मुंबई, २३ जून २०२४: ब्रिटीश-निर्मित आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रँड द बॉडी शॉपने बहुप्रतिक्षित सेल-ए-फिक एण्ड-ऑफ-सीझन सेलची घोषणा केली आहे. हा सेल जुलै अखेरपर्यंत सुरू राहणार असून ग्राहकांना ब्रँडच्या व्यापक उत्पादन श्रेणीवर आकर्षक सूटचा आनंद घेता येईल. हा एण्ड ऑफ सीझन सेल द बॉडी शॉपच्या निष्ठावान ग्राहकांना ब्रिटीश रोझ, स्ट्रॉबेरी अँड आल्मंड बॉडी बटर, टी ट्री ऑईल अँड बॉडी लोशन्स अशा सर्वात लोकप्रिय ट्रीट्स आणि प्रतिष्ठित श्रेणींवर जवळपास ५० टक्क्यांची सूट देतो.
याव्यतिरिक्त, ब्रँडच्या व्यापक कलेक्शनमधील आल्मंड हँड क्रीम, एडलवाइज बाउन्सी बॉडी मिस्ट, व्हिटॅमिन सी ओव्हरनाइट पील यांसारख्या काही उत्पादनांवर अविश्वसनीय करणारी ५० टक्के सूट आहे. या डिलला अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी वाढदिवस व खास प्रसंगांसाठी प्री-पॅक केलेले गिफ्ट्स देखील आकर्षक दरांमध्ये उपलब्ध आहेत.
आकर्षक दरांसह द बॉडी शॉपचा सेल प्रत्येकासाठी प्रत्येक बजेटमध्ये विविध प्रसंगांसाठी भेटवस्तू देतो, ज्यामुळे हे पसंतीचे गिफ्टिंग गंतव्य आहे, जेथे तुम्ही आकर्षक दरांमध्ये टी ट्री फेस बेस, फ्रेशन न्यूड फाऊंडेशन व फ्रॅग्रन्ससह स्किनकेअर, बॉडी केअर, हेअर केअर, मेकअप अशा सर्व श्रेणींमधील ब्रँडच्या उच्च दर्जाच्या, १०० टक्के वेगन प्रॉडक्ट फॉर्म्युलेशन्ससह ब्युटी रूटीन अधिक आकर्षक करू शकता. या श्रेणीमध्ये ब्रँडचा बीस्पोक कम्युनिटी फेअर ट्रेड (सीएफटी) उपक्रमाच्या माध्यमातून नैतिकदृष्ट्या स्रोत मिळवलेल्या साहित्याचा समावेश आहे.
द बॉडी शॉप दीर्घकाळापासून नैतिक व शाश्वत पद्धतींमध्ये अग्रणी आहे. ब्रँडचे संपूर्ण कलेक्शन १०० टक्के वीगन आहे आणि सर्व पॅकेजिंग रिसायक्लेबल आहे. त्यांच्या उत्पादनांमधील बहुतांश साहित्य नैसर्गिकदृष्ट्या स्रोत मिळवलेले आहे, ज्यामधून जागरूक व इको-फ्रेण्डली शॉपिंग अनुभवाची खात्री मिळते.
नुकतेच, भारतातील आपला १८वा वर्धापन दिन साजरा करताना द बॉडी शॉपने आपल्या मुंबईतील स्टोअरमध्ये ब्रेल वैशिष्ट्ये सादर केली. द बॉडी शॉपचा हा नाविन्यपूर्ण व अद्वितीय उपक्रम भारतात ब्रँडच्या सर्वसमावेशकता व सुलभतेप्रती सुरू असलेल्या प्रयत्नांमधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. द बॉडी शॉपने नुकतेच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन वर्कशॉपचे आयोजन केले. या वर्कशॉपच्या माध्यमातून ब्रँडने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक असण्याचा अर्थ एक्स्प्लोअर व समजण्यास सक्षम केले, तसेच ते कर्मचाऱ्यांना सर्वांसाठी सुरक्षित, स्वागतार्ह व सर्वसमावेशक स्पेस निर्माण करण्यास प्रेरित करत आहे, समान वर्कप्लेस निर्माण करत आहेत.