मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने ग्राहकांना उत्कृष्ट उत्पादने देण्याचा नवीन मापदंड स्थापन करत, अतिप्रगत टाटा प्रायमा व्हीएक्स टिपर ट्रकची डिलिव्हरी सुरू केली आहे. हा ट्रक सर्वोच्च सुरक्षितता सुविधांनी युक्त आहे. अनेकविध सुविधांनी समृद्ध असलेला टिपर अधिक उत्पादनक्षमतेच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आला आहे तसेच चालकाच्या व वाहनाच्या सुधारित सुरक्षिततेच्या दृष्टीने यात सर्वोत्तम सोयी व सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रायमा श्रेणीतील वाहने आता एलएक्स व व्हीएक्स ट्रिम्समध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांचे प्राधान्यक्रम व आवश्यकता पूर्ण करणारी ही उत्पादने आहेत.
अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या प्रायमा व्हीएक्स टिपरमध्ये चालक देखरेख प्रणाली,स्वयंचलित घर्षण नियंत्रण, हिल-स्टार्ट असिस्ट, मल्टिमोड एफई (इंधन कार्यक्षमता) स्विच, कॅमेरावर आधारित पार्क असिस्ट प्रणाली, इन-बिल्ट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली, इंधन देखरेख प्रणाली, न्युमॅटिकली सस्पेण्डेड (हवेच्या दबावाचा वापर करून धक्के कमी करणारे) चालक आसान, एचव्हीएसी युनिट, इंजिन ब्रेक आणि टीएचयू अॅक्सल आदी सोयी आहेत. शिवाय, या ट्रकमध्ये नियमित ४-जी एनेबल्ड कनेक्टिविटी आणि फर्मवेअर ओव्हर द एअर अर्थात फोटा क्षमता आहे;ताफ्याच्या सुयोग्य व्यवस्थापनात मदत करणारे टाटा मोटर्सचे फ्लीट एज हे अतिप्रगत डिजिटल सोल्यूशन या ट्रकमध्ये आहे. या सोल्यूशनमुळे ऑपरेटर्सचा वेळ वाचतो आणि वाहन बाळगण्याचा एकूण खर्चही कमी होतो. सर्वसमावेशक फेरी (ट्रिप) व्यवस्थापन, खर्चावर देखरेख आणि देखभालीचे वेळापत्रक यांद्वारे व्यवसायातील कामकाज सुधारण्याच्या उद्दिष्टाने टाटा प्रायमा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. ट्रकचालक, ताफा मालक व ग्राहक यांच्याकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या टाटा प्रायमा प्लॅटफॉर्मने जगभरात आपली पात्रता सिद्ध केली आहे. फेरीच्या कालावधीचे सुनियोजन, इंधन कार्यक्षमता आणि आव्हानात्मक परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता या निकषांवर प्लॅटफॉर्मने उत्तम कामगिरी केली आहे.
टाटा मोटर्सने मोठ्या अभिमानाने पहिल्या टाटा प्रायमा 2830.TKव्हीएक्सची किल्ली अरायाही इन्फ्राचे श्री. नितीन चक्रवर्ती सज्जा यांच्या हाती सुपूर्त केली.
टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे व्यवसाय प्रमुख तसेच उपाध्यक्ष श्री. राजेश कौल या घोषणेबद्दल म्हणाले, “उद्योगक्षेत्रात सुरक्षितता,उत्पादनक्षमता व चालकाचा आराम या निकषांवर नवीन मापदंड स्थापन करणारे प्रायमा व्हीएक्स व्हेरीएंट बाजारात आणणे आमच्यासाठी खास अनुभव आहे. ग्राहकांच्या आवश्यकतांबद्दल आमच्याकडे असलेल्या सखोल ज्ञानाच्या आधारे, प्रायमा व्हीएक्स अनेकविध सोयी उद्योगक्षेत्रात प्रथमच देऊ करत आहेत. या सोयींमुळे आमच्या मोलाच्या ग्राहकांना मन:शांती मिळणार आहे. आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, ट्रकसंदर्भातील वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करणारी, अत्यंत प्रगत वाहने तयार झाली आहेत. आमच्या ग्राहकांना हे उत्पादन अधिक सुरक्षित ऑपरेशन, वाढीव उत्पादनक्षमता व सुधारित कामगिरीचा अनुभव देईल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. भारतातील पहिली प्रायमा व्हीएक्स खरेदी करून ट्रकिंग अधिक सुरक्षित व स्मार्टर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याबद्दल मी अरायाही इन्फ्राचे मनापासून आभार मानतो.”
ट्रकिंग उद्योगाची प्रत्येक गरज पूर्ण करणारा सर्वांत विस्तृत पोर्टफोलिओ टाटा मोटर्स देऊ करते. केवळ बीएस६च्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्ततेपर्यंत मर्यादित न राहता कंपनी त्यापुढे गेली आहे. कंपनीने नवीन सुविधांमार्फत आपली वाहने ‘बंपर टू बंपर’ अद्ययावत केली आहेत. वाहनांमध्ये अधिक कार्यक्षम इंजिने तसेच अधिक समृद्ध मूल्यवर्धन दिले आहे. हे वाहन खरेदी करून ताफा मालकांना सर्वोत्तम दर्जाचे वाहन तर मिळतेच पण त्याशिवाय अधिक चांगली इंधन कार्यक्षमता, कमी खर्चात वाहन बाळगण्याची सोय, अधिक अपटाइम, वाहनाचे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि ताफ्याचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने विश्लेषण असे अनेक लाभ मिळतात.
टाटा मोटर्स केवळ दर्जेदार उत्पादनेच देत नाही, तर ताफा व्यवस्थापन सोल्यूशन, वार्षिक देखभाल कंत्राट आणि अनन्यसाधारण सेवा २.० उपक्रमामार्फत रोडसाइड असिस्टन्स यांसारख्या सर्वोत्तम वाहन जीवनचक्र व्यवस्थापन सेवाही पुरवते. टाटा मोटर्सची दर्जा व सेवेप्रती बांधिलकी अधोरेखित करत, २५००हून अधिक टचपॉइंट्सचे विस्तृत सेवा नेटवर्क कंपनीने उभे केले आहे. या टचपॉइंट्सवर प्रशिक्षत तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टाटाचे अस्सल सुटे भाग या सेवा केंद्रांमार्फत पुरवले जातात. टाटा मोटर्सच्या ग्राहकांप्रती बांधिलकीवर यामुळे खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होते.