maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा ग्रामीण विकास मंत्रालयासोबत सामंजस्‍य करार

मुंबई, १३ मार्च २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक व्‍यासपीठाने लखपती दीदी योजना अंतर्गत दीनदयाळ अंत्‍योदय योजना – नॅशनल रूरल लाइव्‍हलीहूड्स मिशन (डीएवाय-एनआरएलएम)च्‍या विमेन्‍स सेल्‍फ हेल्‍प ग्रुप्‍स (एसएचजी) सदस्‍यांना प्रशिक्षित करण्‍यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयासोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. महिला-केंद्रित कौशल्‍य विकासावर लक्ष केंद्रित केल्‍याने या महिला सदस्‍यांना त्‍यांची उद्योजकता कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍यास आणि आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी होण्‍यास मदत होईल. या धोरणात्‍मक पुढाकाराच्‍या माध्‍यमातून इझमायट्रिपचा देशभरातील ८०० जिल्‍ह्यांमधील एसएचजीच्‍या सदस्‍यांना सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्‍या लखपती दीदी योजनेचा प्रेमाने दीदी म्‍हणून हाक मारले जाणाऱ्या महिला सदस्‍यांना प्रशिक्षित करण्‍याचा मनसुबा आहे. यामुळे ग्रामीण महिलांना त्‍यांच्‍या गावांमध्‍ये सूक्ष्‍म-उद्योग उभारण्‍यास आणि त्‍यांच्‍या उद्योजकता कौशल्‍यांचा फायदा घेत दरवर्षाला प्रतिकुटुंब किमान १ लाख रूपयांचे शाश्‍वत उत्‍पन्‍न कमावण्‍यास मदत होते. या सामंजस्‍य करारानुसार एमओआरडी एसएचजी सदस्‍यांना प्रेरित करेल आणि उद्देशासाठी इझमायट्रिपकडून प्रशिक्षणासाठी त्‍यांच्‍या उपलब्‍धतेची खात्री घेईल. दीदींच्‍या निवडीसाठी पात्रता निकषांमध्‍ये इंग्रजी/हिंदी भाषेचे वाचन व लेखनाचे मुलभूत ज्ञान आणि संगणक व इंटरनेट वापराचे ज्ञान यांचा समावेश असेल. या करारामध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे की, इझमायट्रिप भारतातील ८०० जिल्‍ह्यांमधील प्रति ब्‍लॉक १ एसएचजी सदस्‍याला प्रशिक्षित व सक्षम करत या उपक्रमाप्रती योगदान देईल. सदस्‍यांना ट्रेन्‍स, बसेस्, हॉटेल्‍स व फ्लाइट्स अशा सर्व आवश्‍यक विभागांमध्‍ये प्रवास आरक्षण करण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यात येईल. इझमायट्रिप त्‍यांना आवश्‍यक साधने प्रदान करेल, तसेच ग्राहकांच्‍या वतीने तिकिटे सर्च करणे, बुक करणे, पेमेंट्स करणे आणि प्रिंट करणे अशा महत्त्वपूर्ण पैलूंबाबत माहिती देईल. निवडलेल्‍या सदस्‍यांना ‘तिकिट वाली दीदी’ म्‍हटले जाईल.

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्री. निशांत पिट्टी म्‍हणाले, ”आमचा ठाम विश्‍वास आहे की, महिलांचे सक्षमीकरण देशाच्‍या आर्थिक-सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. उद्योजकता स्थितीमध्‍ये महिला प्रतिनिधीला हळूहळू आकार मिळत आहे आणि त्‍या त्‍यांच्‍या बहुआयामी कौशल्‍यांसह अग्रस्थान प्राप्‍त करत आहेत. पण, ग्रामीण भागांमधील महिलांच्‍या क्षमता अजूनही प्रकाशझोतात आलेल्‍या नाहीत. लखपती दीदी योजना सारखे उपक्रम ग्रामीण महिलांना सक्षम करतात, त्‍यांना त्‍यांच्‍या अंतर्गत असलेल्‍या उद्योजकता कौशल्‍यांचा फायदा घेत आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यास मदत करतात. ग्रामीण विकास मंत्रालयासोबत या ऐतिहासिक कराराच्‍या माध्‍यमातून आमचा सेल्‍फ-हेल्‍प ग्रुप्‍सच्‍या सदस्‍यांना प्रशिक्षित व सक्षम करण्‍याचा आणि भावी महिला उद्योजक घडवण्‍याचा मनसुबा आहे.”

या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत ग्रामीण विकास मंत्रालयाचे माननीय श्री. गिरीराज सिंग म्‍हणाले, ”आम्‍ही ग्रामीण भागांमधील महिलांच्‍या सर्वांगीण विकासाची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. लखपती दीदी योजनेमधून महिलांना सक्षम करण्‍याप्रती आणि तळागाळापासून उद्योजकतेला चालना देण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते. इझमायट्रिपसोबतचा हा धोरणात्‍मक सहयोग देशभरातील महिलांच्‍या बचत गटांना बहुमूल्‍य प्रशिक्षण व संधी देईल, तसेच त्‍यांना आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी बनण्‍यास सक्षम करेल आणि त्‍यांच्‍या समुदायांप्रती अर्थपूर्ण योगदान देईल.”

Related posts

एल्‍गी (ELGi) कडून भारतात कम्‍प्रेस्‍ड एअर सिस्‍टम्‍ससाठी स्‍मार्ट मॉनिटरिंग व अलर्ट सिस्‍टम ‘Air~Alert’ सादर

Shivani Shetty

मिलाग्रोने आणले अत्याधुनिक रोबोटिक क्लीनर्स

Shivani Shetty

केसांच्या समस्यांवर उपचारासाठी डॉ. बत्रा’जची उत्पादने

Shivani Shetty

Leave a Comment