मंगळवारी २९ ऑगस्टला भारताने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, या पार्श्वभूमीवर क्रीडापटूत्वाच्या क्षेत्रामध्ये नेहमीच दुर्लक्षित राहून जाणाऱ्या एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाशझोत टाकणे महत्त्वाचे आहे,आणि तो पैलू आहे – त्वचेची देखभाल. त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव असल्याने एखाद्या खेळाडूच्या आरोग्याच्या एकूण देखभालीमध्ये आणि कामगिरीमध्ये तिची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. या खास दिवशी आपण स्पर्धेची भावना, समर्पण, खेळाडूवृत्ती या सर्व गोष्टींचा गौरव करतो आणि यासाठी खेळाडूंच्या स्किनकेअर विश्वाला भेट देण्याहून अधिक चांगली पद्धत ती कोणती असणार?
खेळाडूंच्या वेगवान आयुष्यामध्ये प्रशिक्षण आणि कामगिरी या गोष्टी नेहमीच प्रकाशझोतात राहतात, त्वचेच्या नियमित देखभालीचे वेळापत्रक थोडे मागेच राहून गेलेले दिसते. पण त्वचेच्या योग्य देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यास त्वचेवर मुरुम-पुटकुळ्या येणे, त्वचा कोरडी होणे, प्रखर ऊनामुळे त्वचेची हानी होणे अशा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात व या सगळ्याचा खेळाडूच्या स्वास्थ्यावर लक्षणीय प्रभाव पडू शकतो. या लेखाच्या माध्यमातून सेटाफिल स्किनकेअर एक्स्पर्टसनी खेळाडूंच्या त्वचेच्या देखभालीमागील विज्ञानाचा उहापोह केला आहे व त्वचेच्या आरोग्याची रोगप्रतिकार यंत्रणेशी एकसंधता साधण्यासाठीच्या काही व्यवहार्य सूचनाही दिल्या आहेत.
खेळाडूंच्या त्वचेमागील विज्ञान:
हे विज्ञान शारीरिक सक्रियता आणि त्वचेचे शरीरशास्त्र यांच्यातील नाजूक संवादाभोवती फिरते. खेळामध्ये भाग घेतल्याने शरीरामध्ये गुंतागूंतीचे बदल होतात. उदा. रक्तप्रवाह वाढतो, शरीराचे तापमान वाढते आणि जास्त प्रमाणात घाम येतो. या घामामध्ये अनेक प्रकारची संयुगे असतात तसेच त्यात क्षार आणि टाकाऊ पदार्थही असतात,ज्यांचा त्वचेच्या PH पातळीवर आणि तिच्या स्निग्धतेच्या संतुलनावर परिणाम होतो.[i] या गोष्टी त्वचेसाठी काही असाधारण आव्हाने निर्माण करतात, ज्यांवरील उपाय खेळाडूंनी आवर्जून शोधला पाहिजे.
- त्वचेची आर्द्रता त्वचेच्या संरक्षक स्तराची लवचिकता टिकवणे: प्रदीर्घ काळासाठी घाम येत राहिल्यास व या काळात त्वचेला पुरेशा द्रवपदार्थांचा पुरवठा न झाल्यास त्वचेवरील नैसर्गिक संरक्षक स्तर बिघडतो, यामुळे त्वचा कोरडी येते, पापुद्रे सुटतात आणि ती अधिक हळवी बनते. इतकेच नव्हे तर UVकिरणांची सन्मुखता, ताणतणाव, प्रदूषण आणि त्वचेच्या संरक्षण स्तराला नुकसान पोहोचविणारे घटक यांमुळेही त्वचा संवेदनशील बनते व तिच्यावरील आर्द्रता उडून जाते. अशावेळी सेटाफिल एक परिणामकारक सोल्यूशन देऊ करते, ज्यात नायसिनामाइड (जीवनसत्त्व B3), पॅन्थेनॉल (जीवनसत्त्व B5),आणि ग्लिसरीन यांसारख्या सक्रिय घटकांचा समावेश आहे. हे घटक एकत्रितपणे त्वचेला त्रास देणाऱ्या घटकांपासून तिचे संरक्षण करतात, तिची आर्द्रता टिकवून ठेतात आणि सिरामाइड्सच्या सर्व वर्गांमध्ये सुधारणा घडवून आणतात,त्वचेच्या संरक्षक अडथळ्याच्या कार्यामध्ये सुधारणा घडवून आणतात.
- मुरुमे आणि डागांशी दोन हात: घाम, घाण, बॅक्टेरिया आणि त्वचेच्या मृतपेशी यांच्यामुळे त्वचेवरील छिद्रे बुजू शकतात व हे मुरुमे आणि डागांना कारणीभूत ठरू शकते.
- पर्यावरणाच्या परिणामांपासून संरक्षण: मोकळ्या जागी,उघड्यावर खेळांचे सराव चालत असल्याने खेळाडूंचा संपर्क घातक UV किरणांशी येतो, ज्यामुळे त्वचेचे नुकसान अधिक वेगाने होते, ती अकाली वृद्ध दिसू लागते व त्यातून त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो.
- मायक्रोबियल संतुलन राखणे: घामामुळे निर्माण होणारी उब आणि दमटपणा ही घातक सूक्ष्मजीवजंतूच्या पैदाशीसाठी आदर्श स्थिती असते, ज्यामुळे फंगल किंवा बॅक्टेरियल संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
खास खेळाडूंचा विचार करून त्वचेच्या देखभालीचे दैनंदिन नियोजन करताना:
घाम, घर्षण आणि दमटपणाशी प्रदीर्घ काळासाठी येणारा संपर्क यांमुळे त्वचा हळवी होऊ शकते, घासली जाऊ शकते आणि तिच्यावर मुरमे फुटू शकतात, त्यामुळे या यंत्रणा खास खेळाडूंच्या गरजांबरहुकूम तयार केल्या गेलेल्या स्किनकेअर वेळापत्रकाचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतींमध्ये अपेक्षित गोष्टींच्या बरोबरच खेळाडूंनी त्वचेचा संरक्षक स्तर जपण्याचे, संसर्ग रोखण्याचे आणि एकूणच त्वचेचे आरोग्य जपण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले पाहिजे. एक चांगले आणि निरोगी स्किनकेअर वेळापत्रक पाळण्यासाठी काही सोप्या उपाययोजना पुढे दिल्या आहेत:
- त्वचा काळजीपूर्वक स्वच्छ करणे: त्वचा नियमितपणे स्वच्छ ठेवल्यास तिच्यावरील घाम, घाण आणि बॅक्टेरिया अशा त्वचेची रंध्रे बुजविणाऱ्या गोष्टींपासून सुटका मिळते. त्वचेवरील नैसर्गिक तेले सांभाळण्यासाठी सल्फेट-मुक्त क्लिन्झर वापरा.
- लक्षपूर्वक एक्स्फॉलिएशन करा: आठवड्यातून एकदा व दोनदा एक्स्फॉलिएट केल्यास, अर्थात खरबरीत पदार्थाने त्वचेवरील मृत पेशी घालवून टाकल्यास तिच्यावरील रंध्रे बुजणार नाहीत. त्वचेला त्रास होऊ नये यासाठी सौम्य एक्स्फॉलिएटर वापरा.
- त्वचेची आर्द्रता जपण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी: हलक्या,नॉन-कॉमेडोजेनिक मॉइस्चराइझरचा वापर करून त्वचेला पोषण द्या, जेणेकरून त्वचेची रंध्रे न बुजता तिची आर्द्रता जपली जाईल.
- सूर्यापासून संरक्षण देणारा सोबती: घराबाहेरच्या कामांसाठी बाहेर पडण्याआधी त्वचेवर सेटाफिल Sun SPF 50+जेल लावा, जेणेकरून UV किरणांपासून त्वचेला प्रभावी संरक्षण मिळेल.
- व्यायामानंतरचे TLC (टेंडर लव्ह अँड केअर): व्यायामानंतर त्वचेवरील घाम आणि बॅक्टेरिया दूर करण्यासाठी ती हळूवारपणे स्वच्छ करा. जिममध्ये व्यायाम करून आल्यानंतर त्वचेचे थोडे अधिक लाड करा, व्यायामादरम्यान त्वचेवर साचणाऱ्याअशुद्धींपासून ती मुक्त होईल याची काळजी घ्या. व्यायामानंतर त्वचेची अशी झटपट स्वच्छता केल्याने ती ताजीतवानी तर होतेच, पण त्याचबरोबर तिचा नैसर्गिक तजेला टिकून राहण्यास मदत होते आणि तिचे एकूण स्वास्थ्यही जपले जाते.
रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेचे आरोग्य यांच्यातील आंतरसंबंध:
त्वचा एक संरक्षक कवच म्हणून काम करते, घातक सूक्ष्मजीवजंतू आणि पर्यावरणीय घटकांपासून आपले संरक्षण करते तर रोगप्रतिकारशक्ती शरीराचा दक्ष शिपाई म्हणून काम करते. रोगप्रतिकार यंत्रणा आणि त्वचा यांच्यामध्ये साधला गेलेला ताळमेळ त्वचेच्या देखभालीचे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यातील महत्त्व अधोरेखित करतो:
- चांगली झोप: पुरेशी झोप घेतल्याने शरीराला त्वचेच्या पेशींना नवसंजीवनी देता येते, यामुळे रोगप्रतिकार यंत्रणेची प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.
- ताणतणावांना हाताळणे: दीर्घकालीन ताणतणावामुळे रोगप्रतिकार यंत्रणा बिघडू शकते आणि त्वचेच्या समस्याही गंभीर रूप धारण करू शकतात. यासाठी ध्यानधारणा आणि दीर्घश्वसनासारख्या मन हलके करणाऱ्या पद्धतींचे अनुसरण करा.
- हलका व्यायाम: व्यायाम हा रोगप्रतिकार यंत्रणेचा साथीदार आहे हे खरे असले तरीही अतिरिक्त व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. कठोर व्यायाम आणि पुरेशी विश्रांती यांच्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा.
सर्व बाजूंनी त्वचेची देखभाल करण्यासाठी नियमितपणे उपाययोजना करणाऱ्या खेळाडूंना आपले बाह्यरूप तर सौंदर्यपूर्ण बनविता येतेच पण त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून एकूणच स्वास्थ्यामध्ये सुधारणा करता येते. माहितीनिशी केलेली त्वचेची देखभाल करताना,संतुलित आहार, द्रवपदार्थांचे सेवन आणि व्यक्तिगत वेळापत्रक यांच्यावर भर दिल्यास खेळाडूंना चमकदार, चांगली त्वचा घडवता येईल, जी त्यांच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील सर्व कामगिरीमध्ये त्यांची साथ देईल. म्हणूनच संतुलित जीवनशैली, योग्य स्किनकेअर आणि एक भक्कम रोगप्रतिकारयंत्रणा यांच्या माध्यमातून या दोन्ही पैलूंची जपणूक करणे ही इष्टतम स्वास्थ्य जपण्याची गुरुकिल्ली आहे.