मुंबई, १ डिसेंबर २०२४: टीमलीज डिजिटलचे विश्लेषण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी जीसीसी (ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स), आयटी प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस आणि नॉन-टेक क्षेत्रांमधील प्रमुख कार्यक्षम विभागांतील एण्ट्री-लेव्हल रोजगार पदांच्या बदलत्या गतीशीलतेवर प्रकाश टाकते. डेटामधून फ्रेश टॅलेंटसाठी मागणी दिसून येत असून अपेक्षित वेतनांबाबत अंदाज देखील दिसून येतो, ज्यामधून आर्थिक वर्ष भारतातील वाढत्या कर्मचारीवर्गाला कशाप्रकारे आकार देईल याबाबत माहिती मिळते.
मुंबईतील सर्वात लोकप्रिय टेक पदांमध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंट, डेटा सायन्स आणि डेटा इंजीनिअर अग्रस्थानी असून अनुक्रमे प्रतिवर्ष १९.५ लाख रूपये, प्रतिवर्ष १४.५ लाख रूपये व प्रतिवर्ष १० लाख रूपये असे प्रभावी वेतन पॅकेजेस् देतात. तसेच डेव्हऑप्स, फुल स्टॅक डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा अॅनालिटिक्समधील पदे प्रतिवर्ष ७.९ लाख रूपयांपासून प्रतिवर्ष ८.३ लाख रूपयांपर्यंत उत्तम स्पर्धात्मक वेतन देतात.
वेतन आणि कार्यक्षम डोमेन्स:
टीमलीज डिजिटल निदर्शनास आणतात की कोडिंग, डिझायनिंग व सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन्सचे व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणारा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इंजीनिअरिंग डोमेन आकर्षक संधी देण्यास सज्ज आहे. उत्पादकता, अचूकता व नाविन्यता वाढवण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये एआय/एमएल कौशल्यांसाठी वाढती मागणी या ट्रेण्डला अधिक गती देत आहे. परिणामत: आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरपर्यंत या डोमेनमधील एण्ट्री-लेव्हल पदांसाठी जीसीसीमध्ये प्रतिवर्ष ९.३७ लाख रूपये, आयटी प्रॉडक्ट्स अँड सर्विसेसमध्ये प्रतिवर्ष ६.२३ लाख रूपये आणि नॉन-टेक क्षेत्रामध्ये प्रतिवर्ष ६ लाख रूपये सरासरी वेतन दिसण्याची अपेक्षा आहे.
आयटी पायाभूत सुविधांच्या संरक्षणाची खात्री घेणारे महत्त्वपूर्ण क्षेत्र सायबर सिक्युरिटी व नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन डोमेनमध्ये जीसीसी प्रतिवर्ष ९.५७ लाख रूपयांच्या सरासरी वेतनासह अग्रस्थानी असण्याची अपेक्षा आहे, जे त्यांच्या आयटी काऊंटरपार्टसच्या तुलनेत ४०.१२ टक्के उच्च आहे. यामधून असुरक्षितता ओळखण्यासोबत जोखीम एक्स्पोजरचे निराकरण करण्यामधील कौशल्यासाठी महत्त्वपूर्ण गरज दिसून येते. तसेच आयटी प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस प्रतिवर्ष ६.८३ लाख रूपये आणि नॉन-टेक क्षेत्रे प्रतिवर्ष ५.१७ लाख रूपये वेतन देऊ शकतात.
उच्च मागणी असलेली रोजगार पदे आणि क्षेत्राबाबत माहिती:
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी जीसीसी प्रतिवर्ष ८.८ लाख रूपये ते प्रतिवर्ष ११.८ लाख रूपयांपर्यंत वेतन असलेले पेनेट्रेशन टेस्टर, डेटा सायण्टिस्ट, फुल स्टॅक डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि कस्टमर सक्सेस स्पेशालिस्ट अशा पदांना प्राधान्य देत आहे. आयटी प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस क्षेत्र बिग डेटा डेव्हलपर्स, आयटी ऑडिटर्स, आरपीए बिझनेस अॅनालिस्ट्स, क्लाऊड सिक्युरिटी इंजीनिअर्स आणि आयओटी इंजीनिअर्स अशा पदांचा शोध घेत आहे, तसेच प्रतिवर्ष ६.९ लाख रूपये ते प्रतिवर्ष ९.७ लाख रूपयांपर्यंत वेतन देत आहे. नॉन-टेक क्षेत्रे प्रतिवर्ष ६ लाख रूपये ते प्रतिवर्ष ९.४ लाख रूपये वेतन असलेल्या डेटा इंजीनिअर, एसएपी एबीएपी कन्सल्टण्ट, क्लाऊड सपोर्ट इंजीनिअर, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट आणि ऑटोमेशन इंजीनिअर अशा पदांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
टीमलीज डिजिटलच्या उपाध्यक्ष मुनिरा लोलीवाला म्हणाल्या, ”भारतातील टेक रोजागर बाजारपेठेत झपाट्याने बदल होताना दिसत आहे, जेथे आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आमच्या डेटामधून निदर्शनास येते की मुंबई प्रबळ पायाभूत सुविधा आणि कुशल टॅलेंट समूह असलेले प्रमुख शहर म्हणून उदयास येत आहे. आयटी सर्विसेसमध्ये गेल्या २ ते ३ वर्षांत फ्रेशर व एण्टी-लेव्हल हायरिंगसंदर्भात मंदीचे वातावरण दिसण्यात आले असले तरी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीस) आणि नॉन-टेक क्षेत्रे तरूण टॅलेंटचे स्वागत करण्यासाठी आणि मोठ्या संधी देण्यासाठी ध्वजवाहक ठरले आहेत. याचे श्रेय १.६६ दशलक्षहून अधिक कर्मचारी असण्यासोबत जागतिक दर्जा कायम राखण्याप्रती प्रयत्न करणाऱ्या भारतातील जीसीसींच्या झपाट्याने विस्तारीकरणाला जाऊ शकते. मुंबईतील उद्योगांमध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंट व डेटा सायन्सप्रती मागणी वाढत आहे, ज्यामुळे टॅलेंटसाठी व्यापक संधी निर्माण होत आहेत. मुंबईतील जीसीसी, आयटी व नॉन-टेक क्षेत्रांमधील कंपन्या त्यांच्या टॅलेंट संपादन धोरणांना विकसित करत असल्यामुळे उमेदवारांना उद्योग गरजांशी संलग्न असलेल्या हायब्रिड कौशल्यांसह ससज्ज होण्याची मोठी संधी आहे.”