप्त केल्यानंतर पीडब्ल्यू महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी उच्च दर्जाची सामग्री, भारतातील उच्च-दर्जाची फॅकल्टी आणि कौशल्य पूरवेल. पीडब्ल्यूच्या मूलभूत वचनानुसार हा कोर्स देखील अत्यंत स्वस्त, सर्वाना परवडणारा आहे. पूर्व परीक्षेची तयारी विनामूल्य / मोफत आहे आणि मुख्य परीक्षेसाठीचे कोर्सेस अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत.

कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तपशीलवार क्लास नोट्स, मौखिक चाचणी, थेट व्याख्याने, मार्गदर्शन कार्यक्रम, टेस्ट, शंका-निवारण चर्चा व समस्या सोडवण्याची सत्रे, दैनंदिन सराव पेपर, साप्ताहिक चाचण्या आणि मंथन – चालू घडामोडी, गतीमान – महाराष्ट्राचा इतिहास व संपूर्ण – विज्ञान व तंत्रज्ञान इत्यादी मासिकांची उपलब्धता असेल. पीडब्ल्यूने एफसी रोड, पुणे येथील विदयापीठ केंद्रात इच्छुकांसाठी ऑफलाइन समुपदेशन सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे .

पीडबल्यू (‍फिजिक्स वाला) चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे म्हणाले, ‘‘एमपीएससी वालाचे लॉन्च पीडब्ल्यूला आपली व्याप्ती वाढवण्यास आणि अनेक स्पर्धा परीक्षांसाठी परवडणारी व सर्वांगीण तयारी करण्यास मदत करेल. एमपीएससी परीक्षा ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात आव्हानात्मक व महत्त्वूपर्ण परीक्षांपैकी एक आहे आणि आम्ही मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या आमच्या उच्च दर्जाच्या स्वस्त व सुलभ कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्याची यशोगाथा तयार करण्यास उत्सुक आहोत. ’’

Related posts

भारतीयांची नाताळ व नववर्ष साजरे करणासाठी आशियाई देशांना पसंती: कायक

Shivani Shetty

माय होम इंडियाचा ‘वन इंडिया अवॉर्ड’ अरुणाचल प्रदेशच्या ‘तेची गुबेन’ यांना प्रदान

Shivani Shetty

सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनच्‍या १७व्‍या नॅशनल बालपरिषदेने वंचित विद्यार्थ्‍यांना भारतातील झोपडपट्ट्यांमधील गंभीर समस्यांबद्दल बोलण्यासाठी दिले व्‍यासपीठ

Shivani Shetty

Leave a Comment