maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा पंच एसयूव्‍हींमध्‍ये सर्वात जलदपणे ४ लाख विक्रीचा टप्‍पा गाठणारी वेईकल ठरली

मुंबई, ऑगस्‍ट, २०२४ – टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीला घोषणा करताना आनंद होत आहे की टाटा पंचने उल्‍लेखनीय टप्‍पा गाठला आहे, जेथे अवघ्‍या ३४ महिन्‍यांत एसयूव्‍हींमध्‍ये जलदपणे ४ लाख विक्रीचा टप्‍पा गाठला आहे. ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या टाटा पंचने भारतात सब कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणी सादर केली. उंच स्‍टान्‍स, उंच ग्राऊंड क्‍लीअरन्‍स आणि लक्षवेधक ड्रायव्हिंग पोझीशनसह पंच आकर्षक साहसी एसयूव्‍ही आहे, जी रोमहर्षक ड्रायव्हिंग अनुभव देते, तसेच भारतातील विविध प्रदेशांमध्‍ये सहजपणे नेव्हिगेट करते. याच बाबीचे प्रात्‍यक्षिक दाखवत टाटा पंच संदकफूच्‍या अनपेक्षित शिखरामधून नेव्हिगेट करणारी पहिली फ्रण्‍ट-व्‍हील ड्राइव्‍ह एसयूव्‍ही ठरली. तेथील तीव्र ग्रेडिएण्‍ट्समधून मार्ग काढत या वेईकलने जगासमोर आपल्‍या एसयूव्‍ही क्षमता दाखवून दिल्‍या आणि आपल्‍या वजनापेक्षा अधिक उत्तम कामगिरी करत सर्व विषमतांवर मात केली.
लाँच करण्‍यापूर्वी पंचला प्रख्‍यात जीएनसीएपी ५-स्‍टार रेटिंग मिळाले, जे त्‍या वेळी कोणत्‍याही वेईकलने संपादित केलेले सर्वोच्‍च प्रौढ व्‍यक्‍ती संरक्षण रेटिंग पॉइण्‍ट्स होते. ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये पंचने अवघ्‍या १० महिन्‍यांमध्‍ये १ लाख विक्रीचा टप्‍पा गाठणारी पहिली एसयूव्‍ही बनत उद्योगामध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित केला. तेव्‍हापासून पुढील १ लाख विक्रीचा टप्‍पा गाठताना पुढील ९ महिन्‍यांमध्‍ये २ लाख विक्रीचा टप्‍पा गाठला आणि लवकरच पुढील ७ महिन्‍यांमध्‍ये ३ लाख विक्रीचा टप्‍पा गाठला.
तसेच, २०२३ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या पंच आयसीएनजी या बूट स्‍पेसबाबत तडजोड न करता टाटा मोटर्सचे नाविन्‍यपूर्ण ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञान असलेल्‍या पहिल्‍या एसयूव्‍हीने बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केला. जानेवारी २०२४ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेल्‍या Punch.ev ने विविध ड्राइव्‍हट्रेन्‍समध्‍ये अधिकाधिक ग्राहकांसाठी उपलब्‍ध असण्‍यासह विक्रीत अधिक वाढ केली.
या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ”टाटा मोटर्स भारतातील ग्राहकांबाबत सखोल माहिती असण्‍यासाठी ओळखली जाते. हे पैलू आम्‍हाला वैविध्‍यपूर्ण व उच्‍च कार्यक्षम उत्‍पादने निर्माण करण्‍यास सक्षम करते. पंचसह आम्‍ही भारतातील बाजारपेठेत नवीन सब-सेगमेंट सादर करण्‍यासोबत कॉम्‍पॅक्‍ट फूटप्रिंटमध्‍ये सर्वसमावेशक पॅकेज देत एसयूव्‍ही पैलूंचे यशस्‍वीपणे लोकशाहीकरण देखील केले. आम्‍हाला आनंद होत आहे की पंचने देखील भारतातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि निष्‍ठावान ग्राहकवर्ग तयार केला आहे, जे या वेईकलचे सर्वात मोठे ब्रँड अॅम्‍बेसेडर्स बनले आहेत. आम्‍हाला हा टप्‍पा गाठण्‍याचा अभिमान वाटतो आणि विश्‍वास आहे की पुढील १ लाख विक्रीचा टप्‍पा देखील लवकरच संपादित होईल.”
पंच आयसीई बाबत:
सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये वार्षिक ७५ टक्‍क्‍यांची मोठी वाढ दिसण्‍यात आली, जेथे आर्थिक वर्ष २४ मध्‍ये टाटा पंच अग्रस्‍थानी होती, जिने या सेगमेंटमध्‍ये ६८ टक्‍के मार्केट शेअर संपादित केले. ९०-डिग्री डोअर ओपनिंग, सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये प्रमाणित वैशिष्‍ट्य म्‍हणून इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम, रेन सेन्सिंग वायपर्स आणि १८७ मिमीचे सर्वोच्‍च ग्राऊंड क्‍लीअरन्‍स अशा अग्रणी वैशिष्‍ट्यांसह नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत पंच आज देशातील प्रीमियर सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही बनली आहे, जेथे सुरक्षिततेप्रती कटिबद्धता अधिक दृढ होत आहे. भर करण्‍यात आलेल्‍या सीएनजी व्‍हेरिएण्‍टने विक्रीला अधिक गती दिली, ज्‍याचे एकूण पंच ब्रँडमध्‍ये ३० टक्‍के वाढीचे योगदान होते.
Punch.ev बाबत:
Punch.ev ने ईव्‍ही उत्‍साहींचे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले आहे , तसेच पंच ब्रँडच्‍या एकूण विक्री वाढीमध्‍ये अतिरिक्‍त १५ टक्‍क्‍यांचे योगदान दिले आहे. Punch.ev ही Tata.ev चे क्रांतिकारी प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर acti.ev (अॅडवान्‍स्ड कनेक्‍टेड टेक-इंटेलिजण्‍ट इलेक्ट्रिक वेईकल)वर सादर करण्‍यात आलेली पहिली वेईकल आहे. हे आर्किटेक्‍चर Punch.ev मध्‍ये लांब अंतरापर्यंतची क्षमता, अपवादात्‍मक कार्यक्षमता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम वैशिष्‍ट्यांची भर करते, जे उच्‍च श्रेणीच्‍या वेईकलमध्‍ये आढळून येतात. या उत्‍पादनाने इलेक्ट्रिक वेईकल्‍सबाबतच्‍या अनेक मिथकांना दूर करण्‍यास मदत केली आहे, जेथे या वेईकलचे २१ टक्‍के ग्राहक पहिले कारमालक आहेत. Punch.ev ही सर्वात जलदपणे १३,००० विक्रीचा टप्‍पा गाठणारी ईव्‍ही आहे आणि बाजारपेठांमध्‍ये प्रगती करत आहे, जेथे पंच ब्रँड आधीच प्रबळ ठरला आहे. तसेच, या वेईकलने विशिष्‍ट बाजारपेठांमध्‍ये ईव्‍ही प्रवेश वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, जेथे पारंपारिकरित्या आयसीई मॉडेल्‍स चालवल्या जातात.
कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये १७.७ मार्केट शेअरसह पंचचे यश सर्व विभागांमधील सर्वाधिक विक्री होणारी वेईकल म्‍हणून प्रबळ स्‍थानामधून दिसून येते (वायटीडी आर्थिक वर्ष २५). आर्थिक वर्ष २४ साठी आपल्‍या विक्रीमध्‍ये वार्षिक २७ टक्‍क्‍यांची वाढ करत पंच जानेवारी २०२४ ते जून २०२४ पर्यंत सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍ही राहिली आहे. एकूण विक्रीच्‍या संदर्भात, पंचचे पेट्रोल व्‍हेरिएण्‍ट एकूण पंच विक्रीमध्‍ये ५३ टक्‍के योगदान देते, ज्‍यानंतर ३३ टक्‍क्‍यांसह सीएनजी व्‍हेरिएण्‍ट आणि १४ टक्‍क्‍यांसह वेईकलचे ईव्‍ही व्‍हेरिएण्‍ट यांचा क्रमांक आहे (कॅलेंडर वर्ष २४).
*(वायटीडी आर्थिक वर्ष २५)
-समाप्‍त –
ऑफर्स आणि कार खरेदी करण्‍याच्‍या पर्यायांबाबत अधिक माहितीसाठी तुमच्‍या जवळच्‍या डिलरशीपशी संपर्क साधा किंवा https://cars.tatamotors.com/ येथे भेट द्या.

Related posts

कॅडीसच्या महसूलात वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ

Shivani Shetty

एल्‍गी (ELGi) कडून भारतात कम्‍प्रेस्‍ड एअर सिस्‍टम्‍ससाठी स्‍मार्ट मॉनिटरिंग व अलर्ट सिस्‍टम ‘Air~Alert’ सादर

Shivani Shetty

चिल अॅट होम’ स्‍प्राइटकडून मोहिम लाँच

Shivani Shetty

Leave a Comment