maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ २०२२ ची विजेती टीम स्‍पुटनिक ब्रेन ‘टूगेदार फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ डिजिटल ऑलिम्पिक कम्‍युनिटी फॉर पॅरिस २०२४ येथे भारताचे प्रतिनिधित्‍व करत आहे

गुरूग्राम, ऑगस्‍ट, २०२४: सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स, वर्ल्‍डवाइड ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्‍मार्टफोन पार्टनरने ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक गेम्‍स चाहत्‍यांसह लोकांसाठी नवीन डिजिटल कम्‍युनिटी लॉंच करून प्रसार करण्‍यासाठी पॅरिसमध्‍ये ३१ जुलै रोजी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (आयओसी) सोबत सहयोगाने इव्‍हेण्‍ट ‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’चे आयोजन केले.
हा इव्‍हेण्‍ट पॅरिस २०२४ शी समर्पित पॅरिसमधील बहुपयोगी प्रदर्शन स्‍थळ SPOT24 येथे आयोजित करण्‍यात आला. या इव्‍हेण्‍टला आयओसीचे अध्‍यक्ष थॉमस बॅच, आयओसीच्‍या टेलिव्हिजन अँड मार्केटिंग सर्विसेसच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक अॅनी-सोफी वोमार्ड, पॅरालिम्पिक कमिटी (आयपीसी) चे अध्‍यक्ष अँड्र्यू पार्सन्‍स, सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे अध्‍यक्ष व ग्‍लोबल मार्केटिंग ऑफिसचे प्रमुख वायएच ली, सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स युरोप ऑफिस Il चे अध्‍यक्ष क्‍यूंग संग आणि माजी सुवर्ण पदक विजेते फ्रेंच हँडबॉल खेळाडू, प्रख्‍यात व्हिज्‍युअल आर्टिस्‍ट व ऑलिम्पिक म्‍युझियम फॉर पॅरिस २०२४ द्वारे नेतृत्वित ऑलिम्पियन आर्टिस्‍ट्स प्रोग्रामधील सहभागी ल्‍यूक अॅबेलो यांनी उपस्थिती दाखवली.
माजी टीम कोरिया व्‍हॉलिबॉल खेळाडू येऑन कॉंग किम, टीम जीबी स्‍केटबोर्डर अँडी मॅकडोनाल्‍ड, ऑस्‍ट्रेलियन पॅरा-अॅथलीट मॅडिसन डी रोझेरिओ आणि युके कन्‍टेन्‍ट्स क्रिएटर व द रॅपिंग सायन्‍स टीचर मॅट ग्रीन हे जागतिक अॅम्‍बेसेडर्स म्‍हणून या प्रकल्‍पामध्‍ये सहभाग घेणार आहेत, तसेच सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून ‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’साठी सक्रियपणे कन्‍टेन्‍ट शेअर करतील.
सॅमसंग आणि आयओसीने जगभरातील ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक चाहत्‍यांना ऑलिम्पिक मूव्‍हमेंटचा अनुभव घेण्‍यासोबत त्‍यामध्‍ये सामील होण्‍यास मदत करण्‍यासाठी ‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ प्रकल्‍प विकसित केला. हा प्रोग्राम विशेषत: तरूण पिढींवर लक्ष केंद्रित करतो, तसेच तरूण सहभागींना ‘ऑलिम्पिक मूल्‍यांच्‍या उत्‍साहामध्‍ये निराकरण, प्रगती व निर्माण करण्‍यास’ मदत करण्‍याच्‍या उद्देशासह नवीन समुदाय डिझाइन करण्‍यात आला आहे.
‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ तीन नवीन समुदाय-केंद्रित उपक्रमांना सादर करतो. सॉल्‍व्‍ह चॅलेंजमध्‍ये क्रीडा व ऑलिम्पिझमसह सॅमसंगचा सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो उपक्रम समाविष्‍ट आहे. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो हा तरूण-केंद्रित सामाजिक योगदान उपक्रम आहे, जो तरूणांना आयओसीच्‍या ऑलिम्पिझम३६५ च्‍या प्राधान्‍यक्रमांशी संलग्‍न प्रमुख सामाजिक आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी क्रीडा व तंत्रज्ञानाचा वापर करत नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याकरिता सक्षम करतो. मूव्‍ह चॅलेज जगभरातील गेम्‍सच्‍या चाहत्‍यांना सॅमसंगच्‍या स्‍मार्ट मोबाइल फोनचा वापर करत पुढे जाण्‍यास आणि अधिक चालण्‍यास प्रेरित करतो. क्रिएट चॅलेंज सहभागींना सॅमसंगच्‍या स्‍मार्ट डिवाईस आणि एस पेनच्‍या माध्‍यमातून नाविन्‍यपूर्ण डिजिटल आर्टिस्‍ट्स समुदायामध्‍ये सर्जनशील होण्‍याची संधी देते.
लॉंच इव्‍हेण्‍टमध्‍ये सॅमसंगच्‍या ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ उपक्रमामध्‍ये यशस्‍वी ठरलेल्‍या १० टीम्‍सची ‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ अॅम्‍बेसेडर्स म्‍हणून घोषणा करण्‍यात आली. संपूर्ण ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक गेम्‍स पॅरिस २०२४ दरम्‍यान हे अॅम्‍बेसेडर्स सामाजिक आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी त्‍यांनी निर्माण केलेल्‍या सोल्‍यूशन्‍सना दाखवतील आणि जगभरातील ऑलिम्पिक चाहत्‍यांशी संलग्‍न होण्‍यासाठी काम करतील. ते सोल्‍यूशन्‍सचे निराकरण करण्‍यासोबत शाश्‍वत विकासाला चालना देण्‍यासाठी आयओसी यंग लीडर आणि आयओसीद्वारे समर्थित विविध उपक्रमांसोबत सहयोग देखील करतील.
‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ इव्‍हेण्‍टदरम्‍यान अॅम्‍बेसेडर्सनी वास्‍तविक विश्‍वातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या त्‍यांच्‍या ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ प्रकल्‍पांबाबत सांगितले. विविध नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍यात आले, ज्‍यामध्‍ये व्‍यक्‍तींना दृष्टि विकलांगतेवर मात करण्‍यासाठी मदतीपासून कर्मचाऱ्यांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य देणाऱ्या नवीन मार्गांचा समावेश होता.
”सॅमसंग इंडियाला ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो, २०२२’ची विजेती टीम स्‍पुटनिक ब्रेनमधील शंकर यांच्‍या यशस्‍वी कामगिरीचा अभिमान वाटतो आणि त्‍यांचा विकास व यशासाठी शुभेच्‍छा देतो. आम्‍हाला तणाव दूर करण्‍याच्‍या आणि आरोग्‍यसेवेत सुधारणा करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या सोल्‍यूशनमधील व्‍यापक क्षमता माहित आहे. आम्‍हाला ‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ उपक्रमाचा देखील अभिमान वाटतो, ज्‍याने तरूणांना ऑलिम्पिक्‍स मूल्‍यांमध्‍ये सहभाग घेत त्‍यांचा अनुभव घेण्‍याची संधी दिली,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्‍यक्ष एसपी चुन म्‍हणाले.
”सॅमसंग सॉल्व्‍ह फॉर टूमारो तरूणांना नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍याची अविश्‍वसनीय संधी देतो,” असे ‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ मोहिमेसाठी जागतिक अॅम्‍बेसेडर म्‍हणून भारताचे प्रतिनिधित्‍व केलेले टीम स्‍पुटनिक ब्रेनमधील शंकर श्रीनिवासन म्‍हणाले. शंकर यांनी नॉन-इव्‍हेसिव्‍ह वीअरेबल डिवाईस विकसित केले, ज्‍याचा तणाव कमी करण्‍याचा, केमिकल-मुक्‍त स्‍ट्रेस रिलीफ सोल्‍यूशन्‍ससाठी जागतिक गरजेची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. शंकर यांची भविष्‍यात मानसिक आरोग्‍यसेवा सुधारण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. ते पुढे म्‍हणाले, ”मला अशा प्रख्‍यात जागतिक मंचावर माझा देश भारताचे प्रतिनिधित्‍व करण्‍याचा आनंद होण्‍यासोबत अभिमान वाटतो, जेथे मी आपल्‍या भूमातेसाठी उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवण्‍यास मदत करण्‍यासाठी माझ्या नवकल्‍पना व दृष्टिकोन सादर केले.”
”मी सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोने हजारो तरूणांना भावी प्रमुख म्‍हणून प्रगती करण्‍याची दिलेल्‍या संधी पाहून प्रभावित झालो आहे,” असे आयओसीचे अध्‍यक्ष थॉमस बॅच म्‍हणाले. ”ते आपले भावी इनोव्‍हेटर्स असतील आणि मी त्‍यांना जगभरात सामना केल्‍या जाणाऱ्या विविध आव्‍हानांचे निराकरण करताना पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे. आम्‍हाला आमचे वर्ल्‍डवाइड पार्टनर सॅमसंगसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे आम्‍ही सहयोगाने ‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’ उपक्रमाच्‍या माध्‍यमातून क्रीडा व तंत्रज्ञानाच्‍या संयोजनासह प्रतिभावान तरूणांना ओळखण्‍यासह पाठिंबा देण्‍यासाठी काम करत राहू.”
‘टूगेदर फॉर टूमारो, एनेबलिंग पीपल’बाबत अधिक माहितीसाठी कृपया https://olympics.com/togetherfortomorrow येथे भेट द्या.

Related posts

अभ्युदय बँक खातेधारकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आमची युनियन प्रयत्नशील —– आनंदराव अडसूळ

Shivani Shetty

नवीन नेक्‍सॉनने जीएनसीएपी रेटिंगमधील सेफ्टी – स्‍कोअर्स ५-स्‍टारचा वारसा कायम राखला टाटा एसयूव्‍हींच्‍या संपूर्ण श्रेणीमध्‍ये आता भारतीय रस्‍त्‍यांवरील सर्वात सुरक्षित कार्सचा समावेश

Shivani Shetty

निलाद्री कुमार यांना माननीय राष्ट्रपती द्वारा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’

Shivani Shetty

Leave a Comment