मुंबई, ५ फेब्रुवारी २०२५:* कॅनडामध्ये स्थलांतरीत भरतीयांना नव्याने आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी बेकॉनने एक अफलातून सुविधा सुरु केली आहे. यामुळे बेकॉन मनी खात्यातून कॅनडीयन डॉलर्समध्ये थेट भारतातील पेमेंट करता येतील. बेकॉन सुपर अपमध्ये इंडिया बिल पे हे नवे फीचर देण्यात आले आहे. हा खास करून कॅनडातील स्थलांतरीतांसाठी डिझाइन केलेला प्लॅटफॉर्म आहे. आता गुगल आणि आयओएस वर डाऊनलोडसाठी हे उपलब्ध आहे. बेकॉन इंडिया बिल पे ही पहिलीच अशी सुविधा आहे, जे भारत कनेक्ट आणि भारतातील येस बँकच्या सहकार्याने सीमापार बिल पेमेंट सोल्युशन देत आहे.
*बेकॉनचे सह संस्थापक तसेच मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञान अधिकारी आदित्य म्हात्रे* म्हणाले, “कॅनडातील एक एनआरआय म्हणून मला माझ्या कुटुंबासाठी भारतात पेमेंट करताना अडचणी येत होत्या. म्हणूनच आम्ही येस बँक आणि भारत कनेक्ट सोबत भागीदारी करत बेकॉन इंडिया बिल पे तयार केले. माझ्यासारख्या एनआरआयना अविरत सुविधा पुरवण्यासाठीच हे उत्पादन तयार करण्यात आले आहे.”
येस बँक समर्थित असलेली ही सेवा भारतीय बिलर्सना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे नियमित केलेलया रुपी ड्रॉइंग अरेंजमेंटनुसार पेमेंटची प्रक्रिया अतिशय सुलभ उपलब्ध करून देते. परदेशातून भारतात फंड ट्रान्सफर या सेवेद्वारे सोपे होते. तसेच भारत कनेक्ट नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील लाभार्थ्यांशी त्यांना जोडून दिले जाते.
बेकॉन इंडिया बिल पे ने ही पेमेंट सुविधा सुरु करण्यासाठी भारतातील राष्ट्रीय बिल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात भारत कनेक्ट चा लाभ घेतला आहे, जे पूर्वी भारत बिल पेमेंट सिस्टिम म्हणून ओळखले जात होते. RBI च्या संकल्पनेतून साकार झालेले भारत कनेक्ट हे भारतातील लाखको ग्राहक आणि उद्योजकांकरिता बिल पेमेंट कलेक्शन आणि सेटलमेंट सुविधा प्रदान करणारे टेक्नोलॉजी सोल्युशन आहे. याद्वारे सुरक्षिततेसाठी एंड टू एंड एन्क्रिप्शन आरबीआय नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते , बिलर्स, पेमेंट प्रोव्हायडर्स आणि ग्राहकांना एकमेकांशी जोडले जाते.