‘मुंबई, ३० मार्च २०२४: बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) पिलानीच्या वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम्स डिव्हिजनने १५ व १६ एप्रिल २०२४ रोजीहैदराबाद कॅम्पसमध्ये वर्क इंटिग्रेटेड लर्निंगवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे(ICONWIL-2024) आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील स्कॉलर्स, प्रॅक्टिशनर्स आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या कॉन्फरन्सचेआयोजन केले जात आहे. भारत सरकारच्या ऑल इंडिया कौन्सिल ऑफटेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रोफेसर (डॉ) टी जी सीताराम प्रमुख पाहुणेम्हणून बिट्स पिलानीचे आमंत्रण स्वीकारले आहे.
शिक्षण व उद्योग या दोन्ही क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात वैचारिकनेत्यांची भाषणे होतील, वर्क इंटिग्रेटेड लर्निंगशी संबंधित विषयांवरील पॅनलचर्चांमध्ये ते सहभागी होतील. परिषदेत सहभागी होणार असलेल्या प्रमुखवक्त्यांमध्ये ईटीएच झुरिचचे प्रोफेसर मनू कपूर, यूएसएच्या कॅन्सस युनिव्हर्सिटीचेप्रोफेसर–एमेरिटस प्रो डॅनियल जोनाथन बर्नस्टन, मॅसॅच्युएट्स युनिव्हर्सिटीचेप्रोफेसर–एमेरिटस प्रोफेसर नेल्सन लेसे, सिंगापूर युनिव्हर्सिटीचे असोसिएटप्रोफेसर डॉ लक्ष्मीनारायणन समयधम, आयआयटी मद्रासचे प्रोफेसर डॉ एडमनाप्रसाद, एलअँडटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडचे ग्लोबल हेड ऑफ इंजिनीयरिंगअकॅडेमीचे ग्लोबल हेड श्री पी बी कोटुर यांचा समावेश असेल. परिषदेमध्ये पाचप्रमुख विषयांवर संशोधक व विश्लेषकांचे पेपर व केस स्टडी प्रेझेंटेशन्स देखीलअसणार आहेत.
परिषदेमध्ये ‘वर्क इंटिग्रेटेड लर्निंग’ साठी तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांवरलक्ष केंद्रित करणारी एक स्पर्धा ‘एड्युफोर्ज‘ चे विद्यार्थ्यांसाठी आयोजन केलेजाईल. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान उपाययोजनांच्यासंकल्पना, डिझाईन, विकास आणि त्या प्रस्तुत करण्यास सांगितले जाईल. यामुळेत्यांना शिकण्याच्या अनुभवात वाढ होईल. स्पर्धकांना पाच वेगवेगळ्या विषयांमध्येआपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करता येतील – एआय–सक्षम वर्क इंटिग्रेटेडलर्निंग, अनुभवांच्या माध्यमातून शिक्षणासाठी अभिनव उपाययोजना, विद्यार्थ्यांनातंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडून ठेवणे, पीर लर्निंग, तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेमूल्यांकन आणि विद्यार्थी सहायता प्रणाली. यूएसएच्या स्पॅन्डा एआयचेसह–संस्थापक व चीफ इनोव्हेशन ऑफिसर श्री केशव रंगराजन जनरेटिव्हएआयचा लाभ घेण्याबाबत व्यावहारिक कार्यशाळेचे देखील आयोजन करतील.
प्रो.जी सुंदर, संचालक–ऑफ–कॅम्पस प्रोग्राम्स इंडस्ट्री एंगेजमेंट,बिट्स पिलानीम्हणाले,”आजच्या वेगवान जगात, जगभरातील प्रोफेशनल्सना सातत्याने नवनवीनगोष्टी शिकत राहण्याची आणि आपल्या संस्था व उद्योगक्षेत्राच्या सातत्यानेबदलत्या गरजांनुरुप स्वतःमध्ये विकास करण्याची गरज असते, वर्क इंटिग्रेटेडलर्निंग त्यांची कौशल्ये व ज्ञानाला अद्ययावत व प्रगत करण्यासाठी उपयुक्तशैक्षणिक मॉडेल म्हणून काम करते, त्याचप्रमाणे त्यांना आपले प्रोफेशनल करियरदेखील सुरु ठेवण्यात मदत मिळते.सर्वोत्तम प्रथा शिकण्याच्या, ज्ञान सातत्यानेवाढवण्यासाठी व्हायब्रन्ट नेटवर्क बनवण्याच्या आमच्या अनुभवांना शेयरकरण्याच्या आमच्या उपक्रमांपैकी एक आहे.”
माहिती किंवा नोंदणीसाठी येथे संपर्क साधावा: https://iconwil.bits-pilani-wilp.ac.in/home