maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

निवासी मालमत्ता विक्री मूल्य १.११ लक्ष कोटींवर पोहोचले: प्रोपटायगर डॉटकॉम

मुंबई, ११ एप्रिल २०२४: प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइट रेसिडेंशीयल – जानेवारी–मार्च २०२४’ अहवालानुसार, विकासाचा आलेख अनुसरत, भारतातील सर्वश्रेष्ठ आठ प्रायमरी रेसिडेंशीयल मार्केट्समध्ये या वर्षी जानेवारी ते मार्च (२०२४ ची पहिली तिमाही) या काळात प्रचंड मागणी चालू राहिली. जानेवारी-मार्च २०२४ या काळात मूल्याच्या बाबतीत निवासी मालमत्ता विक्री (घरांची विक्री) गत वर्षीच्या या कालावधीच्या ६६,१५५ कोटी रु. च्या तुलनेत ६८ टक्क्यांनी वाढून १,१०,८८० रुपयांवर पोहोचली आहे.

२०२४ च्या पहिल्या तिमाहीत निवासी मालमत्ता विक्री मूल्यात सर्वाधिक वाढ दिल्ली एनसीआर (२४९ टक्के) मध्ये झाली असून यानंतर हैदराबाद (१४३ टक्के), अहमदाबाद (१३० टक्के), कोलकता (५९ टक्के), बंगळुरू (५२ टक्के), पुणे (३२ टक्के), मुंबई-एमएमआर (३१ टक्के), आणि चेन्नई (२२ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो. या शहरांचे विक्री मूल्य अनुक्रमे १२,१२०, २३,५८०, ९,०९०, २,०००, ११,३१०, १५,१५०, ३४,३४० आणि ३,२९० कोटी रुपये झाले आहे.

क्षेत्रफळाच्या बाबतीत घरांची विक्री ९९ दशलक्ष चौरसफुटांपासून ६३% वाढून १६२ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली आहे. यात दिल्ली एनसीआर (१८४ टक्के)सह आघाडीवर असून यानंतर हैदराबाद (१२८ टक्के), अहमदाबाद (१०८ टक्के), कोलकता (४९ टक्के), बंगळुरू (३९ टक्के), मुंबई-एमएमआर (२६ टक्के), पुणे (२१ टक्के), आणि चेन्नई (१६ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.

प्रोपटायगर डॉटकॉमच्या अहवालामध्ये या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निवासी मालमत्ता विक्री गेल्या वर्षी या कालावधीतील ८५८४० घरांच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी वाढून १,२०,६४० घरांवर पोहोचली असल्याचे दिसून आले आहे. घरांच्या विक्रीतही दिल्ली एनसीआर (१६४ टक्के) वार्षिक वाढीसह आघाडीवर असून यानंतर अहमदाबाद (७८ टक्के), कोलकता (७३ टक्के), हैदराबाद (४० टक्के), बंगळुरू (४० टक्के), मुंबई-एमएमआर (२८ टक्के), पुणे (२२ टक्के),आणि चेन्नई (२२ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो. या शहरांत अनुक्रमे १०,०६०, १२,९२०, ३,८६०, १४,२९०, १०,३८०, ४१,५९०, २३,११० आणि ४,४३० घरांची विक्री नोंदवण्यात आली आहे.

या अहवालात म्हटले आहे की, “एकंदर व्यवहाराचे मूल्य’ किंवा ‘विक्री मूल्य’ २०२४ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान एका शहरात विकल्या गेलेल्या मालमत्तेच्या एकंदर मूल्याशी संबंधित आहे. विकलेल्या एकंदर घरांच्या संख्येला वेटेड अॅव्हरेज प्राइसने गुणून व त्यात मालमत्तांच्या वेटेड अॅव्हरेज साइझने गुणून हे मूल्य प्राप्त करण्यात येते. मूलतः ते निर्दिष्ट कालावधीत त्या शहरातील सर्व विक्री व्यवहारांचे मौद्रिक मूल्य समाविष्ट करते.

प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख आणि आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ श्री. विकास वधावन म्हणाले, “आकारमान आणि मूल्याच्या बाबतीत निवासी मालमत्ता विक्रीतील वाढ ही एकंदर अर्थव्यवस्थेसाठी शुभ म्हटली पाहिजे, कारण सिमेंट आणि स्टील सहित २०० पेक्षा जास्त साहाय्यक उद्योग हे रियल इस्टेट क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारतातील हाऊसिंग मार्केटची घोडदौड जबरदस्त सुरू आहे. टॉप ८ प्रायमरी मार्केट्समध्ये निवासी मालमत्तेची विक्री झपाट्याने वाढत आहे. ज्यामागील परीबळे आहेत मजबूत विकास, स्थिर तारण दर आणि आपल्या मालकीचे घर घेण्याची प्रबळ इच्छा. जसजसा गुंतवणूकदारांचा विश्वास हळूहळू पुनर्जीवित होत आहे आणि त्याला अनिवासी भारतीयांच्या मजबूत मागणीची जोड मिळत आहे, घरांच्या मागणीचा आलेख, किंमतीतील काही अनपेक्षित चढ-उतार वगळता, दमदार वृद्धीसाठी तयार झालेला दिसत आहे.”

प्रॉपटायगर डॉटकॉम आणि हाऊसिंग डॉटकॉमची संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्हणाल्या, “गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता विक्रीच्या एकंदर व्यवहार मूल्यात ६८% इतकी असामान्य वाढ झाली आहे. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, मुंबई, हैदराबाद, दिल्ली एनसीआर आणि पुणे यांचा एकत्रित वाटा १.११ लक्ष कोटी रुपयांच्या एकंदर व्यवहार मूल्यात ७६% इतका आहे. या वृद्धीवरून केवळ वाढती मागणी लक्षात येत नाही, तर प्रमुख व्यावसायिक जिल्ह्यांत मालमत्तेच्या किंमतीतील १५-२० टक्क्यांची लक्षणीय वाढ देखील दिसून येते. येत्या दोन तिमाहींमध्ये सुद्धा वाढीचा हा आलेख आर्थिक वृद्धी आणि मजबूत मागणीचा रेटा मिळून आणखी वर वर जाईल अशी अपेक्षा आहे.”

Related posts

सॅमसंगकडून भारतातील गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टम अनुभवामध्‍ये वाढ; गॅलॅक्‍सी बुक४ सिरीजसाठी प्री-बुकिंगची घोषणा

Shivani Shetty

कल्याण ज्वेलर्सचे चेंबुर मध्ये नवीन दालन

Shivani Shetty

एसीटी फायबरनेटचे मोबाईल अॅप बाजारात नव्याने दाखल

Shivani Shetty

Leave a Comment