maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कुहूची फंड्सइंडियासोबत हातमिळवणी

मुंबई, २१ जून २०२४: कुहू हा आधुनिक स्‍टुडण्‍ट लोन प्‍लॅटफॉर्म आणि फंड्सइंडिया ही भारतातील सर्वात मोठी म्‍युच्‍युअल फंड्स वितरक कंपनी यांनी भारतीय विद्यार्थ्‍यांना सर्वसमावेशक आर्थिक सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगाचा विद्यार्थ्‍यांना गुंतवणूक व कर्ज सेवांचा फायदा घेत सहजपणे आणि आत्‍मविश्‍वासाने त्‍यांच्‍या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे.

या सहयोगाच्‍या माध्‍यमातून कुहू विद्यार्थी कर्ज, प्रगत तंत्रज्ञान व विश्‍लेषण क्षमतांमधील आपल्‍या कौशल्‍यांचा फायदा घेत सर्वोत्तम कर्ज सोल्‍यूशन्‍स देईल, जे विद्यार्थ्‍याच्‍या अद्वितीय गरजांची पूर्तता करतील. फंड्सइंडियासोबत सहयोग करत कुहू विद्यार्थी व त्‍यांच्‍या कुटुंबांना विनासायास कर्ज व गुंतवणूक सेवा उपलब्‍ध करून देईल, ज्‍यामुळे आर्थिक अडचणींचा विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक महत्त्वाकांक्षांमध्‍ये अडथळा येणार नाही याची खात्री मिळेल.

कुहूचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत ए भोंसले म्‍हणाले, ”फंड्सइंडियासोबतचा आमचा सहयोग प्रतिभावान भारतीय विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या पालकांवर अधिक आर्थिक ताण न देता स्‍वत:चे शिक्षण पूर्ण करण्‍याची जबाबदारी घेण्‍याची संधी देण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे. यामुळे विद्यार्थी कामाला सुरूवात करण्‍यापूर्वी आत्‍मनिर्भर (स्‍वावलंबी) होऊ शकतात आणि त्‍यांच्‍या पालकांच्‍या संपत्तीचे जतन करू शकतात, जी निवृत्तीनंतरच्‍या दर्जेदार जीवनासाठी गुंतवणूक करता येऊ शकते. या सहयोगासह आमचा विनासायास गुंतवणूक व कर्ज सेवा उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामधून आर्थिक अडचणींचा विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक महत्त्वाकांक्षांमध्‍ये अडथळा न येण्‍याची खात्री मिळते.”

या सहयोगाचा प्रमुख फायदा म्‍हणजे ते ऑफर करणारे एकीकृत आर्थिक सेवा प्‍लॅटफॉर्म. कुहूच्‍या माध्‍यमातून सिंगल स्‍टुडण्‍ट लोन अॅप्‍लीकेशनसह विद्यार्थी व त्‍यांचे कुटुंब १० हून अधिक बँका आणि एनबीएफसींमधील सर्वोत्तम उत्‍पादनांचा लाभ घेऊ शकतात, ज्‍यामधून पर्याय व स्‍पर्धात्‍मक अटींची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध होण्‍याची खात्री मिळेल. तसेच, ते फंड्सइंडियाच्‍या म्‍युच्‍युअल फंड्सचा व्‍यापक पोर्टफोलिओ एक्‍स्‍प्‍लोअर करू शकतात, ज्‍यामुळे ते हुशारीने गुंतवणूक करण्‍यास आणि उज्‍ज्‍वल आर्थिक भविष्‍यासाठी बचत वाढवण्‍यास सक्षम होतील.    

Related posts

अभिबसद्वारे केवळ १ रुपयामध्ये प्रवासाची सुविधा

Shivani Shetty

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून कोचीमध्‍ये दोन नवीन ईव्‍ही एक्‍सक्‍लुसिव्‍ह रिटेल स्‍टोअर्स लाँच

Shivani Shetty

जीवनसाथी डॉटकॉमचा लोकप्रिय गायिका नीती मोहनसह सहयोग

Shivani Shetty

Leave a Comment