ऊस, तांदूळ, सोयाबीन, कडधान्ये आणि भाजीपाला संरक्षित करण्यासाठीकीटकनाशक क्लोरानट्रेनिलीप्रोल (CTPR-सीटीपीआर) चे उत्पादन आणि विक्री करणारी भारतातील पहिली एग्रोकेमिकल कंपनी
अहमदाबाद, १६ नोव्हेंबर २०२२: जीएसपी क्रॉप सायन्स, एग्रोकेमिकलव्यवसायातील एक अग्रगण्य कंपनीला, भारतातील कीटकनाशकक्लोरानट्रेनिलीप्रोल (सीटीपीआर) चे उत्पादन आणि विक्री करण्यासाठीदिल्ली उच्च न्यायालयाकडून अंतिम मंजुरी मिळाली. १४ नोव्हेंबर २०२२ रोजीमाननीय दिल्ली उच्च न्यायालयाने, CS (Comm) 662/2022 (एफएमसीकॉर्पोरेशन विरुद्ध जीएसपी क्रॉप सायन्स) मध्ये एफएमसीचा अंतरिमआदेशचा अर्ज फेटाळून लावला ज्यामुळे सीटीपीआर उत्पादने लॉन्चकरण्यासाठी जीएसपी चा मार्ग मोकळा झाला.
माननीय न्यायालयाने IN’004 (सूट पेटंट) प्रथमदर्शनी आधीच्या दाव्याच्याकारणास्तव अवैध ठरवले आणि एफएमसी वर, त्यांची मक्तेदारी कायमठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी आणि त्यांनी माननीय न्यायालय आणि पेटंट कार्यालयासमोर केलेल्या अनेक भौतिक चुकीची माहिती आणि दडपशाहीसाठी रु. २,००,००० चा खर्च देखील लादला. या नव्यादिशानिर्देशासह, जीएसपी क्रॉप आता मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गतसीटीपीआरचे उत्पादन आणि विक्री करेल ज्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांनामोठ्या प्रमाणावर फायदा होईल.
एफएमसी कॉर्पोरेशन, यूएसए आणि त्यांच्या दोन समूह कंपन्यांनी म्हणजेएफएमसी एग्रो सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड आणि एफएमसी इंडिया प्रायव्हेटलिमिटेड यांनी “सल्फोनील क्लोराईड आणि पायरीडिनच्या उपस्थितीतऑर्थो-अमीनो ऍरोमॅटिक कार्बोक्झिलिक ऍसिड आणि कार्बोक्झिलिकऍसिड पासून ओक्साझिओनेस तयार करायची प्रक्रिया” शीर्षक असलेल्याभारतीय पेटंट क्रमांक IN252004 चे उल्लंघन रोखण्यासाठी आदेशमागण्यासाठी अहमदाबाद स्थित जीएसपी क्रॉप सायन्स लिमिटेड विरुद्धदावा दाखल केला होता. एफएमसी समूहाच्या कंपन्या कृषी-रसायनांसहरसायनांचे उत्पादन, विपणन आणि विक्री करतात.
क्लोरानट्रेनिलीप्रोल (सीटीपीआर) ऊस, तांदूळ, सोयाबीन, कडधान्ये आणि भाजीपाला यांसारख्या पिकांमध्ये सर्व लेपिडोप्टेरा आणि इतर प्रजातींचेनियंत्रण करून प्रभावी आणि दीर्घ कालावधी कीटक नियंत्रण प्रदान करते. हेकीटकांची अंडी, अळ्या आणि प्युपा साठी याचा संपर्क देखील विषारी आहे. सीटीपीआरमध्ये वनस्पतींमध्ये बॉटम-अपचे उत्कृष्ट सेवन आणि हालचालअसून ते झाडांच्या मुळामधून खोडापर्यंत प्रभावीपणे प्रवेश करते.
श्री. भावेश शाह, व्यवस्थापकीय संचालक, जीएसपी क्रॉप सायन्स, यामहत्त्वपूर्ण विजयाबद्दल बोलताना म्हणाले, “जीएसपीला हेलीप्रो आणि बॅलट या ब्रँड नावाखाली सीटीपीआर (क्लोरांट्रानिलिप्रोल) भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे. माननीय दिल्ली उच्चन्यायालयाने आम्हाला परवडणारे उत्पादन तयार करून ते भारतातीलशेतकरी समुदायासाठी सहज उपलब्ध करण्यासाठी मंजुरी दिली आहे. जीएसपी आपल्या ग्राहकांसाठी पूर्वीप्रमाणे सर्वोत्तम दर्जाचे उत्पादनपुरवण्यास वचनबद्ध आहे.”
जीएसपी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड भारतातील अग्रोकेमिकल्सउत्पादकांपैकी एक आहे. हे भारतीय शेती आणि शेतकरी समुदायासाठीकीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके (पीक संरक्षण उपाय) आणि वनस्पती नियामकांच्या विस्तृत श्रेणीचे “तांत्रिक” आणि “फॉर्म्युलेशन” तयारकरते.
जीएसपी क्रॉप सायन्स ची वार्षिक आर्थिक उलाढाल रु. १२०० कोटी आहे आणि गुजरात व जम्मू आणि काश्मीरमधील चार उत्पादन युनिट्ससह, जीएसपी क्रॉप सायन्समध्ये ७० हून अधिक ब्रँडेड उत्पादने समाविष्ट आहेतजी ६,५०० वितरक, ३०,००० हून अधिक डीलर्स आणि भारतातील ३४ डेपोंच्या नेटवर्कद्वारे विकली जातात आणि २५ देशांना निर्यात केले जातात.
अधिक माहितीसाठी , कृपया संपर्क साधा:
मनीष गर्ग, कायदा विभाग, जीएसपी क्रॉप । +९१ ९९७४७ ०३७३२
हेमचंद्र शेट्टी, कोंसेप्ट पीआर । +९१ ९८२१४ १२३५६