maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

१८ शहरांतील धावपटूंचा अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉनमध्ये सहभाग

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४: कमीत कमी वेळात उत्तम कामगिरी बजावण्यावर भर देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन नुकतीच पार पडली. या उपक्रमामुळे स्पर्धकांना प्रतिष्ठित वर्ल्ड मॅरेथॉन मेजर्समध्ये सहभागासाठी पात्रता मिळवण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला आहे.

देशभरातील १८ वेगवेगळ्या शहरांमधून आलेल्या धावपटूंनी चंदिगढमध्ये येऊन आपली क्रीडाकौशल्ये प्रदर्शित केली. या स्पर्धेत फक्त पात्र खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार होता आणि पात्रता मिळवण्यासाठी त्यांना त्यांचा याआधीचा परफॉर्मन्स डेटा सादर करणे आवश्यक होते. या स्पर्धेमध्ये धावपटूंनी उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीचे प्रदर्शन केले.

ही मॅरेथॉन ऍथलेटिकदृष्ट्या तर महत्त्वाची होतीच, शिवाय देशभरातील स्पर्धक व दर्शकांना आकर्षित करून चंदिगढ शहराचे सौंदर्य आणि आतिथ्य यांचा अनुभव घेण्याची संधी दिली व पर्यटनाला चालना दिली. शहरातील उत्साही बाजारपेठांची सैर करण्यापासून समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्यापर्यंत अनेक प्रकारे या सर्वांनी चंदिगढ शहरात उत्तम वेळ व्यतीत केला आणि सुखद आठवणी निर्माण केल्या.

सरकारचा पाठिंबा, पोलीस व प्रशासनाचे सहयोगपूर्ण प्रयत्न यामुळे हा उपक्रम सुरळीतपणे पार पडला. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ही स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे. आयोजकांना खात्री आहे की, ही स्पर्धा आशिया पॅसिफिक क्षेत्रातील प्रीमियर वर्ल्ड मॅरेथॉन मेजर क्वालिफायर बनेल.

Related posts

भारतातील पहिली ‘गो कोडर्ज’ राष्ट्रीय कोडिंग स्पर्धा

Shivani Shetty

इझमायट्रिपचा झूमकारसोबत सहयोग

Shivani Shetty

इझमायट्रिपचा गोल्डन भारत ट्रॅव्हल सेल

Shivani Shetty

Leave a Comment