मुंबई, १५ डिसेंबर २०२३: स्टडी अब्रॉड प्रमुख कंपनी लेवरेज एड्युने आज भारतातील प्रमुख के-१२ संस्था रायन ग्रुप स्कूल्ससोबत सहयोगाने त्यांच्या ७-शहरातील रोडशोच्या समापनाची घोषणा केली. परदेशात पदवीपूर्व शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करत हा रोडशो मुंबईसह चंदिगड, लुधियाना, अमृतसर, ग्रेडर नोएडा, दिल्ली आणि बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला. यात युनिव्हर्सिटींनी १५०,००० डॉलर्स किमतीच्या स्कॉलरशिप दिल्या.
२०२३ मधील सर्वात मोठ्या स्टडी अब्रॉड कार्यक्रमामध्ये यूके, यूएस, दुबई, ऑस्ट्रेलिया व कॅनडा येथील १२० हून अधिक युनिव्हर्सिटींचा सहभाग दिसण्यात आला. सर्व ७ शहरांमध्ये ७,००० हून अधिक विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसण्यात आली आहे.
लेवरेजडॉटबिझचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय चतुर्वेदी म्हणाले, “मी गेल्या वर्षी रायन यांना भेटलो आणि सतत बदलत असलेल्या या नवीन युगामध्ये प्रगती करण्यास विद्यार्थ्यांना साह्य करण्याची त्यांची विचारसरणी व कटिबद्धतेने माझे त्वरित लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला, तसेच त्यांच्या ग्रुपमधील शाळांमध्ये असलेल्या शिक्षणाच्या दर्जामधून त्या पुढाकाराचे परिणाम देखील दिसून येत आहेत. मी स्वत: या सहयोगासाठी अत्यंत उत्सुक आहे. फेअर्सप्रती प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि आम्ही ऑनबोर्ड केलेल्या युनिव्हर्सिटीज अत्यंत प्रभावशाली आहेत, ज्यामुळे सर्वांसाठी हे मोठे यश आहे.”
रायन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रायन पिंटो म्हणाले, “स्टडी अब्रॉड फेअर अॅण्ड शोडशो इव्हेण्ट्सना सादर करण्यासह विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी गेटवे देखील आहेत. ही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक भवितव्यामध्ये प्रेरित व मार्गदर्शन करण्याची संधी आहे. मी दर्जेदार शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याप्रती अक्षय यांच्या मिशनचे कौतुक करतो आणि त्यांच्या दृष्टीकोनावर माझा पूर्ण विश्वास आहे. हा अनोखा इव्हेण्ट व सहयोग भारतातील शालेय विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करेल, त्यांना आमच्या समकालीन निवडींच्या पलीकडे असलेले आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्यास प्रेरित करेल, अशी आशा करतो.”