नवी मुंबई, ६ फेब्रुवारी २०२५ : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई आपले दूरदर्शी अध्यक्ष आणि आधुनिक भारतीय आरोग्य सेवेचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ प्रताप सी रेड्डी यांच्या सन्मानार्थ संस्थापक दिवस साजरा करते. भारतात आरोग्य सेवेमध्ये क्रांती आणण्याप्रती त्यांच्या अतूट वचनबद्धतेने असंख्य लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि पुढील पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांच्या असामान्य योगदानाच्या सन्मानार्थ, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई प्रभावी सामुदायिक आउटरीच उपक्रम सुरु करत आहे, जो करुणा आणि उद्दिष्टासह सेवा करण्याचे त्यांचे मिशन अधोरेखित करतो.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई आणि अपोलो फार्मसीने ‘गिरीजा’ सोबत सहयोग केला.ज्यामध्ये १) इथे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची नीट काळजी घेतली जावी यासाठी निःशुल्क आरोग्य तपासणी. २) पौष्टिक फळांच्या थाळीतून पोषणाचे महत्त्व समजावणे, पोषण पुरवणे. ३) निर्वाह मदत याठिकाणच्या सुविधांमध्ये अडीअडचणी येऊ नयेत यासाठी एक महिन्याच्या (७०० किलो) तांदुळाचा पुरवठा. ४) वृद्धांचा सन्मान आणि देखभाल यासाठी ५०० ऍडल्ट डायपर्सचा पुरवठा. ५) अनाथ मुलांना पुस्तके व स्टेशनरीने भरलेल्या ३१ बॅकपॅक भेट म्हणून देऊन शिक्षण सक्षमीकरण. ६) आत्मविश्वास आणि स्वच्छता वाढवण्यासाठी ग्रूमिंग किट पुरवून वैयक्तिक देखभाल. ७) कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ व रिफारबिश्ड कपडे व खेळण्यांचे दान.
श्री वसंत कुंजर, अध्यक्ष, गिरीजा वेलफेयर असोसिएशन म्हणाले,”वंचितांच्या उत्थानासाठी अपोलो हॉस्पिटल्सचे मदतकार्य खरोखरीच मनाला स्पर्शून जाणारे आहे. त्यांचे औदार्य फक्त भौतिक मदत करण्यापुरते मर्यादित नाही तर ते आमच्याकडे राहणाऱ्यांना सन्मान, प्रेम आणि देखभाल प्रदान करतात. हा उपक्रम आमच्याकडून ज्यांची सेवा केली जाते अशा वृद्धांच्या व मुलांच्या जीवनात शाश्वत प्रभाव निर्माण करेल.”
श्री अरुणेश पुनेथा, रीजनल सीईओ, वेस्टर्न रीजन, अपोलो हॉस्पिटल्स यांनी हॉस्पिटलची बांधिलकी अधोरेखित करताना सांगितले,”संस्थापक दिवस हा केवळ एक उत्सव नाही तर डॉ रेड्डी यांच्या परिवर्तनात्मक दृष्टिकोनाचा सन्मान आहे. करुणेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देत जागतिक स्तराची आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध व्हावी हे त्यांचे स्वप्न आहे. त्यांनी आम्हाला जो वारसा सोपवला आहे त्याचा सन्मान आम्ही करत आहोत, आम्ही अशा लोकांची मदत करत आहोत ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे. ते मानतात की, आरोग्यसेवेमध्ये फक्त शरीर नाही तर आत्म्याला देखील बरे केले गेले पाहिजे आणि आमचा उपक्रम त्यांच्या या विश्वासाला मूर्त स्वरूप देतो.”
अपोलो हॉस्पिटल्समध्ये संस्थापक दिवस फक्त एक समारोह नाही तर एक अभियान आहे, सक्रिय बनण्याचे आवाहन आहे आणि त्यांच्या उद्दिष्टाची पुष्टी आहे. सुलभ, करुणामय आरोग्यसेवेचा डॉ रेड्डी यांचा दृष्टिकोन पुढे नेत आम्ही जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणे, निरोगी समाज निर्माण करणे आणि सर्वांसाठी एक उज्वल भविष्याला आकार देणे कायम सुरु ठेवू.