maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

आयथिंक लॉजिस्टिक्सचा फेडेक्‍ससोबत सहयोग

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३: आयथिंक लॉजिस्टिक्‍स या भारतातील आघाडीच्‍या शिपिंग व्‍यासपीठाने एक्‍स्‍प्रेस परिवहन व लॉजिस्टिक्‍समधील जागतिक अग्रणी कंपनी फेडेक्‍ससोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगाचा आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये प्रवेश करणाऱ्या ई-कॉमर्स विक्रेत्‍यांना एकसंधी शिपिंग सोल्‍यूशन्‍स व खर्चामध्‍ये मोठ्या प्रमाणात बचत करत भारतातील क्रॉस-बॉर्डर ई-कॉमर्स क्षेत्राला नव्‍या उंचीवर नेण्‍याचा उद्देश आहे.

फेडेक्‍स-कॉम्‍पॅटिबल सोल्‍यूशन प्रदाता म्‍हणून आयथिंक लॉजिस्टिक्‍स भारतीय ई-कॉमर्स विक्रेत्‍यांना जागतिक स्‍तरावर विकसित होण्‍यास सक्षम करण्‍याप्रती समर्पित आहे. हा सहयोग विक्रेत्‍यांना केवळ एका क्लिकमध्‍ये त्‍यांची स्‍वत:ची फेडेक्‍स खाती निर्माण करण्‍याची सुविधा देतो, ज्‍यामधून प्रक्रियेतील एकसंधीपणा दिसून येतो आणि अनावश्‍यक त्रास दूर होतात. यामागील उद्देश सोल्‍यूशन करून देण्‍याचे आहे, जो आंतरराष्‍ट्रीय शिपिंगमधील गुंतागूंती सुलभ करेल आणि कार्यरत कार्यक्षमतेमध्‍ये वाढ करेल.

आयथिंक लॉजिस्टिक्‍सच्‍या सह-संस्‍थापक कु. झैबा सारंग म्‍हणाल्‍या. “आयथिंक लॉजिस्टिक्‍समध्‍ये आमचा प्रत्‍येक ई-कॉमर्स क्रॉस-बोर्डर विक्रेत्‍याला त्‍यांच्‍या धीऱ्याकडे पाहता आधुनिक शिपिंग इनोव्‍हेशन्‍स प्रदान करत वर्तमान स्थितीला आव्‍हान करण्‍यााचा मुलभूत दृष्टिकोन आहे. फेडेक्‍स सारख्‍या प्रख्‍यात कंपनीसोबत सहयोग आम्‍हाला व आमच्‍या विक्रेत्‍यांना जागतिक पोहोच वाढवण्‍यास आणि अद्वितीय विश्‍वसनीय सेवेचा लाभ घेण्‍यास सक्षम करतो.”

या सहयोगाचे विशेष वैशिष्‍ट्य म्‍हणजे विक्रेत्‍यांना प्रमुख फेडेक्‍स सेवांवर जवळपास ७६ टक्‍क्‍यांच्‍या उल्‍लेखनीय सवलतींचा फायदा घेण्‍याची विशेष संधी आहे. ई-कॉमर्स उद्योजक फेडेक्‍सच्‍या सर्वोत्तम सेवांचा फायदा घेऊ शकतात, ज्‍यामध्‍ये अत्‍यंत गतीशील २ ते ३ दिवसांमध्‍ये डिलिव्‍हरी देण्‍याची सेवा, फेडेक्‍स इंटरनॅशनल प्रायोरिटी एक्‍स्‍प्रेस यांचा समावेश आहे. तसेच, ते फेडेक्‍स इंटरनॅशनल प्रायोरिटीचा वापर करत २ ते ३ दिवसांमध्‍ये त्‍यांची पोहोच २२० हून अधिक देशांपर्यंत विस्‍तारित करू शकतात. अवजड शिपमेंट्ससाठी हा सहयोग फेडेक्‍स इंटरनॅशनल प्रायोरिटी फ्रेटच्‍या माध्‍यमातून ३ ते ४ कामकाजाच्‍या दिवसांमध्‍ये जलदपणे डिलिव्‍हरीज पोहोचवण्‍याची सुविधा देतो.

आयथिंक लॉजिस्टिक्‍स आणि फेडेक्‍स यांच्‍यामधील सहयोग भारतातील क्रॉस-बोर्डर ई-कॉमर्स शिपिंगमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठा टप्‍पा आहे. यामधून ई-कॉमर्स विक्रेत्‍यांच्‍या प्रगतीला चालना देण्‍याप्रती आणि जागतिक बाजारपेठेत यशस्‍वी होण्‍यास साह्य करणारी सर्वोत्तम सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती आयटीएलची कटिबद्धता दिसून येते.

Related posts

गुन्हा, षडयंत्र आणि भ्रष्टाचार: ‘मनी माफिया सीझन ३’ ७ एप्रिल रोजी डिस्कव्हरी चॅनलवर

Shivani Shetty

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून पहिले प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर – ‘acti.ev’ लाँच

Shivani Shetty

Mobil 1 50वीं वर्षगांठ: आगे के लिए तैयार

Shivani Shetty

Leave a Comment