maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतातील ग्राहकांसाठी १० मोठ्या क्षमतेच्‍या बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्‍स लाँच

बेंगळुरू, भारत – २७ ऑगस्‍ट २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज १० मोठ्या आकाराच्‍या, फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सची नवीन श्रेणी लाँच केली. एआय-पॉवर्ड लाइन-अप भारतातील ग्राहकांसाठी लॉण्‍ड्री केअरमधील नवीन युगाची खात्री देते आणि सर्वोत्तम एआय वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून कपडे धुण्‍याचे काम सोपे करते.
या नवीन, मोठ्या वॉशिंग मशिन्‍स १२ किग्रॅच्‍या योग्‍य आकारासह येतात, ज्‍यामुळे भारतातील ग्राहक एकाच वेळी अधिक कपडे धुवू शकतात. म्‍हणून या वॉशिंग मशिन्‍स ब्‍लँकेट्स, पडदे व साड्या अशा मोठ्या कपड्यांना धुण्‍यासाठी अनुकूल आहेत. सॅमसंग इंडियाच्‍या नवीन १२ किग्रॅ एआय वॉशिंग मशिन्‍सच्‍या श्रेणीची किंमत ५२,९९० रूपयांपासून सुरू होते. नवीन आधुनिक वॉशिंग मशिन्‍स बीस्‍पोक डिझाइनसह फ्लॅट ग्‍लास डोअर आणि प्रगत एआय वैशिष्‍ट्ये जसे एआय वॉश, एआय एनर्जी मोड, एआय कंट्रोल व एआय इकोबबलसह येतात.
”भारतातील ग्राहक आधुनिक डिजिटल अप्‍लायन्‍सेसचा शोध घेत आहेत, जे किमान प्रयत्‍नासह दर्जात्‍मक वॉश कार्यक्षमता देण्‍यासोबत वीज व वेळेची बचत करतात. आमच्‍या नवीन १२ किग्रॅ एआय-पॉवर्ड वॉशिंग मशिन्‍स ग्राहकांना एकाच वेळी मोठे लॉण्‍ड्री लोड्स धुण्‍याची सुविधा देतात, ज्‍यामधून त्‍यांना ‘डू लेस अँड लिव्‍ह मोअर’ची खात्री मिळते. फ्रण्‍ट-लोड बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्‍सची नवीन श्रेणी सोईस्‍कर व कार्यक्षम वॉश देत इतरांपेक्षा वेगळी ठरते. प्रीमियम बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन श्रेणीसह आमचा कार्यक्षमता, सोईस्‍करपणा व स्‍टाइलला महत्त्व देणाऱ्या आणि उच्‍च क्षमतेच्‍या वॉशिंग मशिन श्रेणीला प्राधान्‍य देणाऱ्या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसचे वरिष्‍ठ संचालक सौरभ बैशाखिया म्‍हणाले.
वैयक्तिकृत लॉण्‍ड्री अनुभवांमध्‍ये मोठी झेप घेत सॅमसंगच्‍या बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्‍स २.८ दशलक्ष बिग डेटा पॉइण्‍ट्सचा फायदा घेत स्‍मार्टथिंग्‍ज अॅपच्‍या एकीकरणासह सानुकूल वॉश पर्याय देते. तसेच या वॉशिंग मशिन्‍स प्रत्‍येक वॉश चक्रामध्‍ये वीजेची मोठ्या प्रमाणात बचत करतात. एआय एनर्जी मोड जवळपास ७० टक्‍के वीज बचत देत ग्राहकांना वीजेची बिल कमी करण्‍यामध्‍ये मदत करतो.
एआय-आधारित तंत्रज्ञानांसह युजर अनुभवांना केले अधिक उत्‍साहित
कपडे धुण्‍यासाठी लागणारी मेहनत कमी करत बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्‍समधील एआय-पॉवर्ड वैशिष्‍ट्यांची संपूर्ण श्रेणी वापरकर्त्‍याच्‍या जीवनशैलीमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करते, तसेच स्‍मार्टर, अधिक कार्यक्षम आणि इको-फ्रेण्‍डली अनुभव देते. म्‍हणून, नवीन एआय वॉशिंग मशिन्‍स कपडे धुण्‍याबाबत चिंता कमी करतात आणि काम सोपे करतात.
एआय वॉश प्रगत सेन्सिंगचा वापर करत कपड्याचे वजन व सॉफ्टनेस ओळखते, तर सॉइल लेव्‍हल ट्रॅकिंग वॉटर टर्बिडीटीच्‍या आधारावर मातीच्‍या डागांना सक्रियपणे ओळखते आणि कपड्यांना खोलवर, पण सौम्‍यपणे धुण्‍यासाठी पाणी व डिटर्जंटचा सानुकूल वापर करते. ऑटो डिस्‍पेन्‍स वैशिष्‍ट्य आपोआपपणे योग्‍य प्रमाणात डिटर्जंट व फॅब्रिक सॉफ्टनर रीलीज करते, ज्‍यामुळे कपड्यांचे नुकसान होण्‍याची चिंता दूर होते. स्‍मार्टथिंग्‍ज अॅपच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असलेल्‍या एआय एनर्जी मोडसह तुम्‍ही तुमच्‍या होम अप्‍लायन्‍सेसच्‍या ऊर्जा वापराचे व्‍यवस्‍थापन करू शकता आणि प्रक्रियेमध्‍ये पैशांची बचत करू शकता. वापरकर्ते त्‍यांच्‍या दैनंदिन, साप्‍ताहिक व मासिक वीज वापरावर देखरेख ठेवू शकतात, तसेच हे वैशिष्‍ट्य मासिक वीज बिलांचा अंदाज देखील करू शकते. बिल पूर्वनिर्धारित लक्ष्‍यापेक्षा जास्‍त असेल तर अॅप एनर्जी-सेव्हिंग मोड कार्यान्वित करू शकते. एआय कंट्रोल वैशिष्‍ट्य हॅबिट लर्निंगच्‍या माध्‍यमातून ग्राहकांच्‍या कपडे धुण्‍याच्‍या पद्धती जाणून घेत त्‍यांच्‍याशी जुळले जाते आणि वापरकर्त्‍यांसाठी अनुकूल असलेल्‍या वॉश चक्रांबाबत सल्‍ला देते.
तसेच, स्‍मार्टथिंग्‍ज क्‍लोथिंग केअरसह वापरकर्ते शिफारशी केलेल्‍या वॉश चक्रांचा वापर करत सानुकूल चक्र करू शकतात आणि त्‍यांची बचत करू शकतात. स्‍मार्टथिंग्‍ज गोइंग आऊट मोड वापरकर्त्‍यांना दुरूनच त्‍यांच्‍या कपडे धुण्‍याच्‍या प्रक्रियेचे व्‍यवस्‍थापन करण्‍याची सुविधा देते, जेथे कपडे धुण्‍याच्‍या वेळेबाबत चिंता करण्‍याची गरज भासत नाही. याव्‍यतिरिक्‍त, वापरकर्ते त्‍यांनी सेट केलेल्‍या जिओफेन्‍सच्‍या सीमेपलीकडे जातात तेव्‍हा त्‍यांच्‍या गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोनवरील पुश नोटिफिकेशनच्‍या माध्‍यमातून कपडे धुण्‍याची प्रक्रिया रिशेड्यूल करू शकतात. तसेच कपडे धुण्‍याचे चक्र पूर्ण झाल्‍यानंतर वॉशिंग मशिनमधून कपडे बाहेर काढले नाही तर ते लॉण्‍ड्री अलार्म रिमाइंडर पाठवते. त्‍यानंतर ते त्‍यांच्‍या कपड्यांमधून येणाऱ्या दुर्गंधींना प्रतिबंध करण्‍यासाठी रिन्‍स + स्पिन चक्र सुरू करू शकतात. स्‍मार्टथिंग्‍ज होम केअर* मशिनच्‍या कार्यक्षमतेवर देखरेख ठेवते, वापरकर्त्‍यांना सक्रियपणे गॅलॅक्‍सी डिवाईसेसवर देखरेख आणि समस्‍या निवारण टिप्‍स देते.
सुपरस्‍पीड पर्याय कपडे धुण्‍याची वेळ ३९ मिनिटांनी कमी करते, ज्‍यासंदर्भात वॉश कार्यक्षमतेवर कोणतीच तडजोड होत नाही. तसेच, क्‍यू-बबल आणि स्‍पीड स्‍प्रे यांसारखी नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्ये उत्तम क्‍लीनिंग व कार्यक्षम रिन्सिंगची खात्री देतात. टेम्‍पर्ड ग्‍लास डोअरसह टिकाऊपणा व आकर्षकतेच्‍या संयोजनाची खात्री मिळते, तर लेस मायक्रोफायबर सायकल मायक्रोप्‍लास्टिक उत्‍सर्जन जवळपास ५४ टक्‍क्‍यांनी कमी करते, ज्‍यामधून टिकाऊपणाची खात्री मिळते. तसेच, हायजिन स्‍टीम खोलवर स्‍वच्‍छतेची, ९९.९ टक्‍के जीवाणू काढून टाकण्‍याची आणि आरोग्‍यदायी वॉशसाठी एलर्जीन्‍सना निष्क्रिय करण्‍याची खात्री देते. डिजिटल इन्‍व्‍हर्टर तंत्रज्ञानाच्‍या शक्‍तीसह या वॉशिंग मशिन्‍स ऊर्जा कार्यक्षमता, कमी आवाज आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेची खात्री देतात, ज्‍यांना २० वर्षांच्‍या वॉरंटीचे (मोटरवर) पाठबळ आहे.
डिझाइन व उपलब्‍धता
बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्‍स आकर्षक आहेत आणि त्‍यांचे प्रीमियम लुक कोणत्‍याही आधुनिक इंटीरिअरशी सुसंगतपणे सामावून जाते. वॉशिंग मशिन्‍स आजपासून सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअर Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप, रिटेल स्‍टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध असतील.
किंमत व किफायतशीरपणा
बीस्‍पोक एआय वॉशिंग मशिन्‍सची किंमत ५2,९९० रूपये ते ८०,९९० रूपयांपर्यत आहे. सॅमसंग फायनान्‍स+च्‍या मदतीसह ग्राहक सुलभ ईमएआयच्‍या माध्‍यमातून देखील नवीन वॉशिंग मशिन्‍स खरेदी करू शकतात. सॅमसंग फायनान्‍स+ डिजिटल, पेपर-लेस फायनान्सिंग प्‍लॅटफॉर्म आहे, ज्‍यामाध्‍यमातून काही मिनिटांमध्‍येच कर्ज मंजूर होते.
क्षमता एमआरपी रंग
१२ किग्रॅ ५२९९० आयनॉक्‍स
१२ किग्रॅ ५३९९० नेव्‍ही
१२ किग्रॅ ५६९९० ब्‍लॅक
१२ किग्रॅ ५९९९० नेव्‍ही
१२ किग्रॅ ६०९९० ब्‍लॅक
१२ किग्रॅ ६०९९० नेव्‍ही
१२ किग्रॅ ६५९९० आयनॉक्‍स
१२ किग्रॅ ६९९९० ब्‍लॅक
१२ किग्रॅ ७३९९० नेव्‍ही
१२ किग्रॅ ७४९९० आयनॉक्‍स

*स्‍मार्टथिंग्‍ज अॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिवाईसेसवर उपलब्‍ध आहे. वेगळे वायफाय कनेक्‍टीव्‍हीटी आणि सॅमसंग अकाऊंटची गरज भासू शकते. सुसंगत डिवाईसेससह कनेक्‍टीव्‍हीटीवर आधारित आहे.

Related posts

झूमकारने थ्रिफ्ट स्टोअर ही नवी उत्पादन श्रेणी लाँच केली

Shivani Shetty

यामाहा आणत आहे २०२३ मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटो जीपी एडिशन लाइन-अप.

Shivani Shetty

टाटा मोटर्स ने तकनीशियनों के बच्चों की उच्‍च शिक्षा के लिए “विद्याधन” और “उत्कर्ष” कार्यक्रम लॉन्च किए

Shivani Shetty

Leave a Comment