maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतात ४के अपस्‍केलिंग, एअरस्लिम डिझाइन आणि नॉक्‍स सिक्‍युरिटी असलेला २०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही लाँच

गुरूग्राम, भारत – सप्‍टेंबर ५, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही लाँच केला, ज्‍याची प्रारंभिक किंमत ४१,९९० रूपये आहे. ही प्रीमियम टेलिव्हिजन सिरीज विविध उच्‍चस्‍तरीय वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांच्‍या व्‍युईंग अनुभवाला उत्‍साहित करते, तसेच त्‍यांना होम एंटरटेन्‍मेंटच्‍या नवीन युगाचा अनुभव देते.

२०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍हीमध्‍ये प्रगत तंत्रज्ञान आहेत, जसे ४के अपस्‍केलिंग, एअर स्लिम डिझाइन, डायनॅमिक क्रिस्‍टल कलर, मल्‍टी वॉईस असिस्‍टण्‍ट, क्‍यू-सिम्‍फोनी आणि क्रिस्‍टल प्रोसेसर ४के, जे वास्‍तविक व्हिज्‍युअल्‍सचा अनुभव देतात. नवीन २०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍हीमध्‍ये क्रिस्‍टल प्रोसेसर ४के ची शक्‍ती आणि मास्‍टरफुल ४के अपस्‍केलिंग वैशिष्‍ट्य आहे, जे ४के डिस्‍प्‍ले सर्वोत्तमतेप्रमाणे उच्‍च दर्जाची पिक्‍चर क्‍वॉलिटी देते. या टीव्‍हीमधील डायनॅमिक क्रिस्‍टल कलर तंत्रज्ञान वास्‍तविक रंगसंगतींचा अनुभव देते, ज्‍यामुळे प्रेक्षकांना सुस्‍पष्‍टपणे चित्रे दिसण्‍याची खात्री मिळते. एचडीआर वैशिष्‍ट्य पाहिले जाणाऱ्या कन्‍टेन्‍टच्‍या रंगसंगतींमध्‍ये वाढ करते, तर कॉन्‍ट्रॅस्‍ट एन्‍हान्‍सर वैशिष्‍ट्य चित्र अधिक नॅच्‍युरल दिसण्‍याची, लेयर्ड कॉन्ट्रास्‍टसह बारीक-सारीक गोष्‍टी सुस्‍पष्‍ट दिसण्‍याची खात्री देते. टीव्‍हीमधील बिल्‍ट-इन मल्‍टी वॉईस असिस्‍टण्‍ट बिक्‍स्‍बी किंवा अॅमेझॉन अॅलेक्‍साचा वापर करत ग्राहकांना कनेक्‍टेड होम अनुभव देते.

”आजच्‍या तरूण ग्राहकांची स्‍पोर्ट्स, ओटीटी किंवा इतर होम एंटरटेन्‍मेंट असो उच्‍च दर्जाचा ऑडिओ-व्हिज्‍युअल अनुभव मिळण्‍याची इच्‍छा आहे. नवीन क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीज उच्‍च दर्जाचा टीव्‍ही पाहण्‍याचा अनुभव देत समकालीन कुटुंबांसाठी बेंचमार्क स्‍थापित करते, तसेच स्‍मार्ट व कनेक्‍टेड राहणीमानाचे तत्त्व वाढवते. क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीज आपल्‍या ४के अपस्‍केलिंग क्षमतेसह ४के डिस्‍प्‍लेच्‍या आकर्षक सुस्‍पष्‍टतेप्रमाणे स्‍टॅण्‍डर्ड रिझॉल्‍यूशनमध्‍ये कन्‍टेन्‍ट वाढवते, वास्‍तवि‍क पिक्‍चर क्‍वॉलिटी देते, तसेच क्‍यू-सिम्‍फोनी आणि ओटीएस लाइटसह सर्वोत्तम साऊंड क्षमता देते. याव्‍यतिरिक्‍त, या टीव्‍हीमध्‍ये नॉक्‍स सिक्‍युरिटी वैशिष्‍ट्य आहे, जे वापरकर्त्‍यांच्‍या माहितीचे परिपूर्ण संरक्षण करते,” असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक विपलेश डांग म्‍हणाले.

तसेच, एअरस्लिम डिझाइनसह आकर्षक स्‍लीक प्रोफाइल शक्‍य झाले आहे. २०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही अॅम्बियण्‍ट एंटरटेन्‍मेंट पोर्टल आहे, जो सॅमसंग टीव्‍ही प्‍लस सर्विससह येतो, ज्‍यामध्‍ये मोफत अविरत कन्‍टेन्‍टसह भारतातील ३०० हून अधिक चॅनेल्‍सचा समावेश आहे.
ओटीएस लाइटसह सुधारित करण्‍यात आलेली ही टीव्‍ही सिरीज ग्राहकांना ऑन-स्क्रिन मोशन वास्‍तविकत: घडत असल्‍याचा अनुभव देते. सुधारित अॅ‍डप्टिव्‍ह साऊंड तंत्रज्ञान रिअल टाइममध्‍ये सीन-बाय-सीन सर्व कन्‍टेन्‍टचे विश्‍लेषण करते, ज्‍यामधून अधिक डायनॅमिक व उत्साहपूर्ण कन्‍टेन्‍टचा आनंद मिळतो. क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍हीमध्‍ये क्‍यू-सिम्‍फोनी देखील आहे, जे टेलिव्हिजन आणि साऊंडबार स्‍पीकर्सना एकाच वेळी ऑपरेट राहत सर्वोत्तम सराऊंड इफेक्‍ट्स निर्माण करण्‍यास मदत करते, ज्‍यासाठी विविध टीव्‍ही स्‍पीकर्स म्‍यूट करण्‍याची गरज भासत नाही.

अद्वितीय सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा अनुभव देत क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍हीमध्‍ये अनेक नाविन्‍यपूर्ण ऑडिओ तंत्रज्ञान आहेत.
४के अपस्‍केलिंग
२०२४ क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍हीमध्‍ये शक्तिशाली ४के अपस्‍केलिंग तंत्रज्ञान आहे, जे प्रेक्षकांना मूळ कन्‍टेन्‍ट कमी रिझॉल्‍यूशनचे असले तरी अधिक सुस्‍पष्‍टता व आकर्षक रंगसंगतीमध्‍ये त्‍यांचे आवडते कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद देते. हे तंत्रज्ञान जवळपास ४के रिझॉल्‍यूशप्रमाणे पिक्‍चर क्‍वॉलिटी वाढवते, ज्‍यामुळे सर्वोत्तम व्‍युईग अनुभव मिळतो.

डायनॅमिक क्रिस्‍टल कलर
सॅमसंगचे डायनॅमिक क्रिस्‍टल कलर तंत्रज्ञान एक बिलियन रंगसंगतींच्‍या व्‍यापक श्रेणीसह आकर्षक व वास्‍तविक पिक्‍चर देते. हे वैशिष्‍ट्य व्हिज्‍युअल अनुभवाला प्रगत फॉस्‍फर तंत्रज्ञानासह नव्‍या उंचीवर घेऊन जात प्रगत करते, तसेच अधिक अचूक व आकर्षक रंगसंगती देते, जे प्रत्‍येक सीनला वास्‍तविक व लक्षवेधक बनवते.

सॅमसंग टीव्‍ही प्‍लस
सॅमसंग टीव्‍ही प्‍लस मोफत लाइव्‍ह टीव्‍ही व ऑन-डिमांड कन्‍टेन्‍ट देते, ज्‍यामधून सबस्क्रिप्‍शन्‍सच्‍या कोणत्‍याही अतिरिक्‍त खर्चाशिवाय किंवा अॅप्‍स, केबल्‍स किंवा सेट-अप बॉक्‍सेस् स्‍थापित करण्‍याच्‍या त्रासाशिवाय अनेक मनोरंजन पर्याय मिळतात. १०० हून अधिक चॅनेल्‍स उपलब्‍ध असण्‍यासह ग्राहक बातम्‍यांपासून खेळ, चित्रपट अशा विविध कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतात.

एअर स्लिम डिझाइन
क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍हीमध्‍ये एअर स्लिम डिझाइन आहे, ज्‍यामध्‍ये स्‍लीक व स्लिम प्रोफाइज आहे, जे घराच्‍या कोणत्‍याही सजावटीमध्‍ये सामावून जाते. ही आकर्षकता कोणत्‍याही लिव्हिंग स्‍पेसचे आधुनिक लुक अधिक लक्षवेधक बनवते, तसेच उच्‍च दर्जाचा व्‍युईंग अनुभव देते.

नॉक्‍स सिक्‍युरिटी
नॉक्‍स सिक्‍युरिटी सॅमसंगच्‍या स्‍मार्ट टीव्‍ही डिवाईसेसपासून ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍स व सर्विसेसपर्यंत युजर डेटा व सेवांना क्रॉस-कटिंग संरक्षण देते. आता, वापरकर्ते सुरक्षित व ऑप्टिमाइज टीव्‍ही पाहण्‍याचा अनुभव घेऊ शकतात.

सोलारसेल रिमोट
सोलारसेल रिमोट इको-फ्रेण्‍डली इनोव्‍हेशन आहे, जे रिसायकल केलेल्‍या साहित्यापासून बनवण्‍यात आले आहे आणि सुर्यप्रकाश किंवा घरातील प्रकाशाचा वापर करत चार्ज होते, ज्‍यामुळे डिस्‍पोजेबल बॅटऱ्यांची गरज भासत नाही. हा शाश्‍वत दृष्टिकोन पर्यावरणावरील प्रभाव कमी करतो, तसेच सोईस्‍कर व विश्‍वसनीय रिमोट-कंट्रोल अनुभव देतो.

मल्‍टी वॉईस असिस्‍टण्‍ट
बिक्‍स्‍बी आणि अॅमेझॉन अॅलेक्‍सासाठी बिल्‍ट-इन सपोर्टसह मल्‍टी वॉईस असिस्‍टण्‍ट वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना वॉईस कमांड्सचा वापर करत त्‍यांचा टीव्‍ही आणि इतर स्‍मार्ट होम डिवाईसेसवर नियंत्रण ठेवण्‍याची सुविधा देते. ही कार्यक्षमता सोयीसुविधेमध्‍ये वाढ करते आणि कनेक्‍टेड-होम, हँड्स-फ्री अनुभव देते.

क्रिस्‍टल प्रोसेसर ४के
क्रिस्‍टल प्रोसेसर ४के असलेला हा नवीन टीव्‍ही अचूक कलर मॅपिंगसह सुधारित पिक्‍चर क्‍वॉलिटी देतो. या शक्तिशाली प्रोसेसरमधून खात्री मिळते की प्रत्‍येक रंगसंगती पाहिजे त्‍याप्रमाणे दाखवली जाते, ज्‍यामधून सर्व कन्‍टेन्‍टसाठी वास्‍तविक ४के रिझॉल्‍यूशन मिळते.

कॉनन्ट्रास्‍ट एन्‍हान्‍सर
कॉन्ट्रास्‍ट एन्‍हान्‍सर वैशिष्‍ट्य स्क्रिनच्‍या विविध भागांमधील कॉन्ट्रास्‍ट सेटिंग्‍ज आपोआपणे समायोजित करते, ज्‍यामधून अधिक डायनॅमिक पिक्‍चरची खात्री मिळते. डेप्‍थ व कलर कॉन्ट्रास्‍ट वाढवत हे वैशिष्‍ट्य अधिक वास्‍तविक व त्रिमितीय व्‍युईंग अनुभव देते.

एचडीआर (हाय डायनॅमिक रेंज)
क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍हीमध्‍ये एचडीआर तंत्रज्ञान आहे, जे संपन्‍न कॉन्ट्रास्‍ट व ब्राइटनेससह स्क्रिनवरील पिक्‍चर अधिक सुस्‍पष्‍ट करते. ज्‍यामुळे गडद किंवा अधिक भडक असलेल्‍या सीन्‍समधील व्हिज्‍युअल्‍स स्‍पष्‍टपणे दिसतात. हे वैशिष्‍ट्य वास्‍तवि‍क रंगसंसगती व टेक्‍स्‍चर्स देते, ज्‍यामुळे प्रत्‍येक फ्रेम अधि‍क वैविध्‍यपूर्ण व सर्वोत्तम बनते.

क्‍यू-सिम्‍फोनी
इंटेलिजण्‍ट वैशिष्‍ट्य क्‍यू-सिम्‍फोनी टीव्‍हीच्‍या बिल्‍ट-इन स्‍पीकर्सना आणि कनेक्‍टेड साऊंडबारला एकत्र काम करण्‍यास सक्षम करते, ज्‍यामधून मोठ्याव परिपूर्ण सराऊंड साऊंडचा अनुभव मिळतो. हे वैशिष्‍ट्य खात्री देते की, प्रेक्षक हाय-क्‍वॉलिटी व्हिज्‍युअल्‍सप्रमाणे डायनॅमिक ऑडिओचा आनंद घेतील, ज्‍यासाठी टीव्‍ही स्‍पीकर्स म्‍यूट करण्‍याची गरज नाही.

ओटीएस लाइट
ऑब्‍जेक्‍ट ट्रॅकिंग साऊंड लाइट (ओटीएस लाइट) तंत्रज्ञान स्क्रिनवरील घटकांच्‍या हालचालीवर देखरेख ठेवत आणि मल्‍टी-चॅनेल स्‍पीकर्सचा वापर करत संबंधित लोकेशन्‍समधून साऊंड निर्माण करत डायनॅमिक ३डी साऊंड अनुभव देते. हे वैशिष्‍ट्य चित्रपट व मालिकांच्‍या ऑडिओ क्‍वॉलिटीला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, ज्‍यामुळे व्हिज्‍युअलप्रमाणे लक्षवेधक ऑडिओ अनुभव मिळतो.

अॅडप्टिव्‍ह साऊंड
अॅडप्टिव्‍ह साऊंड वैशिष्‍ट्य रिअल-टाइम सीन विश्‍लेषणावर आधारित ऑडिओ आऊटपुट ऑप्टिमाइज करते आणि कन्‍टेन्‍टच्‍या प्रत्‍येक प्रकारासाठी सर्वोत्तम साऊंड देते. हे तंत्रज्ञान सीननुसार साऊंड सेटिंग्‍ज समायोजित करते आणि ऑडिओचा एकूण प्रभाव वाढवते.

किंमत आणि उपलब्‍धता
नवीन क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही ४३-इंच व ५५-इंच स्क्रिन आकारांसह ४१,९९० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे.
क्रिस्‍टल ४के डायनॅमिक टीव्‍ही सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअर Samsung.com आणि फक्‍त Amazon.in वर उपलब्‍ध आहे.

Related posts

येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसह लक्‍झरी राहणीमानाला भारतीयांची पसंती: हाऊसिंग डॉटकॉम

Shivani Shetty

भारतातील ९४ टक्‍के बी२बी मार्केटर्सच्‍या मते, एआय उच्‍च आरओआयला गती देत आहे: लिंक्‍डइन

Shivani Shetty

ऑडी इंडियाकडून २०२३ मध्‍ये ८९ टक्‍के वाढीची नोंद

Shivani Shetty

Leave a Comment