maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतात आकर्षक म्‍युझिक फ्रेम लाँच, किंमत २३,९९० रूपये

गुरूग्राम, भारत – जून, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतात म्‍युझिक फ्रेम लाँच केला. कलाकृतीसारखा दिसणारा वायरलेस स्‍पीकर सॅमसंग म्‍युझिक फ्रेममध्‍ये डॉल्‍बी अॅटमॉस आणि वायरलेस म्‍युझिक स्ट्रिमिंग अशी नवीन वैशिष्‍ट्ये आहेत आणि किंमत केवळ २३,९९० रूपये आहे.

हा स्‍टायलिश वायरलेस स्‍पीकर लिव्हिंग स्‍पेसेसमध्‍ये सामावून जात आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतो. वास्‍तविक फ्रेमप्रमाणे सॅमसंग म्‍युझिक फ्रेम वापरकर्त्‍यांना वैयक्तिक फोटोज पाहण्‍याची सुविधा देतो. बहुमूल्‍य क्षण किंवा कलाकृतींचे फोटो पाहत संगीत ऐकण्‍याचा आनंद वापरकर्त्‍याच्‍या अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जातो.

सॅमसंग म्‍युझिक फ्रेम आजपासून Samsung.inAmazon.in वर आणि निवडक ऑफलाइन स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

”आधुनिक काळातील ग्राहक कार्यक्षमता व आकर्षकतेचे संयोजन असण्‍यासोबत व्हिज्‍युअली लक्षवेधक दिसणाऱ्या उत्‍पादनांचा अधिकाधिक शोध घेत आहेत. या ट्रेण्‍डला त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व व स्‍टाइलला दाखवणाऱ्या आणि लिव्हिंग स्‍पेसच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करणाऱ्या उत्‍पादनांसाठी असलेल्‍या इच्‍छेचे पाठबळ आहे. नवीन म्‍युझिक फ्रेममध्‍ये अद्वितीय, आकर्षक डिझाइनसह पिक्‍चर फ्रेमच्‍या स्‍वरूपात अपवादात्‍मक तंत्रज्ञान आहे, तसेच सिनेमॅटिक ऑडिओ अनुभव देते,” असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

म्‍युझिक फ्रेम वापरकर्त्‍यांना वायरशिवाय संगीत ऐकण्‍याचा आनंद देतो, तसेच उच्‍च दर्जाची साऊंड क्‍वॉलिटी देतो, जे सुस्‍पष्‍ट ऑडिओसह कोणत्‍याही स्‍पेसमध्‍ये उत्‍साहाची भर करते. यामधील वैयक्तिकृत, फ्रेम केलेली कलाकृती होम डेकोरला अधिक आकर्षक करते, ज्‍यामधून लिव्हिंग स्‍पेसेसची आकर्षकता वाढवण्‍यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेण्‍याप्रती सॅमसंगची क्षमता दिसून येते. यामुळे हा कोणत्‍याही घरामध्‍ये समाविष्‍ट करता येईल असा शक्तिशाली स्‍पीकर आहे, जो आकर्षकरित्‍या डिझाइन केलेल्‍या डिवाईसमध्‍ये आकर्षक व्हिज्‍युअल लुक व अपवादात्‍मक ऑडिओ कार्यक्षमता देतो.  

डॉल्‍बी अॅटमॉस तंत्रज्ञान

कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या थ्री-डायमेन्‍शनल ऑडिओ अनुभवामध्‍ये सामावून जा, ज्‍यामधून वास्‍तवि‍क साऊंडस्‍केपची निर्मिती होते, जे संगीत ऐकण्‍याचा आनंद अधिक उत्‍साहित करते. चित्रपट पाहायचा असो किंवा संगीत ऐकायचे असो किंवा गेम्‍स खेळायचे असो, डॉल्‍बी अॅटमॉस तंत्रज्ञान ऑडिओ अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, ज्‍यामुळे वापरकर्ते मनोरंजनामध्‍ये भारावून जातात.

सातत्‍यपूर्ण साऊंड दर्जा

घरात कुठूनही संतुलित व सातत्‍यपूर्ण ऑडिओ दर्जाचा आनंद घ्‍या, ज्‍यामधून सानुकूल संगीत ऐकण्‍याचा अनुभव मिळतो. स्‍पीकर साऊंडमध्‍ये येणाऱ्या व्‍यत्‍ययांना दूर करतो आणि संपूर्ण खोलीमध्‍ये सुस्‍पष्‍ट ऑडिओ ऐकू येण्‍याची खात्री देतो, ज्‍यामुळे घरातील कानाकोपऱ्यामध्‍ये सुस्‍पष्‍ट आवाजात मनोरंजनाचा आनंद घेता येतो.

प्रभावी नियंत्रण

म्‍युझिक फ्रेम अॅलेक्‍सा व गुगल असिस्‍टण्‍ट यांसारख्‍या बिल्ट-इन वॉईस असिस्‍टण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून प्रभावी नियंत्रण देतो. वापरकर्ते कमांड्स बोलताच म्‍युझिक फ्रेम त्‍वरित प्रतिसाद देतो, ज्‍यामुळे म्‍युझिक प्‍ले, पॉज, ट्रॅक स्किपिंग आणि व्‍हॉल्‍यूम अॅडजस्‍टमेंट सहजपणे करता येते, ज्‍यासाठी मॅन्‍युअल हस्‍तक्षेपाची गरज भासत नाही. हे वैशिष्‍ट्य सोयीसुविधा व ऑडिओवर विनासायास नियंत्रण देते.

वैयक्तिकृत साऊंड ऑप्टिमायझेशन

प्रगत रूम अॅनालिसिस व ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानासह खोलीमधील विशिष्‍ट वातावरणानुसार ऑडिओचा आनंद मिळतो. स्‍पेसफिट साऊंड प्रो खोलीमधील आवाजाचे विश्‍लेषण करते आणि त्‍यानुसार साऊंड आऊटपुट समायोजित करते, ज्‍यामधून सानुकूल ऑडिओ दर्जाची खात्री मिळते. हे तंत्रज्ञान वन-साइज-फिट्स-ऑल ऑडिओला परिपूर्ण वैयक्तिकृत ऑडिओमध्‍ये रूपांतरित करते.  

क्‍यू-सिम्‍फोनी इंटीग्रेशन

वापरकर्ते टीव्‍हीच्‍या दोन्‍ही बाजूला दोन म्‍युझिक फ्रेम्‍स ठेवत सुस्‍पष्‍ट स्टिरिओ साऊंडसाठी क्‍यू-सिम्‍फोनीचा वापर करू शकतात. सराऊंड साऊंडसाठी, वापरकर्ते टीव्‍हीसमोर साऊंडबार ठेवू शकतात आणि समोरील भिंतीवर असलेला म्‍युझिक फ्रेम रिअर स्‍पीकर सारखे काम करेल. स्‍मार्टथिंग्‍ज अॅपसह वापरकर्ते त्‍यांच्‍या पसंतीनुसार इक्‍वलायझर सेटिंग्‍ज सेट करू शकतात.  

अनुकूल ऑडिओ कार्यक्षमता

रिअल-टाइममध्‍ये कन्‍टेन्‍टशी जुळणाऱ्या ऑडिओचा अनुभव घ्‍या, ज्‍यामधून प्रत्‍येक सीन व व्‍हॉल्‍युम पातळीसाठी सानुकूल केलेले सुस्‍पष्‍ट आवाज व मोठ्या साऊंड्सचा आनंद मिळतो.

About Samsung Electronics Co., Ltd.

Samsung inspires the world and shapes the future with transformative ideas and technologies. The company is redefining the world of TVs, smartphones, wearable devices, tablets, digital appliances, network systems and memory, system LSI, foundry and LED solutions. For latest news on Samsung India, please visit Samsung India Newsroom at http://news.samsung.com/in. For Hindi, log on to Samsung Newsroom Bharat at https://news.samsung.com/bharat. You can also follow us on Twitter @SamsungNewsIN

Related posts

इझमायट्रिपची अदानी डिजिटल लॅब्‍ससोब‍त हातमिळवणी

Shivani Shetty

इंटरनेट सेफ बँकिंग टेस्टमध्ये क्विक हीलला अव्वल स्थान

Shivani Shetty

मधुमेह असताना आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना

Shivani Shetty

Leave a Comment