maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून प्रवास ४.० मध्‍ये सुरक्षित, स्‍मार्ट आणि शाश्‍वत मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन

बेंगळुरू, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने सुरक्षित, स्‍मार्ट व शाश्‍वत एकीकृत मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स दाखवणारा ३-दिवसीय द्विवार्षिक इव्‍हेण्‍ट ‘प्रवास ४.०’मध्‍ये अत्‍याधुनिक मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सची प्रभावी श्रेणी दाखवली. कंपनीने नवीन टाटा अल्‍ट्रा ईव्‍ही ७एमचे अनावरण केले. ही शून्‍य-उत्‍सर्जन, आंतरशहरीय इलेक्ट्रिक बस शहरी मास मोबिलिटीसाठी आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍याकरिता डिझाइन व निर्माण करण्‍यात आली आहे. टाटा मोटर्सने टाटा मॅग्‍ना ईव्‍ही, टाटा मॅजिक बाय-फ्यूएल, टाटा अल्‍ट्रा प्राइम सीएनजी, टाटा विंगर ९एस, टाटा सिटीराइड प्राइम आणि टाटा एलपीओ १८२२ अशा प्रवासी परिवहन सोल्‍यूशन्‍सची वैविध्‍यपूर्ण श्रेणी देखील दाखवली. या श्रेणीचा विविध उपयोजन व ड्युटी सायकल्‍समध्‍ये सानुकूल सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे.

नवीन टाटा अल्‍ट्रा ईव्‍ही ७एम २१ प्रवाशांसाठी आरामदायी आसन व्‍यवस्‍था देते आणि सुलभ मॅन्‍युव्‍हरेबिलिटी व योग्‍य आकारमानांसह शहरातील अरूंद रस्‍ते व उच्‍च रहदारी असलेल्‍या भागांमधून सहजपणे ड्राइव्‍ह करता येण्‍यासाठी परिपूर्ण आहे. या बसमध्‍ये २१३ केडब्‍ल्‍यू इलेक्ट्रिक मोटरची शक्‍ती आणि आयपी६७-प्रमाणित २०० केडब्‍ल्‍यूएच लि-आयन बॅटरी आहे. ही बस सिंगल चार्जमध्‍ये जवळपास १६० किमीची रेंज देते आणि फास्‍ट चार्जिंग क्षमतेसह येते, ज्‍यामुळे फक्‍त २.५ तासांमध्‍ये संपूर्ण चार्ज होते. पूर्णत: इलेक्ट्रिक ड्राइव्‍हट्रेनला पूरक प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे इलेक्‍ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्‍टम आणि इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल. या बसमध्‍ये ऑटोमॅटिक पॅसेंजर काऊंटर असण्‍यासोबत उच्‍च सुरक्षितता व सुरक्षा मानक, इंटेलिजण्‍ट ट्रान्‍सपोर्ट सिस्‍टम (आयटीएस) आहे. तसेच, अल्‍ट्रा ईव्‍ही ७एममध्‍ये रि‍जनरेटिव्‍ह ब्रेकिंग तंत्रज्ञान आहे, ज्‍यामुळे बसची कार्यक्षमता व रेंजमध्‍ये अधिक वाढ होते.

या अनावरणाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्‍यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस. म्‍हणाले, “प्रवास ४.० ची सुरक्षित, स्‍मार्ट व शाश्‍वत गतीशीलतेची थीम आमच्‍या दृष्टीकोनाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. हा इव्‍हेण्‍ट आम्‍हाला भागधारकांसोबत संलग्‍न होण्‍याची आणि आमचे अत्‍याधुनिक सोल्‍यूशन्‍स दाखवण्‍याची अद्वितीय संधी देतो. आम्‍हाला प्रदर्शनांची व्‍यापक श्रेणी, जे त्‍यांच्‍या संबंधित विभागांमध्‍ये सानुकूल सोल्‍यूशन्‍स देतात, तसेच इलेक्ट्रिक बस क्षेत्रातील आमची नवीन ऑफरिंग अल्‍ट्रा ईव्‍ही ७एम सादर करण्‍याचा अभिमान वाटतो. हे नवीन मॉडेल मेट्रो व लहान शहरांसाठी परिपूर्णपणे अनुकूल आहे, ज्‍यामुळे ग्राहकांच्‍या अद्वितीय मागण्‍यांची पूर्तता होते. प्रवास ४.० मधील आमच्‍या सहभागामधून नाविन्‍यपूर्ण, कार्यक्षम व शाश्‍वत मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून देते, जे ग्राहकांसाठी उच्‍च उत्‍पन्‍न क्षमता व फायदा मिळण्‍याची खात्री देतात.”

टाटा मोटर्स विविध पॉवरट्रेन्‍स आणि उत्‍सर्जन तंत्रज्ञानांमधील आपल्‍या शुद्ध व शाश्वत सोल्‍यूशन्‍ससह गतीशीलतेच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. कंपनी संपूर्ण भारतात तैनात करण्‍यात आलेल्‍या २,९०० हून अधिक ई-बसेससह इलेक्ट्रिक बसेस विभागात बाजारपेठेचे नेतृत्‍व करते. या सर्व ई-बसेसनी एकत्रित १६ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. तसेच, कंपनी देशामध्‍ये हायड्रोजन फ्यूएल सेल परिवहन सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यामध्‍ये अग्रणी आहे. पर्यायी इंधनची शक्‍ती असलेल्‍या वेईकल्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीसह टाटा मोटर्स ऑपरेटर्सना कमी कार्यक्षम खर्च व उच्‍च नफ्याची खात्री देते. याव्‍यतिरिक्त, टाटा मोटर्स कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजसह आपल्‍या सोल्‍यूशन्‍समध्‍ये वाढ करते. हा प्‍लॅटफॉर्म स्‍मार्ट तंत्रज्ञानांचा फायदा घेत ताफा व्‍यवस्‍थापन, वेईकल अपटाइम आणि सुरक्षिततेमध्‍ये सुधारणा करतो.

Related posts

मुंबई भारतातील टॉप टेक पदांसाठी सर्वाधिक वेतन देणारे ५वे शहर ठरले: टीमलीज डिजिटल

Shivani Shetty

लुफ्थान्साद्वारे दिल्ली ते जर्मनीशी थेट संपर्काचा हीरक महोत्सव साजरा

Shivani Shetty

वंचित मुलांच्या सक्षमीकरणासाठी ‘द राईट पिच’ टूर्नामेंटचे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment