maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

लिव्‍हप्‍युअरने वॉटर प्‍युरिफायर्सची ‘अलुरा’ श्रेणी लॉन्च केली

मुंबई, ११ मार्च २०२४: लिव्‍हप्‍युअर या भारतातील आघाडीच्‍या होम व लिव्हिंग ग्राहक उत्‍पादन निर्माता कंपनीने वॉटर प्‍युरिफायर्सची त्‍यांची उल्‍लेखनीय अलुरा श्रेणी लॉन्च केली आहे. व्‍यक्‍तींना वॉटर प्‍युरिफायर्सची देखरेख करण्‍यामध्‍ये सामना कराव्‍या लागणाऱ्या आव्‍हानांचे निराकरण करत लिव्‍हप्‍युअरची अलुरा श्रेणी क्रांतिकारी सोल्‍यूशनसह ३० महिन्‍यांचे मोफत मेन्‍टेनन्‍स देते, ज्‍यामुळे त्रास व खर्च कमी होतो, जो वर्षाला जवळपास ५००० रूपये असू शकतो.

वॉटर प्‍युरिफायर श्रेणीमध्‍ये नवीन मानक स्‍थापित करत अलुरा श्रेणी तिची आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि ३० महिन्‍यांच्‍या एम्‍बेडेड सर्विससह वरचढ ठरते. अलुरा व अलुरा प्रीमिया या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असलेली ही श्रेणी मार्चपासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि निवडक मॉडर्न रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. लिव्‍हप्‍युअरला या लॉन्चसह विक्रीमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा आहे, जेथे ते आगामी महिन्‍यांमध्‍ये अलुरा श्रेणी देशभरात उपलब्‍ध करून देण्‍यासाठी वितरणामध्‍ये वाढ करत आहेत.

लिव्‍हप्‍युअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. राकेश कौल म्‍हणाले, ”आम्‍हाला वॉटर प्‍युरिफायर्सची उल्‍लेखनीय अलुरा श्रेणी लॉन्च करण्‍याचा आनंद होत आहे, जी विशेषत: विनासायास सोल्‍यूशन्‍सचा शोध घेत असलेल्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. लिव्‍हप्‍युअरमध्‍ये आम्‍ही व्‍यक्‍तींचे जीवन सुधारण्‍यासाठी, आमच्‍या उत्‍पादनांसह ते सुलभ, आरोग्‍यदायी व उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी नाविन्‍यतेच्‍या मर्यादांना दूर करण्‍याप्रती समर्पित आहोत. अलुरासह आम्‍ही उच्‍च-स्‍तरीय आकर्षकता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व अद्वितीय सोयीसुविधांना एकत्रित केले आहे, ज्‍यामधून १०० टक्‍के शुद्ध पाण्‍याची खात्री मिळते, तसेच ही श्रेणी ३० महिन्‍यांच्‍या मोफत मेन्‍टेनन्‍ससह येते.”

दोन्‍ही व्‍हेरिएण्‍ट्स सर्वसमावेशक ३०-महिन्‍यांच्‍या वॉरंटीसह येतात, जे उद्योगामध्‍ये पहिल्‍यांदाच ऑफर करण्‍यात आले आहेत. यामधून लिव्‍हप्‍युअरची ग्राहकांना विनासायास सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते. नवीन अलुरा मॉडेल ८-स्‍टेज प्‍युरिफिकेशन प्रक्रियेसह आरओ, यूव्‍ही, कॉपर आणि मिनरल फिल्‍टर्ससह येते, ज्‍यामुळे अत्‍यंत शुद्ध व आरोग्‍यदायी पाण्‍याची खात्री मिळते. उच्‍चस्‍तरीय अलुरा प्रीमियामध्‍ये फिल्‍ट्रेशनच्‍या १० टप्‍प्‍यांसह अतिरिक्‍त अल्‍कालिन व अल्‍ट्राफिल्‍ट्रेशन आहे, जे पाण्‍याच्‍या शुद्धतेला नव्‍या उंचीवर नेतात. ७ लीटरच्‍या स्‍टोरेज क्षमतेसह दोन्‍ही मॉडेल्‍स खात्री देतात की, शुद्ध केलेले पाणी गरजेच्‍या वेळी उपलब्‍ध असेल.

Related posts

सॅमसंग तंत्रज्ञान-प्रेमी भारतीय ग्राहकांसाठी एआय व हायपर कनेक्‍टीव्‍हीटी लाँच करणार: सॅमसंगचे उपाध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेएच हॅन

Shivani Shetty

पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी सर्वोत्तमतेची५० वर्षे साजरी केली

Shivani Shetty

पेटीएम अॅप २९ फेब्रुवारी नंतर देखील कार्यरत राहिल: विजय शेखर शर्मा

Shivani Shetty

Leave a Comment