maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

इझमायट्रिपद्वारे इझमायट्रिप फ्रँचायझीची घोषणा

Noमुंबई, ३० जानेवारी २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन टेक ट्रॅव्हल व्यासपीठाने इझमायट्रिपचा प्रमुख ब्रॅण्ड इझमायट्रिप फ्रँचायझीमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. इझमायट्रिप फ्रँचायझीचा ग्राहकांना रिटेल स्टोअर अनुभव देण्याचा मनसुबा आहे. व्यवसाय मॉडेल ग्राहकांना इन-स्टोअर रिटेल अनुभव देईल, ज्यामुळे अद्वितीय अनुभवाचा शोध घेत असलेल्यांना आनंद मिळेल. इझमायट्रिप फ्रँचायझीसह कंपनी नवीन ऑफलाइन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामुळे ते त्यांची पोहोच वाढवण्यामध्ये सक्षम होतील. आपल्या व्यावसायिक क्षेत्रात कंपनीचे वॉक-इन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे.

इझमायट्रिप फ्रँचायझी सर्व व्यवहार व त्यांच्या बुकिंग्जवर सर्वोत्तम कमिशन रचना, चौकशीचे निराकरण करण्यामध्ये २४*७ समर्पित सपोर्ट सेंटर, उत्पादनांवर लाइव्ह ट्रेनिंग, ऑपरेशनल ब्रेक-इव्हन, ३ ते ४ महिन्यांमध्ये लाभदायी वाढ, व्यवसाय वाढवण्यासाठी नियमित मार्केटिंग व क्रेडिट सपोर्ट, व्यवसाय अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी लीड जनरेशन सपोर्ट देते.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, ‘‘इझमायट्रिप फ्रँचायझी मॉडेल समोरासमोर साह्य पाहिजे असण्याची आणि इंटरनेटप्रेमी नसलेल्या विविध ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या विचारासह डिझाइन करण्यात आले. इझमायट्रिप फ्रँचायझीसह आमचे मीट-अॅण्ड-ग्रीट अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित आहे, जे पर्यटन क्षेत्रातील अद्वितीय आहे. यामुळे ब्रॅण्डला ऑफलाइन कर्मचारी पाठिंबा आणि ग्राहाकांना उत्पादने व सेवांचे प्रात्यक्षिक दाखवण्याच्या माध्यमातून विश्वास व ब्रॅण्डनिर्मिती करण्यास मदत होईल, तसेच त्यांना विनासायास बुकिंग व कन्फर्मेशनसह मदत होत आहे.’’

या नवीन तत्त्वामध्ये इझमायट्रिप फ्रँचायझी एचएनआय क्लायंट्सचे प्रबळ नेटवर्क, ग्राहकांचे क्लस्टर, सोसायटी व संस्थांचे नेटवर्क आणि लक्षणीय प्रमाणात वॉक-इन व्यवसाय निर्माण करण्याची क्षमता असलेले कोणीही स्थापित करू शकते. इझमायट्रिप ऑनबोर्डिंग, लिझनिंग, मॅनेजिंग, मार्केटिंग इत्यादीमध्ये साह्य करेल. प्रवास व पर्यटनाच्या लाभदायी व लक्षवेधक क्षेत्रात प्रवेश करण्याची इच्छा असलेले निस्सीम महत्त्वाकांक्षी इझमायट्रिप फ्रँचायझीचा विचार करू शकतात. पूर्व-आवश्यकतांमध्ये पर्यटन क्षेत्राबाबत माहिती, विक्री, ग्राहक सेवा, ग्राहकवर्गाचे उत्तम नेटवर्क आणि स्थानिक संपर्क यांचा समावेश असेल.

Related posts

अपग्रॅड चार शहरांमध्ये विस्तार करणार

Shivani Shetty

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची तिसरी आवृत्ती सादर केली

Shivani Shetty

‘बॉर्न टू शाइन’ ने केली आपल्या ३० विजेत्यां मुलींची घोषणा!

Shivani Shetty

Leave a Comment