maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

स्प्राइटच्या ‘जोक इन ए बॉटल’चे पुनरागमन: विनोदाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आणि डिजिटल स्टास एकत्र येऊन घडविणार एक अफलातून हास्यानुभव

नवी दिल्ली, ९ एप्रिल: ‘जोक इन ए बॉटल’च्या पहिल्यावहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर भारताचे सर्वात लाडके लेमन अँड लाइम चवीचे पेय स्प्राइट पुन्हा एकदा हा उपक्रम घेऊन आले आहे. ‘स्कॅन करो, जोक सुनो, ठंड रखो’ या आपल्या गेल्या वर्षातील गाजलेल्या मोहिमेला अधिक बळकटी देत यंदाच्या मोसमातही उन्हाचा ताप कमी करण्याच्या कमाल युक्तीसह सज्ज झाला आहे आणि श्रोत्यांना खळखळून हसविण्याची हमी देणाऱ्या विनोदी कन्टेन्टची ताजी लहर घेऊन आला आहे. आजच्या वेगवान जगाची आव्हाने पाहता स्प्राइट हा आजघडीच्या सर्वात ‘कूल’ बॅण्ड्सपैकी एक आहे, ज्यामुळे आपल्या हक्काचा विनोदमंच बाळगणे आणि उन्हाळ्यापासून ताजेतवाने करणारी एक वाट दाखवून देणे हा तर त्याचा स्वभावधर्मच आहे. स्प्राइटच्या बॉटलला सहजच स्कॅन करून तरुण मंडळी परीक्षा, कॉलेज, रिलेशनशिप्स, खाणे आणि अशा अनेक विषयांवरचे ९ स्थानिक भाषांमधील ९ पेक्षा जास्त विनोद ऐकू शकतील.
विनोदाच्या क्षेत्रावर हुकूमत गाजविण्यासाठी जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने कन्टेन्ट तयार करण्यासाठी आणि या जाहिरात मोहिमेसाठी क्रिएटर्सशी सहयोगाच्या संधी शोधण्यासाठी स्प्राइटने Kommune बरोबर भागीदारी केली आहे. स्प्राइटची ‘जोक इन ए बॉटल’ मोहीम पुन्हा एकदा हास्याचा इतरत्र कुठेही मिळणार नाही असा अनुभव मिळवून देण्याचे वचन घेऊन परतली आहे. मोहिमेचा शुभारंभ करताना स्प्राइटने भारतभर आणि प्रांतीय पातळीवर चालणाऱ्या या उपक्रमासाठी देशाच्या सर्वात मोठ्या मनोरंजनकारांपैकी एक असलेल्या कपिल शर्मासह बिस्वा, केनी, मल्लिका दुवा, प्रशस्ती, उरूज, अनिर्बान, साइकिरण, वरुण ठाकूर, दानिश सैत, सौरभ पंत, मिर अफसर अली, नवीन सिंग, निरंजन मोंडल असा भारताच्या १४ पट्टीच्या विनोदविरांशी सहायोग साधला आहे. ९ भाषांत रचलेले ५०० हून अधिक विनोद ऐकण्यासाठी ग्राहकांना फक्त QR स्कॅन करायचा आहे, जो त्यांना व्हॉट्सअॅपवर घेऊन जाईल आणि तिथे स्थानिक भाषेतील एक विनोदी कन्टेन्ट त्यांच्यासाठी खुला होईल.
या नव्या मोहिमेविषयी बोलताना कोका कोला इंडिया आणि साउथ-वेस्ट एशियासाठी स्पार्कलिंग फ्लेव्हर्स विभागाचे सीनिअर कॅटेगरी डिरेक्टर तिश कॉन्डेनो म्हणाले, “गेल्या वर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर स्प्राइट जोक इन ए बॉटल मोहीम पुन्हा एकदा घेऊन येणे हा आमच्यासाठी खूपच थरारून टाकणारा अनुभव आहे. आमचे लक्ष्य तेच आहे: ग्राहकांचे आयुष्यामध्ये अस्सल, त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेल्या आणि हास्यरसाने भरलेल्या कन्टेन्टची पेरणी करणे जे आमच्या ब्रॅण्डच्या मूळ संकल्पनेशी अगदी सुसंगत आहे. स्प्राइट ब्रॅण्ड प्रत्येकाला असाधारण, आनंददायी अनुभव देण्याशी बांधील आहे!”
कॉम्युनचे संस्थापक रोशन अब्बास म्हणाले, “विनोद हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे, तो मन उल्हसित करतो आणि ते युवापिढीची संस्कृती घडविणारे इंधन आहे. या मोहिमेच्या साथीने आम्ही देशभरातील विनोद लोकांसमोर सादर करत आहोत आणि प्रत्येक बॉटलमध्ये असे एखादे सरप्राइज दडलेले आहे, जे एखाद्याचा दिवस उजळवून टाकेल. सर्वोत्तम स्थानिक विनोदवीरांची निवड करत व कल्पकतेने विनोद घडवित स्प्राइटच्या ‘जोक इन ए बॉटल’ मोहिमेशी सहयोग साधत असल्याचा कॉम्युनला आनंद आहे. हे विनोद भाषेच्या सीमांना पार करत भारताच्या वैविध्यपूर्ण समुदायांना एकमेकांशी जोडणारे आहेत.”
वरुण ठाकूर याने सांगितले, “’जोक इन ए बॉटल’ मोहिमेसाठी स्प्राइटबरोबर टीम अप करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. शरीराला ताजातवाना करणारा एक सीप आणि मनाला ताजेतवाने करणारा एक विनोद यांचे मिश्रण म्हणजे छान वेळ घालविण्याची अचूक युक्ती आहे. एक विनोदवीर म्हणून लोकांना हसविणे हे सन्मानाहून अधिक काही आहे, हा एक असा मंच असतो, ज्यामुळे तुम्ही विनोदाच्या वैश्विक भाषेमध्ये लोकांशी नाते जोडू शकता.”
उरूज म्हणाली, “’जोक इन ए बॉट्ल’साठी स्प्राइटबरोबर टीम अप करण्याचा मला प्रचंड उत्साह आहे. ताजे विनोद देण्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करत ही मोहीम प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जगण्याच्या धकाधकीमधून एक हवीहवीशी विश्रांती मिळवून देईल.”

Related posts

वीगन कॉस्‍मेटिक्‍स उद्योग २०२८ पर्यंत २४ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा

Shivani Shetty

इझमायट्रिपद्वारे ईट्रॅव्‍ह टेकचे संपादन

Shivani Shetty

आशिया कस्टमर एंगेजमेंट फोरम’ चे दोन पुरस्कार माइंड वॉर्सने पटकावले

Shivani Shetty

Leave a Comment