मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३: सर्जक कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने कार्यरत असलेला अग्रगण्य सरफेस डेकोर ब्रॅण्ड डॉर्बीने सणासुदीचा मोसम पाहता “व्हेस्टा” या लॅमिनेट्सच्या नव्या श्रेणीचे अनावरण केले आहे. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या खासीयतेवर काटेकोरपणे लक्ष केंद्रित करत डॉर्बीने २५ ऑक्टोबर रोजी २५२ लॅमिनेट्सचे हे अत्यंत सुंदर कलेक्शन बाजारात आणले आहे. हे कलेक्शन भारतभरात उपलब्ध असेल. प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाशी तंतोतंत जुळणारे लॅमिनेट मिळायलाच हवे हा विश्वास या कलेक्शनमधून पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त झाला आहे.
डॉर्बीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेहुल अगरवाल म्हणाले, “व्हेस्टा या लॅमिनेट्सच्या आमच्या नव्याकोऱ्या श्रेणीसह आम्ही इंटिरिअर डिझाइन आणि सजावटीची व्याख्या नव्याने घडविणाऱ्या एका प्रवासाची सुरुवात केली आहे. ‘प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण महत्त्वाचे आहे, तुमचे व्यक्तिमत्व कोणत्याही प्रकारात मोडणारे असेल तरीही त्याला साजेसे लॅमिनेट आमच्याकडे आहे’ ही या श्रेणीमागची मध्यवर्ती संकल्पना आहे, ज्यात प्रत्येक व्यक्तीची आगळीवेगळी शैली आणि पसंती साजरी करण्याप्रती आमची बांधिलकी व्यक्त झाली आहे. घर म्हणजे केवळ चार भिंतींचा सांगाडा नसतो, तर तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचाच विस्तारित भाग असतो ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. म्हणूनच आम्ही या नव्या श्रेणीमधील प्रत्येक प्रकार त्याच्या खास वेगळेपणासह घडविला आहे, जेणेकरून ग्राहकांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडींची पूर्तता व्हावी.’”
डॉर्बी प्रत्येक व्यक्तीचे अनोखेपण ओळखते आणि “व्हेस्टा”च्या रचनांमध्ये याच विविधतेचे प्रतिबिंब पडलेले आढळते. ही नवीन श्रेणी निवडीसाठी विपुल पर्याय देऊ करते, ज्यातील प्रत्येक प्रकार हा विविध प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वांना शोभून दिसावा यासाठी अत्यंत कष्टपूर्वक घडविण्यात आला आहे. एखाद्याला कधीही जुना न होणारा लाकडी पोत आकर्षित करतो, कुणाला फ्लुटेड लॅमिनेट्सला असलेला आधुनिकतेचा स्पर्श हावासा वाटतो तर कुणाला पेस्टल लॅमिनेट्सचा सफाईदार, नीटनेटका लूक आवडतो. डॉर्बीने यातील प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचा नेमकी शोभणारे लॅमिनेट्स या श्रेणीसाठी निवडली आहेत.
डॉर्बी निर्मित लॅमिनेट्सची ही नवीन श्रेणी सौंदर्यकल्पनांच्या पार जाते आणि दर्जा व टिकाऊपणाचे मूर्त रूप बनते. आधुनिकतम तंत्रज्ञानाचा वापर करून घडविण्यात आलेल्या या लॅमिनेट्समधून शैली आणि रेखीवपणा व्यक्त होतो व राहत्या जागा विलोभनीय दिसल्या पाहिजेत व त्याचवेळी काळाच्या कसोटीवर टिकल्याही पाहिजेत हा कंपनीचा विचार त्यात प्रतिबिंबित होतो. ही लॅमिनेट्स वाजवी मूल्यश्रेणीमध्ये उपलब्ध आहेत, व त्यांच्या किंमती प्रमाण ४*८ आकारासाठी फक्त रू. ८५० पासून सुरू होतात. दर्जेदार सामग्री, वाजवी दर आणि अभिनवता यामुळे डॉर्बीचे “व्हेस्टा” हे बाजारातील सर्वोत्तम उत्पादन ठरत आहे.
“व्हेस्टा”च्या बाजारातील आगमनाद्वारे डॉर्बीने एका नव्या रोमहर्षक वाटचालीचा शुभारंभ केला आहे. येत्या काळात खास एक्स्पिरियन्स सेंटर्स स्थापन करण्याची, देशाच्या आणखी अंतर्गत भागांत पोहोचण्याची, ई-कॉमर्स मंचांवर आपले अस्तित्व अधिक विस्तारण्याची, किरकोळ विक्री क्षेत्रात प्रवेश करण्याची आणि आपल्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये अधिक विविधता आणण्याची कंपनीची योजना आहे.