maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कॉलेज विद्याने एआय सर्च टूलचे अनावरण केले

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४: ऑनलाइन शिक्षणाच्या पर्यायांची निवड संपूर्ण माहितीनिशी करता यावी यासाठीची सर्व मदत एकाच ठिकाणी पुरविणाऱ्या कॉलेज विद्या या मंचाने आपल्या वेबसाइटवर एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या नव्या सर्च टूलचे अनावरण केले आहे. यूजर्सना त्यांच्या विशिष्ट गरजांबरहुकूम व्यक्तिविशिष्ट आणि उपयुक्त माहिती पुरवित त्यांच्या अभ्यासक्रम, संस्था, विद्यापीठे/एडटेक, प्लेसमेंट्स, अभ्यासक्रम, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया, फीज आणि अशा अनेक गोष्टी शोधण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणणे हे या नाविन्यपूर्ण सुविधेचे लक्ष्य आहे.

नवे एआय सुसज्ज प्रगत सर्च टूल यूजरचा हेतू समजून घेत त्यांना उपलब्ध माहितीमधील सर्वात अचूक आणि विश्वासार्ह माहिती पुरविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. अनेक प्रगत निकषांच्या आधारे अभ्यासक्रम आणि संस्थांच्या विशाल माहितीसाठ्याचा तपशीलवार शोध घेत हवी असलेली माहिती हुशारीने मिळविण्याच्या आपल्या क्षमतेचा वापर करत यूजर्सना अत्यंत व्यक्तिगत सर्च रिझल्ट्स मिळण्याची खातरजमा या सुविधेद्वारे केले जातात. यामुळे यूजर्सची शैक्षणिक वाटचाल अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक होते.

कॉलेज विद्याचे को-फाउंडर आणि सीओओ रोहित गुप्ता म्हणाले, “कॉलेज विद्यामध्ये आम्ही संपूर्ण माहितीनिशी निवड करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती पुरवित विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याप्रती बांधिल आहोत. ज्याप्रमाणे गुगल हे ऑनलाइन शिकण्याच्या सर्व गरजा पुरविणारे ठिकाण आहे, त्याच धर्तीवर सीव्ही सर्च हे ऑनलाइन शिक्षणाविषयीची सर्व माहिती हमखास मिळविण्याचे स्थळ म्हणून विकसित करत ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणे हे आमचे स्वप्न आहे. जेव्हा जेव्हा विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचा विचार करतील तेव्हा तेव्हा त्यांच्या मनात आपोआपच सीव्ही सर्चचे नाव यावे, आपल्या शिक्षणविषयक सर्व गरजा एकाच ठिकाणी पुरविणारे ठिकाण म्हणून त्यांनी या मंचाकडे पहावे अशी आमची इच्छा आहे. विस्तृत डेटाच्या पायावर उभारले गेलेले आणि विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यूज तसेच प्रतिक्रियांनी समृद्ध असलेले सीव्ही सर्च म्हणजे केवळ एक मंच नव्हे – तर शिक्षणाच्या क्षेत्रात समुदायाद्वारे आणली गेलेली ही एक क्रांती आहे.”

एआय तंत्रज्ञानाचा फायदा घेत आपल्या सेवांचा तांत्रिक आधारस्तंभ अधिक मजबूत बनविणे आणि अधिक व्यक्तिगत व संबंद्ध सर्च रिझल्ट्स मिळून देत यूजर्सच्या अनुभवात सुधारणा घडवून आणणे हे कॉलेज विद्याचे लक्ष्य आहे. कॉलेज विद्या सर्च बारवर प्रतिदिन ३००० हून अधिक वेळा माहितीचा शोध घेतला जात असताना, या मंचावर उपलब्ध शैक्षणिक संसाधनांच्या विशाल माहितीसंचातून हवी ती माहिती शोधण्याच्या पद्धतीमध्ये या नव्या वैशिष्ट्यामुळे आमूलाग्र बदल होणार आहे.  

Related posts

केरल आपदा के लिए 5 करोड़ रुपए देगा कल्याण ज्वेलर्स

Shivani Shetty

नेस्‍ले इंडियाकडून बहुप्रतिक्षित नेस्‍प्रेसो लाँच

Shivani Shetty

टाटा मोटर्सने सानंद प्‍लांटमधून १ दशलक्षव्‍या कार सादरीकरणाला साजरे केले*

Shivani Shetty

Leave a Comment