मुंबई, २० फेब्रुवारी २०२४: जवळपास दशकापासून द बॉडी शॉपचे ब्रिटीश रोझ बॉडी केअर कलेक्शन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. या कलेक्शनमधील निसर्गामधून प्रेरित फुलांचा सुगंध, उत्कृष्ट टेक्स्चर्स आणि १०० टक्के वेगन-प्रमाणित फॉर्म्युलेशन्स सेल्फ-केअर अनुभव देतात, जे तुमच्या त्वचेला कोमल, फुलांसारखा सुगंध देतात. या सहयोगांतर्गत डायना पेंटीचे डायनॅमिक व्यक्तिमत्त्व नवीन कम्युनिकेशन मोहिमेच्या माध्यमातून आयकॉनिक कलेक्शनमध्ये फ्रेश उत्साहाची भर करेल.
द बॉडी शॉप इंडियाच्या प्रॉडक्ट, मार्केटिंग अॅण्ड डिजिटलच्या उपाध्यक्ष हरमीत सिंग म्हणाल्या, ”द बॉडी शॉपमध्ये आम्ही सेल्फ-लव्हसाठी दैनंदिन नित्यक्रम म्हणून आमच्या निसर्गामधून प्रेरित आयकॉनिक उत्पादनांना अधिक प्राधान्य देतो, यामुळे व्यक्तींना त्यांचे सर्वोत्तम लुक मिळण्यास मदत होते. आम्हाला १०० टक्के वेगन प्रॉडक्ट फॉर्म्युलेशन्स असलेली आयकॉनिक ब्रिटीश रोझ रेंज दाखवणाऱ्या आमच्या उत्साहवर्धक डिजिटल जाहिरातीसाठी द बॉडी शॉपसोबत डायना पेंटी यांच्या सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. या उपक्रमाचा प्रेमामध्ये अनेक अनुभव सामावलेले असण्यासह प्रियजनाची काळजी घेण्याची भावना असते हा संदेश देण्याचा मनसुबा आहे. या वैविध्यपूर्ण श्रेणीसह आमचा ग्राहकवर्गामध्ये वाढ करण्याचा, विद्यमान ग्राहकांमधील निष्ठा वाढवण्याचा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे.”
भारतीय अभिनेत्री डायना पेंटी या मोहिमेबाबत आपला उत्साह व्यक्त करत म्हणाल्या, ”मला निसर्गामधून प्रेरित फुलांचा सुगंध असलेल्या ब्रिटीश रोझसह द बॉडी शॉपच्या नवीन मोहिमेचा भाग असण्याचा आनंद होत आहे. हा उपक्रम स्वत:ची काळजी घेण्याला चालना देण्यावर, तसेच स्वत:च्या सौंदर्याची काळजी घेण्यावर असलेल्या माझ्या विश्वासाशी संलग्न आहे. मला पर्यावरणीय जबाबदारी आणि वैयक्तिक स्वास्थ्याला प्राधान्य देणाऱ्या ब्रॅण्डला पाठिंबा देण्याचा आनंद होत आहे. या सुरेख कलेक्शनमध्ये गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबाचे सार, रोझहिप ऑइल यांचा सुगंध सामावलेला आहे, ज्यामधून तुम्हाला गुलाबाच्या सुगंधाचा अनुभव मिळेल.”
ब्रिटीश रोझ बाथ व बॉडी श्रेणी:
ब्रिटीश रोझ शॉवर जेलसह तुमच्या शरीराला उत्साहवर्धक व उत्तम निगेचा अनुभव घ्या. सुपर-क्रीमी ब्रिटीश रोझ बॉडी बटरसह अभूतपूर्व पोषणाचा आनंद घ्या. ९६ टक्के नैसर्गिक मूळ घटकांसह इंग्लिश रोझ अर्क, घानामधील हस्तनिर्मित कम्युनिटी फेअर ट्रेड शिया बटर आणि निकाराग्वा येथील कम्युनिटी फेअर ट्रेड तिळाचे तेल यापासून तयार करण्यात आलेले हे बॉडी मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेला कोमल, निस्तेज करण्यासह ९६ तासांपर्यत मॉइश्चराइज ठेवण्यासह पोषण देते. तसेच ते त्वचेला नैसर्गिक चमक देखील देते. ब्रिटीश रोझ बॉडी योगर्ट त्वरित त्वचेमध्ये शोषले जाते आणि ९२ टक्के नैसर्गिक मूळ घटकांसह कम्युनिटी फेअर ट्रेड शिया बटर आणि कम्युनिटी फेअर ट्रेड आल्मंड मिल्कपासून तयार करण्यात आले आहे. सामान्य ते कोरड्या त्वचेवर या हलक्या, अस्निग्ध जेल-क्रीमचा वापर करा, ज्यामधून त्वचा कोमल, निस्तेज होते आणि त्वचा ४८ तासांपर्यंत मॉइश्चराइजसह हायड्रेटेड राहते. ब्रिटीश रोझ ईओ डि टॉयलेट ९१ टक्के नैसर्गिक मूळ घटकांपासून तयार करण्यात आले, जे तुमच्या त्वचेला फुलांसारखा सुगंध देते.