maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील प्राइम फोकसने जनरेटिव्‍ह एआयमध्‍ये जागतिक नेतृत्‍व मिळवले, कन्‍टेन्‍ट निर्मि‍तीच्‍या भविष्‍याचे सक्षमीकरण

भारत – फेब्रुवारी 20, 2025: प्राइम फोकस ही भारतातील आघाडीची कन्‍टेन्‍ट निर्मिती पॉवरहाऊस जनरेटिव्‍ह एआय लँडस्‍केपमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, तसेच भारताला जागतिक स्‍तरावर अग्रस्‍थानी नेत आहे. तीन दशकांहून अधिक काळापासून नमित मल्‍होत्रा यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत कंपनीच्‍या धोरणात्‍मक संपादनांनी भारतीय आर्टिस्‍ट्सना यशस्‍वीपणे जागतिक स्‍तरावर नेले आहे. या प्रयत्‍नाने डीएनईजीला व्हिज्‍युअल इफेक्‍ट्ससाठी सात अकॅडमी अवॉर्ड्स, तसेच अनेक इतर मान्‍यता देखील मिळवून दिल्‍या आहेत. आता, नाविन्‍यतेच्‍या भावी लाटेला चालना देत असताना ब्रँड डीएनईजीच्‍या ब्रह्माअंतर्गत नवीन संपादनासह जनरेटिव्‍ह एआय तंत्रज्ञानामध्‍ये साहसी झेप घेत आहे.

डीएनईजी ग्रुपने निर्माण केलेली जागतिक एआय व कन्‍टेन्‍ट तंत्रज्ञान कंपनी ब्रह्माने आज एआय कन्‍टेन्‍ट निर्मिती तंत्रज्ञानांची आघाडीची डेव्‍हलपर मेटाफिजिकच्‍या संपादनाची घोषणा केली. विलिनीकरणाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आलेले हे संपादन एंटरप्राइजेज, आयपी अधिकार-धारक आणि उद्योगांमधील कन्‍टेन्‍ट क्रिएटर्ससाठी ब्रह्माच्‍या एआय-पॉवर्ड उत्‍पादनांच्‍या विकासाला गती देईल, ज्‍यामुळे ते मोठ्या प्रमाणात उच्‍च दर्जाचे कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍यामध्‍ये सक्षम होतील.

व्‍यवहारानंतर ब्रह्माचे मूल्‍यांकन १.४३ बिलियन यूएस डॉलर्स आहे. आघाडीची अबु धाबी-स्थित गुंतवणूकदार युनायटेड एआय साक्‍वेर ग्रुप (यूएएसजी) डीएनईजी ग्रुपसोबत सहयोगाने ब्रह्मामध्‍ये आणखी २५ दशलक्ष यूएस डॉलर्सची गुंतवणूक करेल. २०२४ मध्‍ये यूएएसजीने डीएनईजी ग्रुपमध्‍ये केलेल्‍या २०० दशलक्ष यूएस डॉलर्सच्‍या धोरणात्‍मक गुंतवणूकीनंतर ही गुंतवणूक करण्‍यात आली आहे. मेटाफिजिकचे विद्यमान गुंतवणूकदार जसे लिबर्टी ग्‍लोबल, एस३२, राकूटेन कॅपिटल, टीओ व्‍हेंचर्स आणि ८व्‍हीसी ब्रह्मामध्‍ये भागधारक बनतील.

ब्रह्मा व्हिडिओ, इमेज व ऑडिओ फॉर्मेट्समध्‍ये युजर-कस्‍टमाइज कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एआय-नेटिव्‍ह उत्‍पादनांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीचा भाग म्‍हणून एआय, डेटा आणि कन्‍टेन्‍ट वर्कफ्लोसाठी पायाभूत तंत्रज्ञान विकसित करण्‍यास सज्‍ज आहे. या व्‍यवहारानंतर ब्रह्माची जागतिक टीम ८० हून अधिक इंजीनिअर्स आणि क्रिएटिव्‍ह टेक्‍नॉलॉजिस्‍ट्सपर्यंत वाढेल. ही टीम डिजिटल ह्युमन्‍स व कॅरेक्‍टर सिम्‍युलेशन्‍स निर्माण करण्‍यासाठी झिवाचे तंत्रज्ञान असलेल्‍या डीएनईजी ग्रुपच्‍या क्रिएटिव्‍ह तंत्रज्ञान पोर्टफोलिओमधील पुरस्‍कार-प्राप्‍त इनोव्‍हेशन्‍सना मेटाफिजिकच्‍या अग्रगण्‍य एआय तंत्रज्ञानासह एकीकृत करेल. तसेच, ते मार्केट-अग्रणी एआय सोल्‍यूशन क्‍लीअरⓇ प्‍लॅटफॉर्मचा फायदा घेतील. हा प्‍लॅटफॉर्म कन्‍टेन्‍ट शोध, निर्मिती व व्‍यवस्‍थापनामधील आठ वर्षांहून अधिक काळाच्‍या संशोधन व विकासासह डिझाइन करण्‍यात आला आहे, तसेच जागतिक क्‍लायण्‍टवर्गाचे पाठबळ आहे.

अकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर्स आर्ट्स अँड सायन्‍सेसने झिवाला २०२५ सायटेक अवॉर्ड (2025 SciTech Award)सह सन्‍मानित करण्‍यासोबत मेटाफिजिकच्‍या एआय न्‍यूरल परफॉर्मन्‍स टूलसेटला व्हिज्‍युअल इफेक्‍ट्स सोसायटी अवॉर्ड्स येथे प्रतिष्ठित इमर्जिंग टेक्‍नॉलॉजी अवॉर्ड (Emerging Technology Award)सह सन्‍मानित करण्‍यात आल्‍यानंतर ही घोषणा करण्‍यात आली आहे.

“प्राइम फोकसमध्‍ये आमचा इनोव्‍हेशन नेहमी मुलभूत दृष्टिकोन राहिला आहे. आमचा भारतातील व्‍यापक टॅलेंट समूहाला अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह सक्षम करण्‍यावर, तसेच त्‍यांना उद्योगांमध्‍ये निपुण होण्‍यास सुसज्‍ज करण्‍यावर विश्‍वास आहे. आमच्‍या नवीन संपादनासह आम्‍ही मोठी साहसी झेप घेत आहोत, जेथे आम्‍ही जागतिक मनोरंजन क्षेत्रात धुमाकूळ निर्माण करण्‍यास सज्‍ज आहोत. हा ब्रेकथ्रू कथानकाला नवीन दिशा देतो, आपले प्रसिद्ध महाकाव्‍य रामायणमध्‍ये अद्वितीय व्हिज्‍युअल क्षमता व सर्वोत्तम अनुभवांची भर करतो. गेल्‍या वर्षी आम्‍ही झिवाचे संपादन केले आणि आता, ब्रह्माने मेटाफिजिकचे संपादन करण्‍यासह आमच्‍याकडे बाजारपेठेतील अग्रणी ३डी व २डी टूल्‍स आहेत, ज्‍यामुळे भारतातील उद्योगांमधील सर्वात प्रतिष्ठित व्‍यक्‍तींचे अल्‍ट्रा-रिअॅलिस्टिक डिजिटल डबल्‍सची निर्मिती करता येईल,” असे प्राइम फोकसचे संस्‍थापक आणि डीएनईजीचे ग्‍लोबल सीईओ नमित मल्‍होत्रा म्‍हणाले.

ते पुढे म्‍हणाले, “मीडिया व मनोरंजन, रिटेल, आरोग्‍यसेवा, शिक्षण अशा प्रत्‍येक क्षेत्रामधील आयपी अधिकार-धारक व कन्‍टेन्‍ट क्रिएटर्सना आता मोठ्या प्रमाणात उल्‍लेखनीय कन्‍टेन्‍ट आणि सर्वोच्‍च बजेट्स असलेल्‍यांसाठी पूर्वी आरक्षित केलेला दर्जा निर्माण करण्‍यास सक्षम होतील. ब्रह्मा कन्‍टेन्‍ट निर्मितीच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून कथानकाला नव्‍या उंचीवर नेण्‍यास सज्‍ज आहे.”

ब्रह्माच्‍या कार्यकारी व्‍यवस्‍थापन टीममध्‍ये प्रबळ व अनुभवी तंत्रज्ञान लीडर्सचा समावेश आहे, ज्‍यांना कार्यकारी अध्‍यक्ष प्रभू नरसिंहन, प्राइम फोकसचे संस्‍थापक व डीएनईजीचे ग्‍लोबल सीईओ नमित मल्‍होत्रा आणि मेटाफिजिकचे सीईओ व ब्रह्माचे अध्‍यक्ष म्‍हणून सेवा दिलेले थॉमस ग्रॅहम यांचे नेतृत्‍व लाभले आहे.

ब्रह्माच्‍या कार्यकारी नेतृत्‍व टीममध्‍ये विविध प्रमुख सदस्‍यांचा समावेश आहे, जसे प्राइम फोकस टेक्‍नॉलॉजीजचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक रामकी शंकरनारायणन, जे क्‍लीअरⓇचे अध्‍यक्ष म्‍हणून देखील भूमिका बजावतील; डीएनईजी ग्रुपचे सीटीओ पॉल साल्विनी, जे ब्रह्माचे सीटीओ म्‍हणून सेवा देतील आणि झिवाचे कॅरेक्‍टर टूल्‍स अँड वर्कफ्लोचे संचालक क्रॉफर्ड डोरॅन, ज्‍यांना झिवाचे उपाध्‍यक्ष म्‍हणून नियुक्‍त करण्‍यात आले आहे.

“ब्रह्मामध्‍ये आम्‍ही डीएनईजीच्‍या विविध अकॅडमी अवॉर्ड विजेते व्हिज्‍युअल इफेक्‍ट्स व अॅनिमेशन टूलसेट्स घेत आहोत आणि जनरेटिव्‍ह एआयच्‍या अविश्‍वसनीय क्षमतेसह त्‍यांना एकत्र करत एआय कन्‍टेन्‍ट उत्‍पादनांची श्रेणी डिझाइन करत आहोत. आमचा विश्‍वास आहे की, यामध्‍ये उद्योगामधील आघाडीचे फोटोरिअॅलिस्टिक एआय व्हिडिओ क्रिएटर असतील,” असे ब्रह्माचे कार्यकारी अध्‍यक्ष प्रभू नरसिंहन म्‍हणाले. ते पुढे म्‍हणाले, “मला विविध उद्योगांमधील एंटरप्राइजेज व कन्‍टेन्‍ट क्रिएटर्सना सेवा देण्‍यासाठी उच्‍च-स्‍तरीय चित्रपट आणि टीव्‍ही प्रॉडक्‍शनवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विशिष्‍ट युजरवर्गाच्‍या माध्‍यमातून ब्रह्माचा विस्‍तार करण्‍याचा आनंद होत आहे. तुमच्‍याकडे सांगण्‍यासाठी कथानक आणि ते कथानक प्रत्‍यक्षात आणण्‍याची संकल्‍पना असेल तर आमच्‍याकडे तुम्‍हाला जलदपणे, अधिक किफायतशीरपणे आणि उत्तम दर्जासह ते कथानक सादर करण्‍यास मदत करण्‍यासाठी टूल्‍स आहेत.”

Related posts

७२ टक्‍के नियोक्‍त्यांचा फ्रेशर्सना नियुक्‍त करण्याकडे कल: टीमलीज एडटेक

Shivani Shetty

भारतातील पहिली ‘गो कोडर्ज’ राष्ट्रीय कोडिंग स्पर्धा

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने सड़क सुरक्षा के प्रति अपनी प्रतिबद्धता मजबूत की, मिजोरम में 1,250 से अधिक चालकों के लिए सड़क सुरक्षा जागरूकता और स्वास्थ्य पहल की शुरुआत की

Shivani Shetty

Leave a Comment