maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून कम्‍युनिटी व एन्‍व्‍हायरोन्‍मेंट थीम्‍ससाठी वेगवेगळ्या स्‍कूल आणि युथ ट्रॅक्‍ससह ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’चा सीझन ३ लाँच; २०२४ एडिशन ९० लाख रूपयांहून अधिक अनुदान देणार

नवी दिल्‍ली, भारत – एप्रिल १०, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने फाऊंडेशन फॉर इनोव्‍हेशन अँड टेक्‍नॉलॉजी ट्रान्‍सफर (एफआयटीटी), आयआयटी दिल्‍ली, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि युनायटेड नेशन्‍स इन इंडिया यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोगास‍ह त्‍यांचा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’च्‍या तिसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसह सॅमसंगचा देशातील तरूणांमध्‍ये नाविन्‍यपूर्ण विचारसरणी व समस्‍या निवारण संस्‍कृती बिंबवण्‍याचा मनसुबा आहे.  

सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जेबी पार्क, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वरिष्‍ठ संचालक व सायण्टिस्‍ट ‘जी’ डॉ. संदीप चॅटर्जी आणि भारतातील युनायटेड नेशन्‍स रेसिडण्‍ट कोऑर्डिनेटर श्री. शोम्‍बी शार्प यांच्‍या हस्‍ते सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२४ चे उद्घाटन करण्‍यात आले. यावेळी इतर मान्‍यवर देखील उपस्थित होते.

हा सीएसआर उपक्रम नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स आणि व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत सामाजिक प्रभाव निर्माण करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतांना सन्‍मानित करतो, तसेच सॅमसंचा दृष्टिकोन #TogetherforTomorrow #EnablingPeople ला दृढ करतो.

यंदा ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ उपक्रमाने दोन विशिष्‍ट ट्रॅक्‍स – स्‍कूल ट्रॅक व युथ ट्रॅक सादर केले आहेत. हे प्रत्‍येक ट्रॅक विशिष्‍ट थीमला चालना देण्‍याप्रती समर्पित आहेत आणि विविध वयोगटातील व्‍यक्‍तींवर लक्ष्‍य करतात. दोन्‍हीट्रॅक्‍स एकाच वेळी राबवण्‍यात येतील, ज्‍यामधून सर्व विद्यार्थ्‍यांना समान संधी व समान खेळाच्या मैदानाची खात्री मिळेल.

स्‍कूल ट्रॅक १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो ‘कम्‍युनिटी अँड इन्‍क्‍लुजन’ थीमवर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक वंचित समूहांची प्रगती करण्‍याचे, सामाजिक नवोन्‍मेष्‍काराच्‍या माध्‍यमातून सर्वांना आरोग्‍य व सामाजिक सर्वसमावेशकता उपलब्‍ध करून देण्‍याचे महत्त्व सादर करतो, म्‍हणून ‘सॉल्‍व्‍हींग फॉर इंडिया’ आहे.    

दुसरीकडे, युथ ट्रॅक १८ ते २२ वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींवर लक्ष्‍य करण्‍यासह थीम ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट अँड सस्‍टेनेबिलिटी’वर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्‍यासाठी व शाश्‍वततेला चालना देण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना महत्त्व देतो, म्‍हणून ‘सॉल्‍व्‍हींग फॉर वर्ल्‍ड’ आहे.

सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जेबी पार्क म्‍हणाले, ”सॅमसंगमध्‍ये आम्‍ही नाविन्‍यपूर्ण संकल्‍पना व परिवर्तनात्‍मक तंत्रज्ञानांच्‍या माध्‍यमातून भावी पिढीला प्रेरित व आकार देण्‍याचा प्रयत्‍न करतो. आमचे मिशन सामाजिक परिवर्तनासाठी नवप्रवर्तक व उत्‍प्रेरकांच्‍या भावी पिढीला चालना देण्‍याच्‍या अवतीभोवती फिरते. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो भारतातील तरूणांना अर्थपूर्ण नाविन्‍यता सादर करण्‍यास सक्षम करण्‍यासाठी व्‍यासपीठ ठरत आहे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात.

पहिल्‍या दोन पर्वांमध्‍ये आम्‍हाला या सीएसआर उपक्रमाचा भावी पिढीवर सकारात्‍मक परिणाम होताना दिसण्‍यात आले आहे, ज्‍यांनी नव्‍या उंची गाठत त्‍यांच्‍या सामाजिक उद्योजकता प्रवासाला सुरूवात केली आहे. तिसऱ्या पर्वामध्‍ये दोन वेगवेगळ्या ट्रॅक्‍सच्‍या सादरीकरणासह आमचा एकाच वेळी भारतासाठी व जगासाठी समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा मनसुबा आहे. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे या प्रमुख सीएसआर उपक्रमासह आमचा देशातील नाविन्‍यपूर्ण इकोसिस्‍टमला प्रबळ करण्‍याप्रती आमची भूमिका बजावण्‍याचा मनसुबा आहे.”  

इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (एमईआयटीवाय) वरिष्‍ठ संचालक व सायण्टिस्‍ट ‘जी’ डॉ. संदीप चॅटर्जी म्‍हणाले, ”पर्यावरण व शाश्‍वत विकास हा भारत सरकारचा प्राधान्‍य अजेंडा आहे. आर्थिक विकासाला गती देण्‍यासाठी मानवी क्षमता व तंत्रज्ञानाला एकत्र करण्‍याची ही उत्तम संधी आहे. नाविन्‍यपूर्ण विचारसरणी व कौशल्‍ये असलेले भारतातील तरूण पर्यावरणाची काळजी घेतात. सर्वोत्तम नाविन्‍यतांचा उपयोग करत जगभरातील विविध तळागाळांपासूनच्‍या समस्‍या व आव्‍हानांचे निराकरण करता येऊ शकते. ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ सारख्‍या उपक्रमांमधून तरूणांच्‍या क्षमतेचा उपयोग करत भारत सरकारचा दृष्टिकोन पूर्ण होण्‍याची क्षमता दिसून येते.”

आयआयटी दिल्‍लीचे संचालक प्रा. रांगन बॅनर्जी म्‍हणाले, ”आम्‍हाला सॅमसंगसोबत ‘सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो’ उपक्रमामधील त्‍यांचा प्रमुख भागीदार म्‍हणून सहयोग सुरू ठेवण्‍याचा अभिमान वाटत आहे. या सहयोगामधून समाजात सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती आणि तरूण विचारवंतांना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.”

भारतातील यूएन रेसिडण्‍ट कोऑर्डिनेटर शोम्‍बी शार्प म्‍हणाले, ”मला सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो उपक्रमाच्‍या तिसऱ्या पर्वामध्‍ये सहभाग घेण्‍याचा आनंद होत आहे. हा उत्‍साहवर्धक उपक्रम सस्‍टेनेबल डेव्‍हलमेंट गोल्‍सशीसंबंधित आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी तरूणांच्‍या नाविन्‍यपूर्ण विचारांना प्रेरित करतो. भारतातील यूएन सिस्‍टम खाजगी क्षेत्रासोबत काम करण्‍यासह उपक्रमांना पाठिंबा देते, ज्‍यामधून सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो उपक्रमाप्रमाणे तरूणांच्‍या महत्त्वाकांक्षा व नेतृत्‍वाला चालना मिळते. इतिहासामध्‍ये आतापर्यंतच्‍या तरूणांच्‍या सर्वोच्‍च सहभागासह भारतातील अधिकाधिक तरूण विचारवंत त्‍यांची ऊर्जा व सोल्‍यूशन्‍स घेऊन येत आहेत. याचा अर्थ असा की भारतीय सोल्‍यूशन्‍स जागतिक सोल्‍यूशन्‍स देखील ठरतील.”

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो बाबत माहिती

कोण सहभाग घेऊ शकतो: स्‍कूल ट्रॅकमध्ये १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थी – वैयक्तिक किंवा जवळपास ५ सदस्‍यांच्‍या टीम्‍स ‘कम्‍युनिटी अँड इन्‍क्‍लुजन’ थीममध्‍ये त्‍यांच्‍या संकल्‍पना सबमिट करू शकतात आणि युथ ट्रॅकमध्‍ये १८ ते २२ वर्ष वयोगटातील व्‍यक्‍ती – वैयक्तिक किंवा जवळपास ५ सदस्‍यांच्‍या टीम्‍स ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट अँड सस्‍टेनेबिलिटी’ थीममध्‍ये त्‍यांच्‍या संकल्‍पना सबमिट करू शकतात.

अॅप्‍लीकेशन थीम्‍स:  

1. स्‍कूल ट्रॅक अंतर्गत थीम ‘कम्‍युनिटी अँड इन्‍क्‍लुजन’ आरोग्‍य उपलब्‍धतेमध्‍ये सुधारणा करत, अध्‍ययन पद्धती सुधारत आणि शिक्षण उपलब्‍ध करून देत वंचित समूहांना सक्षम करण्‍यासाठी गरजांची पूर्तता करते, ज्‍यामधून सर्वांसाठी सामाजिक सर्समावेशकतेची खात्री मिळते.
2. युथ ट्रॅक अंतर्गत थीम ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट अँड सस्‍टनेबिलिटी’ पर्यावरणाचे संरक्षण करण्‍यावर, कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यावर आणि शाश्वततेला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करेल.

सहभागींना काय मिळेल: सॅमसंग, एमईआयटीवाय, आयआयटी-दिल्‍ली यांच्‍यासह विविध उद्योग तज्ञांकडून प्रत्‍यक्ष प्रशिक्षण आणि युनायटेड नेशन्‍स इन इंडियाकडून टेक्निकल सपोर्ट. तसेच, सहभागींना त्‍यांच्‍या संकल्‍पनांना प्रोटोटाइपमध्‍ये बदलण्‍यासाठी विशेष मार्गदर्शन व कोचिंग, सॅमसंग लीडर्ससोबत केंद्रित परस्‍परसंवादांसह क्यूरेटेड इनोव्‍हेशन वॉकला उपस्थित राहण्‍याची संधी आणि प्रोटोटाइप विकास व सुधारणेसाठी उपलब्‍धीनुसार अनुदान मिळेल.  

स्‍कूल ट्रॅक: उपांत्‍य फेरीमधील १० टीम्‍सना प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्‍सी टॅब्‍स मिळतील. अंतिम फेरीमधील ५ टीम्‍सना प्रोटोटाइप सुधारणेसाठी प्रत्‍येकी १ लाख रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्‍सी वॉचेस् मिळतील.

युथ ट्रॅक: उपांत्‍य फेरीमधील १० टीम्‍सना प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्‍सी लॅपटॉप्‍स मिळतील. अंतिम फेरीमधील ५ टीम्‍सना प्रोटोटाइप सुधारणेसाठी प्रत्‍येकी १ लाख रूपये अनुदान आणि सॅमसंग झेड फ्लिप स्‍मार्टफोन्‍स मिळतील.

विजेत्‍यांना काय मिळेल:

स्‍कूल ट्रॅक: विजेत्‍या टीमला सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२४ ची ‘कम्‍युनिटी चॅम्पियन’ म्‍हणून घोषित करण्‍यात येईल आणि प्रोटोटाइप सुधारणेसाठी २५ लाख रूपयांची सीड अनुदान मिळेल. विजेत्‍या टीम्‍सच्‍या स्‍कूल्‍सना शैक्षणिक ऑफरिंग्‍ज वाढवण्‍यासाठी, समस्‍या निवारण मानसिकतेला प्रेरित करण्‍यासाठी सॅमसंग प्रॉडक्‍ट्स देखील मिळतील.

युथ ट्रॅक: विजेत्‍या टीमला सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२४ ची ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट चॅम्पियन’ म्‍हणून घोषित करण्‍यात येईल आणि आयआयटी-दिल्‍ली येथे इन्‍क्‍यूबेशनसाठी ५० लाख रूपयांचे अनुदान मिळेल. विजेत्या टीम्‍सच्‍याकॉलेजेसना त्‍यांच्‍या शैक्षणिक ऑफरिंग्‍ज वाढवण्‍यासाठी, सामाजिक उद्योजकतेला प्रेरित करण्‍यासाठी सॅमसंग उत्‍पादने देखील मिळतील.

सहभागी कुठे अर्ज करू शकतात: www.samsung.com/in/solvefortomorrow

केव्‍हापासून: ९ एप्रिल २०२४ पासून

केव्‍हापर्यंत: ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)

उपक्रमाची सविस्‍तर माहिती

स्‍कूल ट्रॅक: सॉल्‍व्‍हींग फॉर इंडिया

स्‍कूल ट्रॅकमध्‍ये विद्यार्थ्‍यांना जवळपास पाच सदस्‍यांच्‍या टीम्‍स तयार करून ‘कम्‍युनिटी अँड इनोव्‍हेशन’ थीम अंतर्गत त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना सबमिट करण्‍याचे आवाहन केले जाते. या उपक्रमामध्‍ये चार टप्‍पे असतील: अॅप्‍लीकेशन विंडो, प्रादेशिक फेऱ्या, इनोव्‍हेशन वॉक आणि ग्रॅण्‍ड फिनाले.

अॅप्‍लीकेशन विंडोदरम्‍यान सहभागी टीम्‍सना आभार म्‍हणून डिजिटल सर्टिफिकेट्स मिळतील. पहिल्‍या शॉर्टलिस्‍टमध्‍ये प्रादेशिक शॉर्टलिस्‍ट्सचा समावेश असेल, जेथे ५० टीम्‍सची निवड करण्‍यात येईल. त्‍यानंतर प्रादेशिक फेऱ्यांमध्‍ये या ५० टीम्‍स ज्‍यूरीसमोर त्‍यांच्‍या संकल्‍पना सादर करतील. यानंतर १० सेमी-फायनालिस्‍ट टीम्‍स इनोव्‍हेशन वॉककडे वाटचाल करतील, जेथे ते सॅमसंगचे संशोधन व विकास केंद्रे आणि प्रादेशिक मुख्‍यालयांमधील वर्कशॉप्‍सना उपस्थित राहतील. यानंतर नॅशनल पिच इव्‍हेण्‍टमध्‍ये या १० सेमी-फायनालिस्‍ट टीम्‍स आयआयटी दिल्‍ली येथील ज्‍यूरीसमोर त्‍यांच्‍या संकल्‍पना सादर करतील. रिवॉर्ड म्‍हणून प्रत्‍येक टीमला प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपयांचे अनुदान आणि नवीन सॅमसंग गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स मिळतील. नॅशनल पिच इव्‍हेण्‍टमधून निवडण्‍यात आलेल्‍या ५ फायनालिस्‍ट टीम्‍स प्रत्‍यक्ष प्रशिक्षण घेतील आणि ग्रॅण्‍ड ज्‍यूरीसमोर त्‍यांचे सोल्‍यूशन्‍स सादर करतील, जेथे प्रत्‍येक टीमला प्रोटोटाइप सुधारणेसाठी १ लाख रूपयांचे अनुदान आणि सर्व सहभागींना नवीन गॅलॅक्‍सी वॉच मिळेल. ग्रॅण्‍ड फिनालेमधील विजेत्‍या टीमला सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२४ ची ‘कम्‍युनिटी चॅम्पियन’ म्‍हणून घोषित करण्‍यात येईल आणि प्रोटोटाइप सुधारेणसाठी २५ लाख रूपयांचे सीड अनुदान व त्‍यांच्‍या शाळेसाठी सॅमसंग गॅलॅक्‍सी उत्‍पादने मिळतील.

युथ ट्रॅक: सॉल्‍व्‍हींग फॉर द वर्ल्‍ड

युथ ट्रॅकमध्‍ये सहभागी जवळपास पाच सदस्‍यांच्‍या टीम्‍स तयार करतील आणि ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट अँड सस्टेनेबिलिटी’ थीम अंतर्गत त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पना सबमिट करतील. पहिल्‍या शॉर्टलिस्‍टमध्‍ये प्रादेशिक शॉर्टलिस्‍ट्सचा समावेश असेल, जेथे ५० टीम्‍सची निवड करण्‍यात येईल. त्‍यानंतर प्रादेशिक फेऱ्यांमध्‍ये या ५० टीम्‍स ज्‍यूरीसमोर त्‍यांच्‍या संकल्‍पना सादर करतील. यानंतर १० सेमी-फायनालिस्ट टीम्‍स इनोव्‍हेशन वॉककडे वाटचाल करतील, जेथे ते सॅमसंगचे संशोधन व विकास केंद्रे  आणि प्रादेशिक मुख्‍यालयांमधील वर्कशॉप्‍सना उपस्थित राहतील.  यानंतर नॅशनल पिच इव्‍हेण्‍टमध्‍ये या १० सेमी-फायनालिस्‍ट टीम्‍स आयआयटी दिल्‍ली येथील ज्‍यूरीसमोर त्‍यांच्‍या संकल्‍पना सादर करतील. रिवॉर्ड म्‍हणून प्रत्‍येक टीमला प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपयांचे अनुदान आणि नवीन सॅमसंग गॅलॅक्‍सी लॅपटॉप्‍स मिळतील. नॅशनल पिच इव्‍हेण्‍टमधून निवडण्‍यात आलेल्‍या ५ फायनालिस्‍ट टीम्‍स प्रत्‍यक्ष प्रशिक्षण घेतील आणि ग्रॅण्‍ड ज्‍यूरीसमोर त्‍यांचे सोल्‍यूशन्‍स सादर करतील, जेथे प्रत्‍येक टीमला प्रोटोटाइप सुधारणेसाठी १ लाख रूपयांचे अनुदान आणि सर्व सहभागींना नवीन गॅलॅक्‍सी झेड फ्लिप स्‍मार्टफोन मिळेल. ग्रॅण्‍ड फिनालेमधील विजेत्‍या टीमला सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२४ची ‘एन्‍व्‍हायरोन्‍मेंट चॅम्पियन’ म्‍हणून घोषित करण्‍यात येईल आणि प्रोटोटाइप सुधारेणसाठी ५० लाख रूपयांचे अनुदान व त्‍यांच्‍या कॉलेजसाठी सॅमसंग गॅलॅक्‍सी उत्‍पादने मिळतील.

हे दोन ट्रॅक्‍स एकमेकांविरोधात स्‍पर्धा करत नाहीत आणि प्रत्‍येक ट्रॅकमध्‍ये थीम्‍स व वयोगटानुसार वेगवेगळे क्‍यूरेटेड प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सर्वोत्तम अध्‍ययन संधी असतील.  

मुख्‍य स्‍पर्धेव्‍यतिरिक्‍त सहभागींना ‘सोशल मीडिया चॅम्पियन अवॉर्ड’ आणि ‘गूडविल अवॉर्ड’ अशा प्रतिष्ठित पुरस्‍कारांसाठी स्‍पर्धा करण्‍याची संधी मिळेल. ‘सोशल मीडिया चॅम्पियन अवॉर्ड’मध्‍ये प्रत्‍येक ट्रॅकमधील सोशल मीडिया चॅम्पियन्‍ससाठी ५०,००० रूपयांचे बक्षीस आहे, ज्‍याची घोषणा इनोव्‍हेशन वॉकमध्‍ये करण्‍यात येईल. ‘गूडविल अवॉर्ड’ विजेत्‍यांना प्रत्‍येक ट्रॅकमधील ऑडियन्‍स चॉईस आयडियासाठी १ लाख रूपये बक्षीसासह सन्‍मानित करेल, ज्‍याची घोषणा ग्रॅण्‍ड फिनालेमध्‍ये करण्‍यात येईल.

अधिक माहितीसाठी आणि भारतातील स्‍पर्धेकरिता नोंदणी करण्‍यासाठी www.samsung.com/in/solvefortomorrow येथे भेट द्या. अर्जनोंदणी ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बंद होईल.

२०१० मध्‍ये प्रथम यूएसमध्‍ये लाँच करण्‍यात आलेला उपक्रम सॉल्व्‍ह फॉर टूमारो सध्‍या जगभरातील ६३ देशांमध्‍ये कार्यरत आहे आणि जगभरातील २.३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्‍ये सहभाग घेतला आहे.

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो!अनेबलिंग पीपल’ जगभरातील तरूणांना शिक्षण प्रदान करण्‍यासोबत भावी लीडर्सना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या सीएसआर प्रयत्‍नांबाबतच्‍या अधिक गाथा आमचे सीएसआर पेज http://csr.samsung.com यावर वाचा.      

About Samsung Electronics Co., Ltd.

Samsung inspires the world and shapes the future with transformative ideas and technologies. The company is redefining the worlds of TVs, smartphones, wearable devices, tablets, home appliances, network systems, and memory, system LSI, foundry and LED solutions, and delivering a seamless connected experience through its SmartThings ecosystem and open collaboration with partners. For latest news on Samsung India, please visit Samsung India Newsroom at http://news.samsung.com/inFor Hindi, log on to Samsung Newsroom Bharat at https://news.samsung.com/bharatYou can also follow us on Twitter @SamsungNewsIN.

Related posts

कोका-कोलाकडून राज कपूर यांच्‍या करिष्‍माई वारशासह भारतात युनिक ग्‍लोबल प्रॉपर्टी ‘कोका-कोला फूडमार्क्‍स’ लाँच

Shivani Shetty

फिल्म फॉर थॉट: मानसिक आरोग्याच्या सकारात्मक चित्रणाची शक्ती

Shivani Shetty

टाटा मोटर्सने २५० फास्‍ट-चार्जिंग स्‍टेशन्‍स स्‍थापित करण्‍यासाठी डेल्‍टा इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि थंडरप्‍लस सोल्‍यूशन्‍ससोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

Shivani Shetty

Leave a Comment