maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि शेल यांनी संपूर्ण भारतात उच्‍च दर्जाचा ईव्‍ही चार्जिंग अनुभव देण्‍यासाठी केली हातमिळवणी

मुंबई, ११ एप्रिल २०२४: भारतातील इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) क्रांतीचा पाया रचणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) ने संपूर्ण भारतात सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन्‍स स्‍थापित करण्‍यासाठी शेल इंडिया मार्केट्स प्रायव्‍हेट लिमिटेड (एसआयएमपीएल) सो‍बत बंधनकारक नसलेल्‍या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली आहे. यासहयोगांतर्गत शेलच्या विस्तृत फ्यूएल स्‍टेशन जाळ्याचा आणि १.४ लाखांहूनटाटा ईव्ही भारतीय रस्त्यांवर धावत असल्यामुळे टीपीईएमकडे असलेल्या माहितीचा उपयोग करत टाटा ईव्ही मालकांद्वारे वारंवार भेट दिल्या जाणाऱ्या फ्यूएल स्‍टेशन्‍सवर चार्जर्स स्थापित केले जाणार आहेत. तसेच, दोन्‍ही कंपन्‍या उच्‍च दर्जाचा चार्जिंग अनुभव देण्‍याप्रती कार्य करतील.

भारतभरातील ईव्ही मालकांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्‍न म्हणून टीपीईएम आणि शेल इंडिया मार्केट्स प्रायव्‍हेट लिमिटेड (एसआयएमपीएल)यांच्यात झालेल्या या कराराचा दोन्ही कंपन्यांमधील सहयोगाच्‍या माध्‍यमातून देशातील अधिकाधिक व्‍यक्‍तींना इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. या दोन्ही कंपन्या सोयीस्‍कर पेमेंट सिस्‍टम्‍स व लॉयल्‍टी प्रोग्राम्‍स सादर करण्‍याचा देखील प्रयत्‍न करत आहेत, ज्‍यामुळे टीपीईएमच्‍या ग्राहकांच्‍या मूल्‍यामध्‍ये मोठी भर होईल.

टीपीईएम भारतातील ईव्‍हींची बाजारपेठ अग्रणी कंपनी आहे, जिचा आपल्‍या पोर्टफोलिओमधील चार उत्‍पादनांसह इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांमध्‍ये ७१ टक्‍के मार्केट शेअर आहे. गुरूग्राममध्ये आपले पहिले ईव्ही एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्टोअर ला करण्‍यापासून भारतातील चार्जिंग पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी विविध चार्ज पॉइंट ऑपरेटरांसोबत काम करण्यापर्यंत टीपीईएमने देशात ईव्‍ही इकोसिस्‍टमचा उदय करण्‍याचे नेतृत्‍व केले आहे.

शेल ईव्‍ही रिचार्ज लोकेशन्‍स ९८ टक्‍के ते ९९ टक्‍के चार्जर अपटाइमसह विश्‍वसनीय व अत्‍यंत गतीशील चार्जिंग देतात. हे लोकेशन्‍स सोयीस्‍कर रिटेलसह फ्रेश फूड व पेय पर्याय देखील देतात. या सर्व घटकांमुळे एकूण ग्राहक अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यास मदत होते आणि अतिरिक्‍त मूल्‍य व सोयीसुविधा मिळतात.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. आणि टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे चीफ स्‍ट्रॅटेजी ऑफिसर बालाजे राजन म्‍हणाले, ”भारतातील ईव्‍ही इकोसिस्‍टम प्रगत करण्‍यासाठी खुल्‍या सहयोगाच्‍या दिशेने आमच्‍या प्रयत्‍नाचा भाग म्‍हणून आम्‍हाला शेलसोबत भागीदारी करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा विद्यमान चार्जिंग पायाभूत सुविधेमध्‍ये वाढ करण्‍याचा मनसुबा आहे, विशेषत: ग्राहकवर्गामध्‍ये वाढ होत असताना देशातील ईव्‍हींच्‍या अवलंबतेला गती देण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. टीपीईएमला ईव्‍ही वापराबाबत असलेल्‍या सखोल माहितीसह शेलच्‍या अद्वितीय ग्राहक अनुभवाला एकत्रित करत हा धोरणात्‍मक सहयोग निश्चितच भारतातील चार्जिंग पद्धतींमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल, परिणामत: देशामध्‍ये ईव्‍ही अवलंबतेला गती मिळेल.”

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत शेल इंडिया मार्केट्स प्रायव्‍हेट लिमिटेडचे संचालक सं वर्की म्‍हणाले, ”शेल सोयीसुविधा, सुरक्षितता व शाश्‍वततेला प्राधान्‍य देणारी एकीकृत सोल्‍यूशन्‍स प्रदान करत ईव्‍ही चार्जिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याप्रती कटिबद्ध आहे. १०० टक्‍के प्रमाणित नवीकरणीय स्रोत वापरण्‍याप्रती आमच्‍या समर्पिततेसह आमचे अत्‍यंत गतीशील व विश्‍वसनीय चार्जर्स खात्री देतात की ग्राहकांना शाश्‍वत, त्रासमुक्‍त व कार्यक्षम चार्जिंग अनुभवाचा आनंद मिळेल. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. सोबतच्‍या आमच्‍या धोरणात्‍मक सहयोगाचा डिजिटल एकीकरण आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांचा फायदा घेत देशामध्‍ये इलेक्ट्रिक वाहनांच्‍या अधिकाधिक अवलंबतेला चालना देण्‍याचा मनसुबा आहे.”

व्यापक आणि सोयीस्कर चार्जिंग पायाभूत सुविधा ही ईव्ही स्वीकृतीला चालना देण्यासाठी आवश्‍यक आहे हे जगभरातील संशोधनांमधूनिसून आले आहे. त्याचप्रमाणे चार्जिंग पायाभूत सुविधांमधील वाढीची परिणती विस्तृत ईव्ही स्वीकृतीमध्येही होणार आहे. हे साध्य करण्याच्या दृष्टीने दोन्ही आघाडीच्या कंपन्यांमधील हा सहयोग भारतातील ईव्ही वाढीच्या पुढील टप्प्यात महत्त्वपूर्ण ठरेल.

समाप्‍त

Related posts

जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने आयपीआरएस ची “वर्ल्ड बिहाइंड द म्युझिक” मोहिम

Shivani Shetty

झेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिस्जकोव्हा बनली मिस वर्ल्ड

Shivani Shetty

ग्लेनमार्क फाउंडेशनने ‘मेरी पौष्टिक रसोई’च्या सहाव्या सीझनचा केला समारोप : भारतातील पोषणामध्ये मोठे परिवर्तन

Shivani Shetty

Leave a Comment