नवी मुंबई, ८ एप्रिल २०२४: रेफ्रेक्ट्री डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा (डीएलबीसीएल) असल्याचे निदान झाले असूनही, आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील बोबिली शहरातील ४७ वर्षीय सुश्री रेड्डी ललिथा कुमारी यांनी २४ वर्षांत कधीही कामावरून एक दिवस देखील सुट्टी घेतली नव्हती. हायस्कूलमधील या समर्पित गणिताच्या शिक्षिकेचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता कारण, रेफेक्टरी डीएलबीसीएल ने त्यांना ग्रासले होते. रेफ्रेक्ट्री रोग म्हणजे सर्व पारंपारिक उपचार पर्यायांना तो रोग प्रतिसाद देणे थांबवतो ललिथा यांच्या बाबतीत, त्यांच्या कर्करोगाने सर्व मानक उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले आणि कर्करोगाने पुनरागमन करत भयंकर रुप धारण केले. परंतु या आजाराशी लढण्याची त्यांच्या इच्छेमुळे, तसेच त्यांच्या जुळ्या मुलींनी आयुष्यात स्थिरस्थावर व्हावे, या त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामुळे ललिथा यांना अपोलो कॅन्सर सेंटर मध्ये सीएआर टी-सेल थेरपी घेण्याची प्रेरणा मिळाली.
डॉ.राकेश रेड्डी बोया, वरिष्ठ सल्लागार, वैद्यकीय-हेमॅटो ऑन्कोलॉजी यांनी या टीमचे नेतृत्व केले असून वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे सल्लागार डॉ.वेंत्रपती प्रदीप आणि पॅथॉलॉजिस्ट सल्लागार डॉ.जी वेणी प्रसन्ना यांनी मिळून प्रगत उपचार पर्याय प्रदान केले. डॉ बोया यांच्या म्हणण्यानुसार, रोगाच्या रिफ्रॅक्टरी स्वरूपामुळे ललिथा यांच्या प्रकरणात वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता होती आणि सीएआर-टी सेल थेरपी एक व्यवहार्य पर्याय म्हणून समोर आली, ज्यामुळे ‘कर्करोग मुक्त’ होण्याची संधी मिळाली.
डॉ.राकेश रेड्डी बोया, वरिष्ठ सल्लागार, वैद्यकीय-हेमॅटो ऑन्कोलॉजी अपोलो कॅन्सर सेंटर म्हणाले,“ललिथा यांनी आर-चॉप थेरपीला दिलेल्या सुरुवातीच्या प्रतिसादानंतर, त्यांना रोगमुक्त करण्यामध्ये एक मोठे आव्हान उभे राहिले. धोरणात्मक उपचार आणि आय-आयसीई सह सॅल्व्हेज कीमोथेरपीच्या एकत्रीकरणाद्वारे, आम्हाला चांगला व पूर्ण प्रतिसाद मिळाला. सावधानीपूर्वक केलेले विश्लेषण, सहयोग आणि अटूट दृढनिश्चयानेच आम्ही त्यांना बरे करण्याच्या दिशेने मार्ग काढू शकले. खरंतर हा विजय म्हणजे कर्करोगाच्या उपचारांत सीमा ओलांडून काम करण्याच्या आणि गरजू व्यक्तींना आशेचा किरण प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला जणू बळकटी देणारा ठरला आहे.”
सुश्री ललिथा यांचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला सीएआर-टी सेल थेरपीनंतर त्या म्हणाल्या,“माझ्या आयुष्यात मी ऐकलेली सर्वात अविश्वसनीय बातमी म्हणजे, डॉक्टर म्हणाले-मी कर्करोगमुक्त झाली आहे. एक गणिताची शिक्षिका असल्याने, प्रत्येक समस्येवर उपाय असतो यावर माझा नेहमी विश्वास होता आणि मला अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये योग्य उपचार मिळाले त्या पुढे स्मित हास्य करत म्हणाल्या, या उपचाराने मला जीवन जगण्याची दुसरी संधी दिली आहे. एसीसी मधील टीमने दाखवलेले कौशल्य आणि केलेले अविरत सहकार्य, याबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन.”