maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

यामाहा आणत आहे २०२३ मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटो जीपी एडिशन लाइन-अप.

चेन्नई, ६ ऑक्टोबर २०२३: कॉल ऑफ द ब्ल्यूया उत्साहवर्धक ब्रॅण्ड अभियानाचा एक भाग म्हणून, इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने आज २०२३ मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल्सची आकर्षक श्रेणी सर्वांपुढे आणली. या मॉडेल्समध्ये सुपरस्पोर्ट वायझेडएफआर१५एम, डार्क वॉरियर एमटी१५ व्ही२. आणि रे झेडआर १२५ फाय हायब्रिड स्कूटर यांचा समावेश होतो. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल श्रेणी, सप्टेंबरच्या ३ऱ्या आठवड्यापासून, भारतातील सर्व प्रीमियम ब्ल्यू स्क्वेअर आउटलेट्समध्ये, उपलब्ध होणार आहे. मॅक्सीस्पोर्टस् स्कूटरची विशेष मोटोजीपी एडिशन एईआरओएक्स १५५ लवकरच बाजारात येणार आहे.  

वायझेडएफआर१५एम आणि एमटी१५ व्ही२. यांच्या २०२३ मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशनमधील वाहनांच्या टँक श्राउड्स, इंधन टाकी व साइड पॅनल्सवर यामाहा मोटोजीपी लिव्हरी देण्यात आली आहे. त्यातून या वाहनांची रेसिंग पार्श्वभूमी स्पष्ट होते. तर एईआरओएक्स १५५ आणि रे झेआर मॉडेल्सच्या संपूर्ण बॉडीवर यामाहा मोटोजीपी लिव्हरी आहे. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल श्रेणी मर्यादित संख्येत आणली जाणार आहे

यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष श्री. ईशीन चिहाना यावेळी म्हणाले, भारतात प्रथमच येणाऱ्या मोटोजीपी रेसबद्दल यामाहाच्या चाहत्यांमध्ये खूपच उत्साह आहे. मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन मॉडेल श्रेणी आज बाजारात आल्यामुळे, त्यांचाउत्साह आणखीच वाढेल असे आम्हाला वाटते. यामाहाच्या समृद्ध रेसिंग वारशाचे प्रतिनिधीत्व करणारी आकर्षक, शैलीदार व दणकट श्रेणी भारतीय ग्राहकांना देण्याप्रती आमची बांधिलकी, २०२३मोटोजीपी एडिशन लिव्हरी सर्वांपुढे आणून आम्ही, अधिक दृढ केली आहे. मोटोजीपीवर उत्कटपणे प्रेम करणाऱ्या आमच्या तरुणग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी यामाहा करत असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न या एक्सक्लुजिव श्रेणीतून दिसून येतात.”

२०२३ मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी मॉडेल श्रेणीच्या एक्सशोरूम(दिल्ली) किमती पुढीलप्रमाणे आहेत:

२०२३मोटोजीपी एडिशन्स एक्सशोरुम(दिल्ली) भारतीयरुपयांमध्ये
वायझेडएफआरफिफ्टीनएम १९७,२००
एमटीफिफ्टीनव्हीटूपॉइंटझिरो १७२,७००
रे झेडआर १२५ फाय हायब्रिड ९२,३३०

यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीज विषयी

यामाहा मोटरने भारतात प्रथम प्रवेश १९८५ साली जॉइंट व्हेंचर म्हणून केला. ऑगस्ट २००१ मध्ये ती जपानमधील यामाहा मोटर कंपनीलिमिटेडच्या (वायएमसी) १०० टक्के मालकीची उपकंपनी झाली.२००८ मध्ये मित्सुई अँक कंपनी लिमिटेडने, भारतात यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (आयवायएम) संयुक्त गुंतवणूक होण्यासाठी,वायएमसीशी करार केला. आयवायएमच्या उत्पादन आस्थापनांमध्ये सुर्जापूर (उत्तरप्रदेश) आणि कांचीपूरम (तमिळनाडू) येथील अत्याधुनिक कारखान्यांचा समावेश होतो. या कारखान्यांमधील पायाभूत सुविधा मोटरसायकल्स आणि त्यांच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी अनुकूल आहेत. ही उत्पादने देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठांसाठी तयार केली जातात. वायएमसीने भारतात आपल्या उपकंपन्याही प्रस्थापित केल्या आहेतयामाहा मोटर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (वायएमआरआय), यामाहा मोटर इंडिया सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (वायएमआयएस) आणि यामाहा मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (वायएमआय) या त्या उपकंपन्या आहेत. या उपकंपन्या आयवायएमला उत्पादनांचा विकास, विक्री व मार्केटिंगमध्ये स्वतंत्रपणे मदत करतात तसेच अनुक्रमे एकंदर व्यवसाय नियोजन व प्रादेशिक नियंत्रणातही मदत करतात.

सध्या कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये पुढील उत्पादनांचा समावेश होतोवायझेडएफआर१५ व्ही४ (१५५ सीसी), एमटी१५व्ही२ (१५५ सीसी); एफझेडएसफाय व्हर्जन ४.० (१४९ सीसी),एफझेडएसफाय व्हर्जन ३.० (१४९ सीसी), एफझेडफाय व्हर्जन ३.०(१४९ सीसी), एफझेडएक्स (१४९ सीसी), एईआरओएक्स (१५५सीसी) यांसारखे ब्ल्यूकोअर तंत्रज्ञानसक्षम मॉडेल्स आणि फॅसिनो १२५ फाय हायब्रिड (१२५ सीसी), रे झेडआर १२५ फाय हायब्रिड (१२५सीसी), रे झेडआर स्ट्रीट रॅली फाय हायब्रिड (१२५ सीसी) यांसारख्यास्कूटर्स

 

Related posts

झेलियो ईबाईक्सने ग्रेसी सीरीजच्या लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या

Shivani Shetty

इझमायट्रिपचा ग्रामीण विकास मंत्रालयासोबत सामंजस्‍य करार

Shivani Shetty

केरल आपदा के लिए 5 करोड़ रुपए देगा कल्याण ज्वेलर्स

Shivani Shetty

Leave a Comment