आजच्या व भावी पिढीमधील सर्वांना जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आहाराच्या माध्यमातून उत्तम पोषण देण्याच्या मनसुब्यासह नेस्ले इंडियाने ‘रिसोर्स अॅक्टिव्ह’ लाँच केले आहे. हे अनेक फायदे असलेले हाय प्रोटीन सप्लीमेंट सक्रिय मिलेनियल्सच्या वेलनेससंदर्भातील गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. अद्वितीय ‘न्यू एज फॉर्म्युला’सह रिसोर्स अॅक्टिव्हमध्ये स्नायूंसाठी उच्च दर्जाचे प्रथिन, हाडांच्या आरोग्यासाठी संपन्न कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी हायलॉरोनेट आहे. तसेच या सप्लीमेंटमध्ये फायबर व इम्यूनोन्यूट्रिएण्ट्स देखील आहेत. रिसोर्स अॅक्टिव्ह सप्लीमेन्टेशनच्या माध्यमातून मिलेनियल्सच्या पौष्टिक आवश्यकतेची पूर्तता करते.
झपाट्याने विकसित होत असलेली प्रोटीन सप्लीमेंट बाजारपेठ असताना देखील व्यक्तींसाठी सर्वोत्तम ऑफरिंग्जची गरज आहे. संशोधनांमधून* निदर्शनास येते की वयाच्या तिशीनंतर स्नायूबळ कमी होत जाते. यामुळे हाडांची घनता कमी होणे, उतींची क्षमता कमी होणे आणि स्किन हायड्रेशन व सुरकुत्या यांसारखी वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. रिसोर्स अॅक्टिव्ह या वयोगटातील व्यक्तींच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करते, स्नायूबळ, ऊर्जा, हाडांचे आरोग्य व त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते. ग्राहक स्वादिष्ट व्हॅनिला बिस्किट फ्लेवरमध्ये पाणी किंवा दूधासह रिसोर्स अॅक्टिव्हचा आस्वाद घेऊ शकतात.
या लाँचबाबत मत व्यक्त करत नेस्ले इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश नारायणन म्हणाले, ”नेस्ले इंडिया शक्तिशाली ब्रॅण्ड्स व उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांच्या जीवनात मूल्याची भर करण्याच्या मिशनवर आहे. आम्हाला सक्रिय प्रौढ व्यक्तींसह मिलेनियल्ससाठी रिसोर्स अॅक्टिव्ह लाँच करण्याचा आनंद होत आहे. रिसोर्स अॅक्टिव्ह व्यापक संशोधनाचे आऊटपुट आहे आणि नेस्लेचा दर्जा व सुरक्षिततेचे पाठबळ आहे. आम्हाला विश्वास आहे की ब्रॅण्ड सक्रिय मिलेनियल्सच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करेल, तसेच त्यांना सक्रिय जीवन जगण्यास साह्य करेल.”
रिसोर्स अॅक्टिव्ह ईकॉमर्सववर, तसेच दिल्ली एनसीआर, कोलकाता, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोईम्बतूर, कोची, कोझीकोडे आणि तिरूवनंतपुरम या ११ शहरांमधील राष्ट्रीय फार्मसीज व स्थानिक केमिस्ट्समध्ये उपलब्ध असेल.
नेस्ले हेल्थ सायन्स ही पोषण विज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी आहे. पोषणाच्या उपचारात्मक भूमिकेचा विस्तार करून ग्राहक, रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील अन्य सहयोगींच्या आरोग्य व्यवस्थापनाची पद्धत बदलून टाकण्यावर या कंपनीचा भर आहे. कंपनीची महत्त्वाचे उत्पादने पुढीलप्रमाणे – रिसोर्स हाय प्रोटीन, पेप्टामेन, ऑप्टिफास्ट, रिसोर्स डायबेटिक, रिसोर्स फायबर चॉईस, थिकन अप क्लीअर, रिसोर्स रेनल आणि रिसोर्स डायलिसिस. नेस्ले हेल्थ सायन्सकडे वैद्यकीय तज्ज्ञांची एक समर्पित टीम असून ती देशभरातील आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या मदतीने जागरूकता व शिक्षणासाठी काम करते.
previous post
next post