maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून प्रिमिअम डिझाइन, दर्जात्‍मक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये असलेली न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन लाँच

मुंबई, सप्‍टेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आज भारतात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍ही नवीन नेक्‍सॉनच्‍या लाँचची घोषणा केली. वैविध्‍यपूर्ण, हवीहवीसी वाटणारी व नाविन्‍यपूर्ण न्‍यू जनरेशन नेक्‍सॉनमधील सर्व वेईकल वैशिष्‍ट्यांमध्‍ये सर्वसमावेशक अपग्रेड करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून सुसंगत एसयूव्‍ही बाजारपेठेतील मोठी प्रगती दिसून येते. अॅक्‍शन व इमोशन म्‍हणून वर्णन करण्‍यात आलेली नेक्‍सॉन अग्रस्‍थानी राहण्‍याची इच्‍छा असलेल्‍या आणि साहसी राइडचा आनंद घेण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या महत्त्वाकांक्षांना पूर्ण करते. नवीन नेक्‍सॉन डिजिटल प्रेरित डिझाइन, विभाग-अग्रणी सुरक्षितता, समकालीन तंत्रज्ञान आणि दर्जात्‍मक कार्यक्षमतेसह देशभरातील विविध पिढ्यांमधील ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. चार काळजीपूर्वक क्‍यूरेट केलेले परसोना – फिअरलेस, किएटिव्‍ह, प्‍युअर व स्‍मार्ट यामध्‍ये, तसेच पेट्रोल व डिझेल पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या नवीन नेक्‍सॉनच्‍या विक्रीला आजपासून 8.09 लाख रूपये या सुरूवातीच्‍या किमतीत सुरूवात होत आहे.

न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ”नेक्‍सॉन ब्रॅण्‍डने विभागातील सर्वोत्तम वेईकल असण्‍यासह नेतृत्‍वाचा वारसा निर्माण केला आहे आणि इतरांसाठी आदर्श म्‍हणून बेंचमार्क स्‍थापित करत आहे. भारतातील रस्‍त्‍यांवर ५ लाखांहून अधिक नेक्‍सॉन वेईकल धावत आहेत, तसेच या वेईकलची सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍याची आणि ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याची क्षमता अपवादात्‍मक आहे. न्‍यू जनरेशन नेक्‍सॉन आम्‍हाला माहित असलेल्‍या आमच्‍या ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षेचे साहसी सादरीकरण आहे. डिझाइन ते कार्यक्षमता, सुरक्षितता ते तंत्रज्ञान, वैशिष्‍टये आणि आरामदायीपणा अशा वेईकलच्‍या प्रत्‍येक पैलूला नव्‍या उंचीवर नेण्‍यात आले आहे. ही वेईकल आमचे तत्त्व न्यू फॉरेव्‍हरप्रती कटिबद्धतेच्‍या दिशेने आत्‍मविश्‍वासपूर्ण झेप आहे. कलात्‍मकरित्‍या क्‍यूरेट केलेले परसोना, अनेक आकर्षक रंग आणि स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांची व्‍यापक श्रेणी विविध जीवनशैली व बहु-कार्यक्षम गरजांची पूर्तता करतात. आम्‍हाला विश्‍वास आहे की, नेक्‍सॉनचा हा नवीन अवतार अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल आणि कारला भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍हीचा दर्जा मिळवून देण्‍यासह कारचा वारसा अधिक संपन्‍न करेल.”
नवीन नेक्‍सॉनमध्‍ये अनेक उत्‍साहवर्धक व सुधारित वैशिष्‍ट्ये आहेत, जी कारला बाजारपेठेत वरचढ ठरवतात. या कारमध्‍ये आधुनिक व प्रिमिअम डिझाइनशैली आहे, ज्‍यामधून आकर्षकता व गतीशीलता दिसून येते आणि रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. या कारमध्‍ये अनेक अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये, अत्‍याधुनिक कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स, अपग्रेडेड सुरक्षितता व परसोना आहे, जे अद्वितीय अनुभव देतात आणि विभागामध्‍ये वे अहेड (अग्रस्‍थानी) आहेत.
नवीन नेक्‍सॉनची ठळक वैशिष्‍ट्ये:
डिजिटल प्रेरित डिझाइन: नेक्‍सॉनने टाटा मोटर्सअंतर्गत प्रतिष्ठित व कालातीत वेईकल म्‍हणून आपले स्‍थान दृढ केले आहे. नवीन नेक्‍सॉनसह कंपनीने या कारच्‍या विशिष्‍ट वैशिष्‍ट्यांमध्‍ये वाढ केली आहे, जी विविध पिढ्यांमधील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. रिडिझाइन केलेले फ्रण्‍ट, बाय-एलईडी हेडलॅम्‍प्‍स व सिक्‍वेन्शियल एलईडी डीआरएल दिवसा व रात्री सर्वांचे लक्ष वेधून घेतात. तसेच डेटाइल लिट, एक्‍स फॅक्‍टर व टेललॅम्‍पसह वेलकम अॅण्‍ड गुडबाय अशी वैशिष्‍ट्ये दर्जा व आधुनिकतेला नव्‍या उंचीवर नेतात. इमोटिव्‍ह ब्‍लेड लॅम्‍प्‍स लुकलुकण्‍याऐवजी सुस्‍पष्‍ट प्रकाश देतात. विस्‍तारित स्‍पॉइलरमध्‍ये रिअर वायपर आहे. इंटीरिअर्समध्‍ये देखील बदल करण्‍यात आले आहेत. इंटीरिअरमध्‍ये ३-टोन डॅशबोर्डसह संपन्‍न लेदरेट मिड पॅड आहे, ज्‍यामुळे आलिशान कारमध्‍ये प्रवास करत असल्‍यासारखे वाटते. २-स्‍पोक्‍स असलेल्‍या न्‍यू जनरेशन लेदर रॅप फिजिटल स्टिअरिंग व्‍हीलवर कंपनीचा इल्‍यूमिनेटेड लोगो आहे, जे भारतात प्रथमच आहे. लक्‍झरीअस केबिनमध्‍ये भव्‍य कन्‍सोलसह लेदरेट आर्मरेस्‍ट आहे, जे ड्रायव्हिंगवर आरामशीरपणे नियंत्रण असण्‍याची खात्री देते.
उत्‍साहपूर्ण कार्यक्षमता: शहर, ग्रामीण भाग असो किंवा खडतर प्रदेश असो नेक्‍सॉनची कार्यक्षमता प्रकर्षाने दिसून येते. या कारमधील प्रबळ इंजिन व प्रगत तंत्रज्ञान रोमांचक ड्रायव्हिंग अनुभव देतात, जे कोणत्‍याही प्रदेशात आरामदायी राइडिंगची खात्री देतात. मोनोस्‍टेबल शिफ्टरद्वारे ऑपरेट केले जाणारे इंटेलिजण्‍ट, ७-स्‍पीड डीसीए असण्‍यासह सुलभ व स्‍पोर्टी पॅडल शिफ्टर आहे. हे वैशिष्‍ट्य सुधारित व प्रभावी कामगिरीची खात्री देते. प्रगत १.२ लीटर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल किंवा १.५ लीटर रेव्‍होटॉर्क कॉमन रेल डिझेल इंजिनच्‍या निवडीसह प्रत्‍येक रस्‍त्‍यावर ड्रायव्हिंगचा आनंद घ्‍या. हे इंजिन मॅन्‍युअल, ऑटोमेटेड मॅन्‍युअल व वेट क्‍लच ७ स्‍पीड डीसीए ट्रान्‍समिशन्‍सच्‍या विविध संयोजनांसह येते.
प्रगत सुरक्षितता: नेक्‍सॉनमध्‍ये जीएनसीएपी २०२२ सेफ्टी प्रोटोकॉल्‍सचे पालन करत आधुनिक बदल करण्‍यात आले आहेत, तसेच रचनात्‍मक सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत. या कारमध्‍ये सुरक्षिततेची खात्री देणारी प्रमाणित वैशिष्‍ट्ये आहेत- जसे ६ एअरबॅग्‍ज, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, ३-पॉइण्‍ट रिअर सीटबेल्‍ट्स, तसेच ऑक्‍यूपण्‍ट डिटेक्‍शन, पॅसेंजर एअरबॅग डिअॅक्टिवेशन स्विच आणि आयएसओएफआयएक्‍स चाइल्‍ड सीट्स. हाय डेफिनिशन ३६०-डिग्री, सराउंड-व्ह्यू सिस्‍टम, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटर सतर्क ड्राइव्हसाठी वेळेवर अलर्टस् देतात. या कारमध्‍ये ई-कॉल देखील आहे, जे प्रत्‍येकवेळी इमर्जन्‍सीमध्‍ये साह्य करते, तसेच कार ब्रेकडाऊनचे निराकरण करण्‍यासाठी बी-कॉल असिस्‍टण्‍स आहे.
भावी तंत्रज्ञान: नवीन नेक्‍सॉनमध्‍ये आधुनिक तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये आहेत, जसे वॉईस असिस्‍टेड इलेक्ट्रिक सनरूफ, हार्मनची १०.२५ इंच इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कारप्ले, फर्स्‍ट इन सेगमेंट १०.२५ इंच डिजिटल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, कनेक्‍टेड वेईकल टेक्‍नॉलॉजीसह दुरून इंजिन व एसी स्‍टार्ट किंवा स्‍टॉप करण्‍याची सुविधा देणारे आयआरए २.० आणि सुरक्षितता वैशिष्‍ट्ये, जी भारतीय प्रवाशांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत.
क्रांतिकारी दृष्टीकोन: नवीन नेक्‍सॉनने टाटा मोटर्सच्‍या उत्‍पादन धोरणामध्‍ये आमूलाग्र बदल केला आहे. पारंपारिक व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या तुलनेत ही वेईकल चार विशिष्‍ट परसोनामध्‍ये उपलब्‍ध असेल आणि प्रत्‍येक परसोना विशिष्‍ट ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करेल. या दृष्टीकोनामधून टाटा मोटर्सची ग्राहकांच्‍या पसंतींना प्राधान्‍य देत त्‍यानुसार ऑफरिंग्‍ज तयार करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.
• फिअरलेस परसोना – नाही असे उत्तर कधीच मिळणार नाही. यामधून साहसी राइडचा अनुभव मिळतो. लांब प्रवास करायचा असो किंवा देशभरात ड्रायव्हिंग करायची असो सर्वोत्तम सुविधा नेहमी मिळणार.
• क्रिएटिव्‍ह परसोना – क्रिएटिव्‍ह ड्रायव्‍हर्सना ड्रायव्हिंगची आवड असेल तर ही कार त्‍यांना आरामदायी व साहसी राइडचा अनुभव देते. या कारमधून राइडिंगचा अद्वितीय आनंद मिळतो.
• प्‍युअर परसोना – हे वैशिष्‍ट्य क्षणाचा आनंद घेणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. या कारमधून कमी अंतरापर्यंत राइडचा आनंद घेत अत्‍याधुनिक सुविधांचा अनुभव घ्‍या.
• स्‍मार्ट परसोना – हे वैशिष्‍ट्य परिणाम व व्‍यावहारिकतेवर विश्‍वास असणाऱ्या, तसेच जीवनाप्रती स्‍मार्ट दृष्टीकोन व सर्वोत्तम भविष्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांसाठी आहे.
२०१७ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून नेक्‍सॉनने भारतीय एसयूव्‍ही विभागात अद्वितीय छाप निर्माण केली आहे आणि विविध नवीन ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अस्‍सल ट्रेलब्‍लेझर असलेली नेक्‍सॉन टाटा मोटर्सच्‍या भारतातील यशाची आधारस्‍तंभ राहिली आहे, जी सर्व वयोगटातील एसयूव्‍ही उत्‍साहींचे लक्ष वेधून घेत आहे. या कारचा प्रभावी वाटा आहे, जेथे विक्री केली जाणारी प्रत्‍येक ५वी कार नेक्‍सॉन आहे. व्‍यावसायिक यश संपादित करण्‍यासह नेक्‍सॉनने भारतातील एसयूव्‍ही विभागाला नवीन आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच या कारने उद्योगाला आधुनिक डिझाइन, प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आणि आरामदायीपणा व सोयीसुविधेचे उत्तम संयोजन यांचा अवलंब करण्‍यास साह्य केले आहे.

Related posts

डिजी यात्राने डी-केवायसी अभियान सुरु केले

Shivani Shetty

ओमेगा पॅरिस २०२४ ब्रॉन्झ गोल्ड एडिशन लॉन्च

Shivani Shetty

आयएआरसीच्या नुसार २०५० पर्यंत कॅन्सर केसेसचे प्रमाण ३५ मिलियनपर्यंत पोहोचेल

Shivani Shetty

Leave a Comment